डायबिटीज व ब्लड प्रेशरने होतो पायांचा अल्सर, ही 3 भयंकर लक्षणं मृत्यूची घंटा, करा हे 7 उपाय

Diabetes Symptoms in Legs : भारतात लाखो लोक मधुमेहासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. मधुमेही रुग्णांच्या या मोठ्या संख्येमागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना मधुमेहाची लक्षणे आणि तो बरा कसा होतो याबाबत पूर्ण माहिती नसते. हे अज्ञान दूर करण्यासाठी इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी “वर्ल्ड डायबिटीज डे” (World diabetes Day) साजरा केला जातो.

वर्ल्ड डायबिटीज डे 2022 : डायबेटोलॉजिस्ट-एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि कन्सल्टंट फिजिशियन डॉ. अर्पण भट्टाचार्य सांगतात की, जेव्हा मधुमेही रुग्णांना उच्च रक्तदाब (High blood pressure or hypertension) सुद्धा असतो तेव्हा पायांमध्ये अल्सर (Foot ulcer) तयार होऊ शकतो. तसेच, जर तुम्हाला आधीासूनच फूट अल्सर असेल तर ही परिस्थिती अजूनच गंभीर बनू शकते.

डायबिटीज नेमका काय आहे?

डॉ अर्पण सांगतात की, डायबिटीज हा एक क्रॉनिक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते. त्याला डायबिटीज मेलिटस (Diabetes mellitus) असेही म्हणतात. टाईप 2 मधुमेहामध्ये तुमचे शरीर रक्तातील साखर नियंत्रित करणार्‍या इन्सुलिन हार्मोन्सचे उत्पादन कमी करते किंवा असंवेदनशील बनते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढू लागते.

हेही वाचा :  “महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत...”, अजित पवारांबाबत चर्चांना उधाण असतानाच सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

(वाचा :- Toxic Gut : आतड्यांत घाण व विषारी पदार्थ साचल्यास शरीर देतं हे 5 भयंकर संकेत, हे 5 नैसर्गिक उपाय करतात आतडी साफ)

हायपरटेन्शन काय आहे?

ब्लड प्रेशरला हायपरटेन्शन असेही म्हणतात. या आजारात शरीरात सामान्यपेक्षा जास्त दाबाने रक्त वाहू लागते. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर आणि अवयवांवर खूप दाब पडतो. डॉ. भट्टाचार्य यांच्या मते, जर तुमच्या रक्तदाबाची पातळी 130/80 mmHg पेक्षा जास्त असेल तर त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात.

(वाचा :- पोट साफ होण्यासाठी, वेटलॉस, इम्युनिटी, केसगळती, ग्लोइंग स्किनसाठी खा फक्त हे 1 फळ, ही आहे खाण्याची योग्य पद्धत)

डायबिटीज व हायपरटेन्शनमुळे पायांचा अल्सर

हाय ब्लड प्रेशर हा आजार पेरिफेरल वॅस्कुलर डिजीज (Peripheral Artery Disease) रोगाचा धोका वाढतो. जे अनेकदा मधुमेही रुग्णांमध्ये दिसून येते. पायात अल्सर होण्याचे हे एक प्रसिद्ध कारण आहे. या आजारात पायापर्यंत ऑक्सिजन आणि पोषण कमी पोहचते. त्याचवेळी, पायातील विषारी घटक किंवा टॉक्सिन्स काढून टाकण्याचे काम पेशी हळूहळू करू लागतात. त्यामुळे पायात अल्सर म्हणजेच जखमा होऊ लागतात.

(वाचा :- दूध पिऊन व कॅल्शियम पदार्थ खाऊन होणार नाही हाडं मजबूत, जीवनभर हाडे लोखंडासारखी टणक ठेण्यासाठी हवं हे 1 व्हिटॅमिन)

हेही वाचा :  Cancer Causing Food : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत 9 पदार्थ, तरीही दररोज खातात

अजून एक कारण

डॉ. अर्पण यांच्या मते, 130/80 mmHg पेक्षा जास्त रक्तदाबामुळे एंडोथेलियल जखम येऊ शकते. जे पायाच्या अल्सरचे रूप घेऊ शकतात. मधुमेहाच्या रूग्णांमध्ये पायाचे अल्सर तयार होतात, विशेषत: रक्तवाहिन्यांच्या एथेरोस्क्लेरोसिस रोगामुळे ही समस्या होते.

(वाचा :- विराट कोहली, मलायका अरोरासारख्या सुपरफिट लोकांच्या दीर्घायुषाचे रहस्य आहे हे खास पाणी, कधीच पित नाहीत साधं पाणी)

फूट अल्सरची 3 लक्षणे

-3-

UPMC युनिव्हर्सिटीच्या मते, जेव्हा पायाला जखम होते तेव्हा 3 मुख्य लक्षणे (diabetic foot ulcer symptoms) दिसतात. यामध्ये पाय, तळवे किंवा बोटांमध्ये वेदना, सूज आणि जळजळ यांचा समावेश होतो. जर तुमच्या पायाच्या जखमा बराच काळ बऱ्या होत नसतील तर त्याला फुट अल्सर असेही म्हणतात.

(वाचा :- वाढत्या प्रदूषणाने फुफ्फुसाचे भंयकर आजार, फुफ्फुसे निकामी होऊ नये म्हणून घरबसल्या शरीरातून अशी काढा घाणेरडी हवा)

डायबिटीजच्या लोकांनी या 7 टिप्स फॉलो कराव्यात

-7-

डॉ अर्पण भट्टाचार्य यांच्या मते, जर तुम्हाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे होणारा पायाचा अल्सर टाळायचा असेल तर खाली दिलेल्या या 7 टिप्स अवश्य फॉलो करा.

  1. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा.
  2. रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
  3. धूम्रपान आणि मद्यपान सोडा.
  4. कोलेस्टेरॉल वाढू देऊ नका.
  5. योग्य प्रकारे फिटिंगचे बूट आणि मोजे घाला.
  6. नियमित वैद्यकीय तपासण्यांमध्ये तुमच्या पायांची डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
  7. पायाची नखे कापताना कोणतीही इजा किंवा कट होणार नाही याची काळजी घ्या.
हेही वाचा :  काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral

(वाचा :- रॉकेट स्पीडने पसरतोय RSV Virus, डोळे, नाक, तोंडातून घुसून दाखवतो ही 11 भयंकर लक्षणं, मुलं व वृद्धांसाठी जीवघेणा)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …

होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather News : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अकाळी पावसाचा मारा …