बॉक्सर्सकडून सुवर्ण हॅट्रिक, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, सर्वाधिक पदकं

Khelo India Youth games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुष्टियुद्ध खेळाडूंनी आज सुवर्ण हॅट्रिक साधली. पण, याच प्रकारातील हरियाणाच्या अपेक्षित यशाने महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले आणि हरियाणाने मुसंडी मारून पहिला क्रमांक पटकावला. यजमान मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानावर राहिले. महाराष्ट्राकडून आज सारा राऊळ (जिम्नॅस्टिक), देविका घोरपडे, कुणाल घोरपडे, उमर शेख (मुष्टियुद्ध)  यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळे, संज्ञा कोकाटेचे यश कायम राहिले. ॲथलेटिक्समध्ये रिले शर्यतीत मुलींनी सुवर्ण कामगिरी केली.

जिम्नॅस्टिक – साराला सुवर्ण

जिम्नॅस्टिक फ्रकारात सारा राऊळने महाराष्ट्राचे सुवर्ण खाते उघडले. मुलींच्या सर्वसाधारण क्रीडा प्रकारात तिने सुवर्णपदकाची कमाई केली. ठाणे येथे महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या साराने ३९.३३४ गुणांसह हे यश मिळविले. या कामगिरीत साराने फ्लोअर एक्सरसाईजवर दाखवलेले वर्चस्व निर्णायक होते. बॅलन्सिंग बीमवर देखील साराची कामगिरी कौतुकास्पद राहिली. महाराष्ट्राच्या रियाला ३६.२६६ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांच्या वैयक्तिक प्रकारात आर्यन दवंडेने फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राचाच मानन कोठारी  ब्रॉंझपदकाची मानकरी ठरला. सर्वसाधारण प्रकारात पहिल्या दिवशी रौप्यपदक मिळविणाऱ्या आर्यनला आजही रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. आर्यनने १२.०३३ गुणांची कमाई केली. मानने ११.६३३ गुण झाले. 

हेही वाचा :  Rishabh Pant : धोनीच्या 'या' खास रेकॉर्डवर ऋषभ पंतची नजर, कसोटी सामन्यात करु शकतो कमाल

संध्याकाळच्या सत्रात कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये आर्यनने स्पर्धेतील वैयक्तिक तिसऱ्या पदकाची कमाई केली. मुलांच्या स्टिल रिंग (स्थिर रिंग) प्रकारात आर्यनला ११.८६७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तालबद्ध प्रकारात ठाण्याच्या संयुक्ता काळेने ९५.२५ गुणांसह रौप्यपदक पटकावले. 

‘पदार्पणातील सुवर्णपदकाचा आनंद वेगळाच’

माझी ही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा होती. मात्र, मी या स्पर्धेसाठी चांगला सराव केला होता आणि सर्वोत्तम कौशल्य दाखवण्याचे माझे ध्येय होते. त्यामुळेच मी कोणतेही दडपण न घेता प्रत्येक प्रकारात शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला. या पहिल्याच प्रयत्नात मोठ्या व्यासपीठावर सुवर्णपदकाचा मान मिळविणे माझ्यासाठी खूप अभिमानाचे आहे,अशी प्रतिक्रिया सारा राऊळने व्यक्त केले. 

मुष्टियुद्ध – देविका, उमर, कुणालला सुवर्ण

मुष्टियुद्ध प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राचे चार खेळाडू अंतिम फेरीत होते. यापैकी उमर अन्वर शेख, देविका घोरपडे, कुणाल घोरपडे या तिघां पुण्याच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली. उस्मान अन्सारीला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे मुलांच्या विभागात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर राहिले. युवा जागतिक विजेती देविका ही स्पर्धेची आकर्षण होती. तिनेही आपल्या लौकिकाला जासेशी कामगिरी करताना ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. मध्य प्रदेशाची काफी कुमारीविरुद्ध खेळताना यजमान प्रेक्षकांचा काफीला प्रचंड पाठिंबा होता. काफीच्या नावाचा गजर इतक्या जोरात होता, की एखादी प्रतिस्पर्धी निश्चित गांगरुन गेली असती. आंतरराष्ट्रीय अनुभव असणाऱ्या देविकाने प्रेक्षकांच्या आणि काफीच्या आव्हानाला अगदी सहज परतवून लावले. एकतर्फी विजयासह आसाममध्ये हुकलेले सुवर्ण मध्य प्रदेशात मिळविले. मुलांच्या ४८किलो वजन गटात उमरने पंजाबच्या गोपी कुमारचा असाचसहज पराभव केला. आक्रमकता आणि भक्कम बचाव असा सुरेख समन्वय साधत उमरने सोनेरी यश मिळविले. कुणालने ७१ किलो वजन गटात हरियाणाच्या साहिल चौहानला असेच सहज हरवले. या तीनही सुवर्णपदकाच्या कामगिरीतील एक समान धागा म्हणजे तिघेही पुण्याचे आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या मनोज पिंगळे शिष्य आहेत. ब्रॉंझपदक विजेती वैष्णवी ही देखिल पुण्याची आणि मनोज पिंगळेंच्याच मार्गदर्शनाखाली तयार झाली आहे. चौथ्या अंतिम लढतीत मुंबईच्या उस्मानला मणिपूरच्या एम. जादूमनीकडून पराभव पत्करावा लागला. 

हेही वाचा :  आयपीएलबाबत बाबर आझमला प्रश्न विचारला अन् पुढं काय झालं? तुम्हीच पाहा

सुवर्णपदकाचा विश्वास होता

स्पर्धेत चिवट आव्हान असले, तरी कठोर मेहनत घेतली असल्यामुळे सुवर्णपदकाची खात्री होती, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या देविका, कुणाल, उमर यांनी व्यक्त केली. प्रेक्षकांचा पाठिंबा प्रतिस्पर्धी खेळाडूंना अधिक मिळत असला तरी अखेरपर्यंत संयम राखल्याने हे यश मिळू शकले. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा, प्रशिक्षक आणि पालक यांचाही या यशात मोठा वाटा आहे, असेही या तिनही खेळाडूंनी सांगितले. 

ॲथलेटिक्स – एका सुवर्णासह पाच पदके

ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात मुलींनी ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. रिया पाटिल, इशिका इंगळे, गौरवी नाईक, ईशा रामटेके या चोघींनी ४९.०७ सेकंद वेळ देताना सुवर्णपदकावर नाव कोरले. मुलांच्या चमूला मात्र ४२.४१ सेकंदासह रौप्यपदकावर समधान मानावे लागले. महेश जाधव, संदीप गोंड, ऋषिप्रसाद देसाई, सार्थक शेलार यांचा या चमूत समावेश होता. मुलींच्य ३ हजार मीटर शर्यतीत कोल्हापूरच्या सृष्टि रेडेकरने १० मिनिट ८.०८ सेकंदासह रौप्यपदक मिळविले. मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत कोल्हापूरचा सार्थक शेलार (१३.८२ सेकंद) रौप्य, तर क्रीडा प्रबोधिनीच्या संदीप गोंडला (१३.९५ सेकंद) ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. 

हेही वाचा :  शेन वॉर्नचा ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ पाहिलाय का? कोणताही गोलंदाज करू शकला नाही अशी गोलंदाजी

सायकलिंग – पूजा, संज्ञाची छाप

स्पर्धेच्या सायकलिंगमधील ट्रॅक प्रकारात कोल्हापूरच्या पूजा दानोळे आणि मुंबईच्या संज्ञा कोकाटे यांनी सलग तिसऱ्या प्रकाराची नोंद केली. स्पर्धा प्रकारातील आव्हानात्मक आणि आकर्षक केरिन प्रकारात संज्ञा रौप्य, तर पूजा ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. ट्रॅक प्रकारात महाराष्ट्राने आतापर्यंत तीन सुवर्ण, ४ रौप्य आणि दोन ब्रॉंझपदके मिळविली आहेत. आता ८ आणि ९ फेब्रुवारीपासून जबलपूर येथे रोड रेस होतील.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …