पाकिस्तानातील कार्यक्रमात मुंबई हल्ल्याबद्दल बोलले जावेद अख्तर

Javed Akhtar:  पाकिस्तानामध्ये (Pakistan) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी हजेरी लावली होती. या कर्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. तसेच पाकिस्तानमधील कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) जावेद अख्तर यांचे भरभरुन कौतुक केले. 

काय म्हणाले जावेद अख्तर 
पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर म्हणाले, ‘आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला कसा झाला? ते आम्ही पाहिले. ते लोक ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून आले होते, ते अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे याबद्दल जर एखाद्या भारतीयाची तक्रार असेल तर तुम्हाला याबद्दल वाईट वाटू नये.’ त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

पुढे ते म्हणाले, ‘आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही.’

कंगनानं केलं कौतुक
पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ कंगनानं शेअर केला. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, ‘जेव्हा मी जावेद साहेबांची कविता ऐकते तेव्हा मला वाटायचे की, सरस्वतीची त्यांच्यावर कृपा आहे. पण हे लक्षात ठेवा, यांच्यामध्ये खरेपणा देखील आहे त्यामुळे देव त्यांच्या पाठिशी आहे. जय हिंद! घर में घुसकर मारा हा हा…’ 

कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 

हेही वाचा :  Wedding Bells : यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार रश्मिका अन् 'हा' अभिनेता, अफेअरच्या चर्चांना उधाण!

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kangana Ranaut: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडताच कंगना भडकली; ‘माफिया’ म्हणत शेअर केली पोस्ट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …