iPhone बिघडला, खाली पडला तरी नो टेन्शन; फ्रीमध्ये होईल रिपेअर, फक्त करा ‘हे’ एक काम

iPhone News: आयफोनची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. तरीही काही जणांचे आयफोन घेण्याचे स्वप्न असते आणि ते खरेदीही करतात. मात्र, इतका महागडा आयफोन घेऊनही तो खराब झाला किंवा काही बिघाड झाला तर खर्चाचा मोठा फटका बसतो. पण आता टेन्शन घेण्याचं गरज नाहीये. आयफोन घेतानाच ही एक गोष्ट केली तर कित्येक वर्ष तुम्हाला टेन्शन घेण्याची गरजच नाही.    

आयफोन खरेदी करत असतानाच तुम्ही अॅपल केअर प्लस खरेदी करा. हा एक फिक्स टर्म प्लान आहे. यामध्ये तुमच्या आयफोनमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास स्मार्टफोन मोफत रिपेअर करुन दिला जाईल. या प्लानची वैधता साधारणतः 2 वर्षांपर्यंत असते. यात बॅटरी, अनेक प्रकारचे डॅमेज आणि अॅक्सिडेंटल डॅमेज कव्हरेज मिळते. अॅपल केअरसोबत 1 वर्षांपर्यंतचा कव्हरेज प्लानदेखील आहे. यात 90 दिवसांचा कॉम्पीमेंट्री टेक्निकल सपोर्टदेखील मिळतो. 

AppleCare+ प्लानमध्ये कोणत्या सुविधा मिळतात?

आयफोनसाठी AppleCare+ प्लान एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुमच्या स्मार्टफोनसाठी 2 वर्षांची वॉरंटी आणि एक्सीडेंटल डॅमेज प्रोटेक्शन मिळते. प्लानमध्ये 2500 रुपयांचे फ्री बॅक ग्लास डॅमेज प्रोटेक्शन आणि 8900 रुपयांचे एक अमलिमिटेड एक्सीडेंटल डॅमेज प्रोटेक्शन मिळते. जर तुमच्या फोनची बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत डाउन होत असेल तर ती ओरिजनल बॅटरीने रिप्लेस केली जाईल. 

हेही वाचा :  Tata च्या गाड्या आता आवाजाने कंट्रोल होणार, नवं फिचर

कोणत्या प्लानसाठी किती किंमत 

AppleCare+ प्लानची किंमत iPhone मॉडेलनुसार वेगवेगळी आहे. iPhone 15 प्रो आणि iPhone 15 प्रो मॅक्ससाठी या प्लानची किंमत 20,900 रुपये आहे. तर, iPhone 15 प्लस आणि iPhone 14 प्लसचा प्लान 17,900 रुपयांमध्ये येतो. तर, iPhone 15, iPhone 14 आणि iPhone 13 साठी 14,900 रुपये द्यावे लागणार आहेत. तर, iPhone SE 3 साठी 7900 रुपये द्यावे लागणार आहेत. 

कसा खरेदी कराल

AppleCare+ प्लान खरेदी करण्यासाठी तुम्ही iPhoneसोबत किंवा iPhone खरेदी केल्यानंतर 60 दिवसांच्या आत खरेदी करु शकता. प्लान खरेदी करण्यासाठी iPhone आणि प्लान तुम्ही स्टोअरमध्ये खरेदी करु शकता.      Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Appleच्या वॉरंटी पॉलिसीमध्ये मोठा बदल; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री?

Apple Warranty Check: Apple कंपनीने त्यांच्या रिपेअर आणि वॉरंटी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या …

14 लाखांमध्ये 8 सीटर कार मिळत असताना का खरेदी करायची 5 किंवा 7 सीटर कार?

Best MPV 8 Seater Cars in India : भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खासगी वाहनांना मिळणारी …