हीट वेव्ह अथवा लू म्हणजे नेमके काय? कशी घ्याल काळजी

काय आहे हीट वेव्ह?

काय आहे हीट वेव्ह?

साधारणतः उन्हाळ्यात तापमान ४० अंश डिग्रीपेक्षाही अधिक मिळते तेव्हा हीट वेव्हचा परिणाम होऊ लागतो. हवामान खात्याच्या IMD नुसार, ४० डिग्री सेल्सियस मैदानी क्षेत्रात आणि डोंगराळ भागात जेव्हा ३० अंश डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान वाढते तेव्हा हीट वेव्ह म्हटले जाते. याचा शरीरावर वाईट परिणाम होताना दिसतो. ३७ पेक्षा अधिक तापमानात राहणं त्रासदायक ठरतं.

काय आहे लू ची लक्षणे

काय आहे लू ची लक्षणे
  • थकवा जाणवू लागल्यावर सावधान व्हा
  • डोकं दुखणे, उलटी येणे
  • दरदरून घाम फुटणे आणि झटका आल्याचा अनुभव येणे
  • चक्कर येत असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे
  • मांसपेशीमध्ये गोळा येणे आणि अधिक घाम येणे

(वाचा – ग्लुकोमा काय आहे, काळ्या मोतीबिंदूमुळे डोळे गमावू शकता का? लक्षणे, कारणे आणि उपाय )

अशी घ्या काळजी

अशी घ्या काळजी
  • स्वच्छ आणि जास्त पाणी प्यावे. शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्यास या हीट वेव्हचा अधिक त्रास होऊ शकतो
  • हलके, सैलसर सुती कपडे घालावेत जेणेकरून शरीराला हवा मिळेल आणि घामापासून सुटका मिळेल, शरीर थंड राहण्यास मदत मिळेल
  • उन्हात साधारण दुपारी १२ ते ४ वेळात बाहेर जाणे टाळा
  • उन्हात नेहमी बाहेर जाताना गॉगल लावा, टोपी घाला
  • प्रवासात जाताना अधिक पाणी जवळ ठेवा
  • घरगुती पेय अर्थात लिंबू पाणी, कच्चे कैरी पन्हे, लस्सी इत्यादीचा वापर करावा. ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवणार नाही
  • थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे
हेही वाचा :  korean beauty : उगाच नाही संपूर्ण जग कोरियन मुलींच्या मादकतेवर घायाळ, काचेसारखी त्वचा मिळवण्यासाठी करतात ‘ही’ कामे!

(वाचा – Weight Loss: रोज अर्धा तास व्यायाम की १० हजार पावलं चालणे, वजन कमी करण्यासाठी काय योग्य)

काय करणे टाळावे

काय करणे टाळावे
  • गडद रंगाचे कपडे घाणे टाळावे
  • टाईट कपडे घालू नका
  • जेवण बनवताना नेहमी खिडकी आणि दरवाजे उघडे ठेवा, हवा खेळती राहील
  • हीट वेव्ह असताना अधिक गरम पदार्थ, दारू अथवा अल्कोहोलचे सेवन टाळा
  • उच्च प्रोटीनयुक्त खाद्यापदार्थ अथवा शिळे अन्न खाणे टाळा

(वाचा – Heart Blockage: बायपास सर्जरीशिवायही हार्ट ब्लॉकेजची समस्या होईल दूर, बाबा रामदेवने सांगितले ४ उपाय)

न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात?

न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात?

जास्त उन्हाळा आणि गरम हवा असल्यामुळे अनेकांना पोट खराब होणे, कमकुवतापणा जाणवणे, थकवा येणे, पचनशक्ती कमजोर होणे ही अत्यंत कॉमन समस्या आहे. त्यासाठी तुम्ही बेलपानाचे सरबत, नारळपाणी, सत्तू, सब्जाचं बी, ताक आणि लस्सी याचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीर आतून थंड राहाते आणि अनेक आजारांपासून सुटका मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

हेही वाचा :  72 तासांत 54 मृत्यू , 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल; उत्तर प्रदेशात असं नेमक घडलय तरी काय?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …