ग्रहांचा राजा सूर्यदेव ३० दिवस राहणार मित्रराशीत, ‘या’ तीन राशींना धनलाभाचा योग | Surya Grah Gochar In Meen Rashi Positive Impact on 3 Rashi


ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण किंवा उदय-अस्त होतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण किंवा उदय-अस्त होतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. मान आणि प्रतिष्ठेचा कारक असलेला सूर्य आपल्या मित्र गुरूच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याचा संबंध आदर आणि प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील, परंतु तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते.

वृषभ: सूर्याचे संक्रमण तुमच्या राशीतून अकराव्या स्थानात होत आहे. या स्थानाला उत्पन्नाचं स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्ही व्यवसायात चांगला नफा कमवू शकता. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. सूर्यदेव तुमच्या पाचव्या घराचा स्वामी आहे आणि तो दहाव्या भावात आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तसेच, या काळात तुम्ही वाहन खरेदी करण्याचा निर्णयही घेऊ शकता.

मिथुन: सूर्याचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण या काळात सूर्य देव तुमच्या दशम भावात प्रवेश करेल. या स्थानाला कर्म, नोकरी आणि करिअरचे घर म्हटले जाते. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतनवाढ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली सुधारू शकते, ज्यामुळे बॉस तुमच्यावर खूश असेल. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य ग्रह आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.

हेही वाचा :  Astrology: नातेसंबंधात प्रामाणिक मानले जातात ‘या’ ३ राशीचे लोकं, जाणून घ्या

Guru Uday 2022: १२ दिवसानंतर गुरु ग्रहाचा होणार उदय, या राशींना मिळणार लाभ

कुंभ: सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण तुमच्या दुसऱ्या घरात सूर्य देवाचे संक्रमण होत आहे. या स्थानाला धन आणि वाणीचे घर म्हणतात. यावेळी तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच, व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही मोठा करार निश्चित करू शकता. दुसरीकडे, ज्या लोकांचे करिअर भाषणाशी संबंधित आहे. जसे की मीडिया, फिल्म, वकील किंवा शिक्षक यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळ

गोव्यात पोलिसांना एकाच घरात दोन भावांचे मृतदेह आढळले होते. 29 आणि 27 वर्षीय भावांच्या निधनाची …

Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार …