दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भाव

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारीदेखील सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात एका आठवड्याच मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय वायदे बाजारात सोने 980 रुपयांनी घसरले आहे. तर, सकाळी 10 वाजण्याच्या सोन्याचे दर 72,440 रुपये इतके आहेत. तर, गुरुवारी सोन्याची किंमत 73,420 रुपये इतकी होती. 

सोन्याच्या दरात या संपूर्ण आठवड्यात तीन हजारांइतकी घट झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा दराने उच्चांक दर गाठत 75 हजारांपार पोहोचला होता. मात्र, आता सोने 72,440 वर पोहोचले आहे. सोन्याचे दर कोसळले असले तरी चांदीच्या दरात मात्र थोडी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून आज 90,888 रुपयांवर चांदी ट्रेड करत आहेत. तर मागील सत्रात चांदीचे दर 90,437 वर व्यवहार बंद झाला होता. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. यावर्षी आत्तापर्यंत यूएस स्पॉट गोल्डमध्ये 14 टक्क्यांने वाढले आहेत आणि 2,449.89 वर डॉलरचा दर उसळला आहे. मात्र, युएस फेडकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता यामुळं या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी स्पॉट गोल्डमध्ये 2.1 टक्क्यांची मोठी घट होऊन 2,328.61 प्रति डॉलरवर पोहोचले होते. 

हेही वाचा :  राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट   66, 400 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 440  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54, 330 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   6,640 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,244 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,433 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   53,120 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57,952 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43,464  रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  66, 400 रुपये
24 कॅरेट-  72, 440  रुपये
18 कॅरेट-  54, 330 रुपये

हेही वाचा :  Gold Rate : वर्षअखेरीस सोन्याचे दर 75 हजारांवर? आज 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायत 'इतकी' रक्कम



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …