निकाल अतिशय आश्चर्यकारक, लोक भाजपला का निवडणून देतात हे कळत नाही – हरीश रावत | I cant understand people saying BJP zindabaad after this Congress leader Harish Rawat abn 97


मी लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही, असेही रावत यांनी म्हटले आहे.

२०१७ नंतर २०२२ मध्ये देखील उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लालकुवा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मोहन सिंग बिश्त यांनी त्यांचा १४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रामनगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने हरीश रावत यांना हटवून लालकुआन जागेवर उभे केले होते, त्यानंतर लालकुआं हा चर्चेचा विषय बनला होता. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत हरीश रावत यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता.

पराभवानंतर हरीश रावत दु:खी आहेत. “माझ्यासाठी निकाल अतिशय आश्चर्यकारक आहेत. मला समजत नाही की एवढ्या प्रचंड महागाईनंतरही जनतेचा आदेश असेल तर लोककल्याण आणि सामाजिक न्यायाची व्याख्या काय असेल? यानंतरही भाजपा जिंदाबाद म्हणणारे लोक मला समजत नाहीत. आमची प्रचाराची रणनीती अपुरी होती आणि ती मी प्रचार समितीचा अध्यक्ष म्हणून पराभव स्वीकारतो, असे हरीश रावत यांनी म्हटले आहे.

हरीश रावत म्हणाले की, “उत्तराखंडमधील लोकांची मने जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न कमी पडले आहेत. आमची खात्री होती की लोक बदलाला मतदान करतील, आमच्या प्रयत्नांमध्ये नक्कीच कमतरता असेल, मी ते स्वीकारतो आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. सर्वांनी खूप चांगले काम केले आणि मला त्यांचे आभार मानायचे आहेत. मी लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही पण मला माझ्या मुलीचे आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करायचे आहे,” असेही रावत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :  नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो, घोड्यावर का बसत नाही? अन् तेही पांढरीत घोडी का?

हरीश रावत यांनी मुख्यमंत्री असताना २०१७च्या विधानसभा निवडणुकीत हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा या दोन जागांवरून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानीजवळील लालकुआन विधानसभेतून निवडणूक लढवली आणि यावेळीही राज्यातील जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही आणि ते निवडणूक हरले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …