ज्ञानवापी मशीद प्रकरण: ASI सर्व्हे करण्यास परवानगी, वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; पण ठेवली एक अट

Gyanvapi Masjid Case: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्व्हे करण्यास परवानगी दिली आहे. वादग्रस्त जागा वगळता इतर ठिकाणी सर्व्हे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याप्रकरणी 14 जुलै रोजी सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. यानंतर कोर्टाने आज निर्णय दिला आहे. त्यानुसार, कोर्टाने आज वैज्ञानिक सर्व्हे करण्यास परवानगी दिली आहे. 

8 ऑगस्ट 2021 रोजी दिल्लीतल्या 5 महिलांनी वाराणसीच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. राखी सिंह या महिलांचं नेतृत्व करत होत्या. मशिदीच्या परिसरात श्रृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान, आदि विश्वेश्वर, नंदीजी आणि मंदिर परिसरात दिसत असलेली इतर देवी-देवतांचं दर्शन, प्रार्थना करण्याची परवानगी मिळायला हवी अशी त्यांची मागणी होती. तसंच मशिदीत शिवलिंग असल्याचाही त्यांचा दावा होता. पण हा पाण्याच्या झरा असल्याचा दावा दुसऱ्या पक्षाने केला आहे. 

काय आहे ज्ञानवापी प्रकरण?

– 1991 मध्ये स्थानिक पुजाऱ्यांनी वाराणसी कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनी ज्ञानवापी मशीद परिसरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. 16व्या शतकात औरंगजेबाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून तेथे मशीद बांधण्यात आली असा त्यांचा दाव होता. 

हेही वाचा :  Gyanvapi Mosque Case: 'कार्बन डेटिंग' म्हणजे काय रे भाऊ?

– मशिदीच्या आवारात हिंदू देवतांच्या मूर्ती असून त्यांना ज्ञानवापी मशिदीच्या आवारात पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. 1991 पासून वारंवार हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

– वाराणसीचे वकील विजय शंकर रस्तोगी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर मुद्दा पुन्हा तापला होता. ज्ञानवापी मशिदीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांनी मशिदीचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. 

– 2019 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. एप्रिल 2021 मध्ये वाराणसी न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला मशिदीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पण उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि ज्ञानवापी मशिदीची देखरेख करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने शंकर रस्तोगी यांच्या वाराणसी न्यायालयात केलेल्या याचिकेला विरोध केला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीत करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणालाही त्यांनी विरोध केला.

– 18 ऑगस्ट 2021 रोजी दिल्लीतल्या 5 महिलांनी वाराणसीच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. राखी सिंह या महिलांचं नेतृत्व करत होत्या. मशिदीच्या परिसरात श्रृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान, आदि विश्वेश्वर, नंदीजी आणि मंदिर परिसरात दिसत असलेली इतर देवी-देवतांचं दर्शन, प्रार्थना करण्याची परवानगी मिळायला हवी अशी त्यांची मागणी होती. 

हेही वाचा :  Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? 'मविआ'च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …