महिलांमध्ये दिसतात मधुमेहाची ही ६ लक्षणे दिसतात, आजच सावध व्हा

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जो आज जगभरात वेगाने पसरत आहे. भारतामध्ये डायबिटीक्स म्हणजेच मधुमेह हा आजार झपाट्याने वाढत आहे. दुर्दैवाने मधुमेहावर कोणताही इलाज नाही. मधुमेहामुळे रक्तातील साखर वाढू लागते, ज्यामुळे रुग्णाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर आपण मधुमेहाच्या लक्षणांबद्दल बोललो तर, वारंवार लघवी होणे, जास्त तहान-भूक लागणे, अंधुक दिसणे किंवा लघवीमध्ये जळजळ होणे ही सामान्य लक्षणे आहेत, जी सर्वांमध्ये दिसून येतात. पण महिल्यांमध्ये मधुमेहाची काही वेगळी लक्षणे देखील दिसू शकतात. काही गोष्टीकडे लक्ष ठेवून तुम्ही मधुमेहापासून लांब राहू शकता. (फोटो सौजन्य:- @istock)

UTI संसर्गाची लक्षणे

uti-

NCBIवर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार , महिलांच्या योनीतून बुरशीजन्य संसर्ग आणि UTI संसर्ग यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात. महिलांमध्ये मधुमेहाची इतर कोणती लक्षणे दिसू शकतात ते जाणून घेऊया.

UTI संसर्गाची लक्षणे

एनसीबीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की मधुमेहाची काही लक्षणे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वेगळी असू शकतात. उदाहरणार्थ, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या स्त्रियांना योनीतून बुरशीजन्य संसर्ग आणि वारंवार यूटीआयची समस्या असू शकते

हेही वाचा :  बापरे! इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकाचे 11 बळी, अचानक समोर आला राखेनं माखलेल्या तरुणीचा भयंकर VIDEO

लैंगिक संक्रमित रोगांचे लक्षणे

लैंगिक संक्रमित रोगांचे लक्षणे

Diabetes.org.uk ने अहवाल दिला आहे की मधुमेह असलेल्या महिलांना मासिक पाळीत अनियमितता, वंध्यत्वाचे विकार आणि लैंगिक बिघडलेले कार्य, कामवासना कमी होणे आणि योनीमार्गात कोरडेपणा यांचा समावेश होतो.

(वाचा :- घाण आणि कमकुवत नसांना साफ करते हे एक चमत्कारी फळ, खुद्द पोषणतज्ज्ञांनी सांगितले फायदे) ​

महिलांना मधुमेहाचा धोका अधिक का असतो

महिलांना मधुमेहाचा धोका अधिक का असतो

असे मानले जाते की पुरुषांपेक्षा स्त्रियांना मधुमेहाचे निदान होण्याची शक्यता कमी असते. याचे कारण असे की गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांसारख्या घटकांमुळे महिलांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो आणि त्यांना मधुमेहाचा धोका असतो. याव्यतिरिक्त, स्त्रियांना मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असू शकतो, त्याचप्रमाणे हृदयरोग आणि नैराश्य यांसारख्या गोष्टी सामन्यपणे जाणवतात.

(वाचा :- Reduce Cholesterol: या 8 नैसर्गिक उपायांनी घाणेरडा कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवा, औषधांची गरज ही भासणार नाही)

मधुमेहाची लक्षणे

मधुमेहाची लक्षणे

यीस्ट इन्फेक्शन आणि UTI टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. यूटीआयला प्रतिबंध करण्याच्या इतर काही मार्गांमध्ये भरपूर पाणी पिणे, सूती अंतरवस्त्र घालणे आणि मूत्राशय भरेपर्यंत थांबण्याऐवजी वेळेवर लघवीला जाणे या गोष्टीचा समावेश होतो.

हेही वाचा :  White Hair Remedies : पांढरे केस होतील चुटकीमध्ये काळेभोर व चमकदार, 1 रूपयाही न खर्च करता घरच्या घरी बनवा ‘हा’ नॅच्युरल उपाय..!

(वाचा :- Ways to Reduce Uric Acid: ना औषध, ना पथ्यपाणी फक्त या 8 गोष्टी करा, युरीक अ‍ॅसिड रक्तातूनच खेचून वेगळे होईल)

हृदयरोगाशी संबंधित लक्षणे

हृदयरोगाशी संबंधित लक्षणे

heart.org​ च्या अहवालात असे नमूद केले आहे की मधुमेह असलेल्या महिलांमध्ये पुरुषांपेक्षा तीन ते चार पटीने हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला हृदयाशी संबंधित लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

(वाचा :- Reduce Period Pain: मासिक पाळीत होणाऱ्या असह्य वेदनांपासून ही 20 रुपयांची गोष्ट देईल आराम) ​

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे

सीडीसीच्या मते , मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. असा आहार घ्यावा ज्यामध्ये फायबर जास्त असेल. आहारात भरपूर भाज्या, कमी चरबी, कार्बोहायड्रेट आणि प्रथिनांचे प्रमाण चांगले घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न, अल्कोहोल आणि गोड पेये यांचे सेवन टाळा.

(टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :  पुण्यात पाणी भरताना वाद, शेजाऱ्याने पोटात लाथ घातली, महिलेने गमावले बाळ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …