राजकारणापासून दूर राहा : कंगना रनौत

Kangana Ranaut On Bollywood : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटरवर परतली असून ‘पठाण’ सिनेमासंदर्भात सलग ट्वीट करत आहे. आता कंगनाने ट्वीट करत बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे. 

आलिया भट्टपासून करण जौहरपर्यंत अनेक सेलिब्रिटी ‘पठाण’ सिनेमाचं आणि शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. आता या बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधत कंगनाने लिहिलं आहे,”बॉलिवूडकरांनो ‘द्वेषावर विजय’ असं जर मी पुन्हा ऐकलं तर मला पुन्हा एकदा तुमची शाळा घ्यावी लागेल. तुम्ही चांगलं काम करा आणि तुमच्या यशाचा आनंद घ्या. राजकारणापासून दूर राहा”. 

‘पठाण’ सारखे सिनेमे चालायला हवे : कंगना रनौत 

कंगना रनौत याआधी ‘पठाण’च्या यशाबद्दल बोलताना म्हणाली,”पठाण’ एक चांगला सिनेमा आहे. अशा पद्धतीचे सिनेमे चालायला हवेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार सिनेमा बनवण्याचा विचार हिंदी सिनेसृष्टीतील मंडळी करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत हिंदी सिनेसृष्टी पुन्हा एकदा बहरेल”. 

हेही वाचा :  हा थ्रिलर चित्रपट पाहताना स्क्रिनवरुन नजर हटणार नाही, संजय मिश्रा यांचा दमदार अभिनय

कंगनाचा ‘धाकड’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. यावर ट्वीट करत एका यूजरने लिहिलं आहे,”कंगना जी. ‘धाकड’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 55 लाखांची कमाई केली होती. तर या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे शाहरुखच्या ‘पठाण’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. निराशा तर झालीच असेल”. 

कंगना उत्तर देत म्हणाली आहे,”मी मान्य करते ‘धाकड’ हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. पण एसआरकेचा गेल्या दहा वर्षात सुपरहिट होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. ही गोष्ट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भारतीय सिनेरसिकांनी आज शाहरुखला पाठिंबा दिला आहे. उद्या आम्हाला देतील. भारत महान आहे. जय श्री राम”. 

संबंधित बातम्या

Pathan Worldwide Box Office Day 3 : तीन दिवसात 300 कोटी, जगभरात शाहरुखच्या ‘पठाण’चा जलवा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …