Realme 9 5G, Realme 9 SE 5G स्मार्टफोनचा भारतात पहिला सेल सुरू, जाणून घ्या हा फोन कसा खरेदी करायचा? | realme 9 5g realme 9 se 5g smartphone first sale started in india prp 93


Realme च्या Realme 9 5G आणि Realme 9 SE 5G स्मार्टफोनची विक्री आज दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. तुम्हाला Realme 9 5G आणि Realme 9 SE 5G स्मार्टफोनपैकी कोणतेही फोन खरेदी करायचे असतील तर हे स्मार्टफोन Flipkart आणि Realme.com वर उपलब्ध आहेत.

Realme च्या Realme 9 5G आणि Realme 9 SE 5G स्मार्टफोनची विक्री आज दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स १४,९९९ रुपये आणि १९,९९९ रुपयांच्या किमतीत लॉन्च केले आहेत. तुम्हाला Realme 9 5G आणि Realme 9 SE 5G स्मार्टफोनपैकी कोणतेही फोन खरेदी करायचे असतील तर हे स्मार्टफोन Flipkart आणि Realme.com वर उपलब्ध आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5G कनेक्टिव्हिटी आणि 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.

या दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर, Realme 9 SE फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G चिपसेट आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 30W चार्जिंग सपोर्ट दिला जात आहे. Realme 9 5G मध्ये MediaTek Dimensioty 810 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोन पंच होल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सरसह येतात.

Realme 9 5G, Realme 9 5G वर ऑफर
Realme 9 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 4GB RAM + 64GB स्टोरेजच्या बेस व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी भारतीय किंमत १७,४९९ रुपये आहे. Realme 9 5G दोन कलरच्या ऑप्शनमध्ये मिळतो. Mentor Black आणि Stargaze White हे दोन कलर आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, ICICI आणि SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI वर १,५०० रुपयांची सूट दिली जात आहे.

हेही वाचा :  कोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; वायरला लटकत उतरले; थरकाप उडवणारा VIDEO

यासह, Realme 9 5G SE च्या 6GB आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट २२,९९९ रुपयांना देण्यात आला आहे. Realme 9 5G SE Steary Glow आणि Azure Glow कलर ऑप्शनसह येतो. त्याच वेळी, ऑफरमध्ये ICICI आणि SBI बँक क्रेडिट कार्डवर २००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

आणखी वाचा : उन्हाळ्यात AC घ्यायचा विचार करताय ? ४०० रूपयांमध्ये मिळतोय हा Mini Portable AC

Realme 9 5G SE स्पेसिफिकेशन
Realme 9 5G SE चा डिस्प्ले 6.6 इंचाचा आहे. यात FHD +, 144Hz रिफ्रेश रेट आणि 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. हे Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. 8GB LPDDR4x रॅम, 128GB स्टोरेज पर्यंत वाढवता येतो. 5GB व्हर्च्युअल रॅमलाही सपोर्ट करतं. हे Realme UI 2.0 सह Android 11 द्वारे समर्थित आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

हा फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. यात f/1.8 अपर्चर आणि 6P लेन्ससह 48MP आहे. तसंच, मोनोक्रोम पोर्ट्रेट लेन्स आणि मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे, तर 16MP सेल्फी स्नॅपर देण्यात आला आहे. दुसरीकडे, कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट मिळतात. यात 30W डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी पॅक करते.

हेही वाचा :  Video: दरवाजे बंद असलेल्या 'वंदे भारत'मध्ये चढण्याचा प्रयत्न; RPF जवानाने काय केलं पाहिलं का?

Realme 9 5G स्पेसिफिकेशन
या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, 6.5-इंचाचा FHD+ डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट आहे, जो 6GB LPDDR4x रॅम, 128GB स्टोरेजसह जोडलेला आहे. हा स्मार्टफोन Realme UI 2.0 सह Android 11 द्वारे समर्थित आहे.

आणखी वाचा : Apple चा हा स्मार्टफोन झाला १४ हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 48MP सह दोन मायक्रो लेन्स देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 5,000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G, 4G LTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation …

अण्वस्त्रसज्ज चीननं वाढवली जगाची चिंता; पाकिस्तानही दहशतीच्या छायेखाली, भारतात काय चित्र?

SIPRI report : भारतीय सीमाभागात एकिकडे पाकव्याप्त (POK) काश्मीरमधून (Kashmir) सातत्यानं देशात घुसखोरीचा प्रयत्न केला …