सहकाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी उठवलं पण…; दर्शन घेऊन घरी निघालेल्या वारकऱ्याचा वाटेतच मृत्यू

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : वारकऱ्याचं (warkari) आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे आषाढी निमित्त दर्शन घेऊन घराकडे जाण्यासाठी बसमधून (ST Bus) प्रवास करत असताना वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परभणीमध्ये (Parbhani News) समोर आली आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी पंढरपूर ते अकोला या धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने एका वारकरऱ्याचा मृत्यू झाला. पंढरीची वारी करुन घराकडे परतत असताना वारकऱ्याची प्राणज्योत मालवलीय. वारकऱ्याच्या मृत्यूनं अकोल्यामध्ये शोककळा पसरली आहे.

ही घटना परभणीच्या गंगाखेड येथे बस पोहोचल्यावर उघडकीस आलीय. नरेंद्र अनंतराव कळणे असे मृत वारकऱ्याचं नाव आहे. नरेंद्र अनंतराव कळणे हे अकोला शहरातील डाबकी रोड भागातील सरस्वती नगर येथील रहिवासी होते. आषाढीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन करून परतताना नरेंद्र अनंतराव कळणे यांचा मृत्यू झाला. वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याच समजताच गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

विठुरायाचे दर्शन करण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात. वारकरी नरेंद्र कळणे हे एम एच 40 सीएम 3520 या क्रमांकाच्या बसने पंढरपूरवरून अकोला जिल्ह्याकडे निघाले होते. बस परभणीच्या गंगाखेड रोडवरील धैर्य मंगल कार्यालयाजवळ आली असताना वारकरी चहापाणासाठी खाली उतरले होते. मात्र बसमधील सर्व वारकरी हे खाली उतरलेले असताना नरेंद्र अनंतराव कळणे हे बसमध्येच बसले होते. त्यानंतर बसमधल्या इतर वारकरी कळणे यांना नाष्टा चहापाण्याची विचारपूस करण्यासाठी बसमध्ये चढले. मात्र नरेंद्र अनंतराव कळणे हे काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बसचालकाने बस थेट गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणलं. मात्र तिथे असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नरेंद्र कळणे यांना तपासून मृत घोषित केले. कळणे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा :  असं काय घडलं? बायकोने नवऱ्याला चिमट्याने धुतलं अन् त्यानं पोलीस स्टेशन गाठलं!

पंढपुरला निघालेल्या भाविकाचा भीषण अपघातात मृत्यू 

गुरुवारी साताऱ्याच्या माण तालुक्यातील लोधवडेजवळ पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडी अपघात झाला होता. या अपघातात बोलेरो गाडी पूर्णपणे चेपली. या भीषण अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले होते. तर कल्याण भोसले नावाच्या भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावचे रहिवासी होते. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात हलवले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …