शिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूक

India News : जागतिक अर्थव्यवस्थेवर (world Economy) प्रचंड ताण आल्यामुळं एकिकडे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची सत्र सुरु असतानाच भारतात मात्र चित्र काहीसं वेगळं असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या सकारात्मत आणि संतुलित वेगानं पुढे जात असून, नागरिकांच्या अर्थार्जनासह त्यांच्या खर्चाचा आकडा पाहता हीच बाब सिद्ध होताना दिसत आहे. 

भारतीयांच्या खात्यात येणारी रक्कम, पगार (Salary), आर्थिक मोबदला किंवा आणखी इतर माध्यमांतून येणारे पैसे देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नेमके कुठे खर्च करत आहेत, कुठे गुंतवत आहेत यासंदर्भात आरबीआय (RBI)नं नुकताच एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार मागील वर्षभरात भारतीयांनी परदेशी पर्यटनावर आणि परदेशात एकूण 31.7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 2.64 लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीयांनी खर्च केलेली ही रक्कम 17 टक्क्यांहून जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. 

भारतीयांनी कुठे खर्च केला सर्वाधिक पैसा? 

आतापर्यंत भारतीयांचा कल परदेशातील शैक्षिक खर्चाकडे दिसून येत होता. पण, गेल्या दोन वर्षांमध्ये मात्र ही परिस्थिती बदलताना दिसली असून, आता देशातील नागरिकांनी परदेशात जाऊन शिक्षणाऐवजी परदेशवारी अर्थात पर्यटन, भटकंतीसाठीच अधिक पैसे खर्च केले असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. तुलनेनं शिक्षणासाठी करण्यात आलेल्या खर्चात मात्र घट झाली. 

हेही वाचा :  विवाहित महिलेवर प्रेम करणं तरुणाला भोवलं, हाल करुन केली हत्या; मुंडकं छाटलेला मृतदेह पाहून वडीलही हादरले

भारतीयांना मागील वर्षी 1.42 लाख रुपये परदेशातील भटकंतीसाठी खर्च केले. भारतीय व्यक्तींकडून परदेशातील एकूण खर्चापैकी हे प्रमाण 53.6 टक्के असल्याचं सांगण्यात आलं. तर, त्याआधी हा आकडा 24.5 टक्के इतका असल्याचं सांगण्यात आलं. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पर्यटनावरील खर्चात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, तर शिक्षणासाठीच्या खर्चात सुमारे 33 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली. 

फक्त पर्यटनच नव्हे, तर परदेशात गुंतवणुकीतही भारतीयांनी मोठं आर्थिक योगदान दिल्याचं पाहायला मिळालं. स्थावर मालमत्ता आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे भारतीयांचा कल दिसून आला. याशिवाय परदेशात असलेले नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठीही भारतीयांनी मोठा खर्च केल्याचं पाहायला मिळालं. अधिकृत आकडेवारीनुसार मागील वर्षभरात भारतीयांनी परदेशातील नातेवाईकांना 4.6 अब्ज डॉलरच्या भेटवस्तू दिल्या. या खर्चात आतापर्यंत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. वरील एकंदर आकडेवारी पाहता, भारतीयांचा पैसा नेमका कुठं खर्च होतोय याचं अगदी स्पष्ट चित्रच आरबीआयनं सर्वांसमोर आणलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …