Skin Care: त्वचेची काळजी घेण्यासाठी आवळा आहे उत्तम, बनवा असे फेसमास्क

आवळ्याचा वापर केसांसाठी अथवा अनेक रोगांवर उपयोगी ठरतो याची सर्वांनाच कल्पना आहे. पण आवळा केसांसह त्वचेसाठीही तितकचा फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आवळ्याचे अनेक फेसपॅक तुम्हाला त्वचा अधिक उजळ करण्यासाठी, त्वचेवरील डाग काढण्यासाठी आणि त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी उपयोगी ठरतात. आवळ्याचा उपयोग आपल्या त्वचेसाठी कसा करून घ्यायचा आणि घरगुती फेसमास्क कसे बनवायचे याबाबत ही माहिती. घरच्या घरी तुम्ही आवळ्याचा वापर करा आणि फेसमास्क बनवून चेहरा अधिक उजळा.

आवळा आणि दही

आवळ्यामध्ये असणारे व्हिटामिन सी हे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. तसंच यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्सह त्वचेचे फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून संरक्षण करण्यात उपयोगी ठरते.

 • २ चमचे आवळा पावडर घ्या
 • त्यामध्ये १ चमचा दही मिक्स करून घ्या
 • हे मिक्स केलेले मिश्रण चेहऱ्याला लावा आणि साधारण १० मिनिट्स तसंच ठेवा
 • त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा

नियमित या फेसमास्कचा वापर केल्यास, त्वचा अत्यंत स्मूथ होण्यास मदत मिळते आणि चेहऱ्यावर चमकदेखील येते.

आवळा आणि मध

आवळ्याचा रस तुम्ही डायरेक्ट त्वचेवर लावू शकता. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही तर त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार राहण्यास मदत मिळते.

 • आवळ्याची पावडर घ्या आणि त्यामध्ये काही थेंब मधाचे मिक्स करा
 • हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर व्यवस्थित लावा
 • साधारण १०-१५ मिनिट्स तसंच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा
हेही वाचा :  Dapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना 'इतक्या' मदतीची घोषणा

आठवड्यातून तीन वेळा असा प्रयोग केल्याने त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत मिळते. याशिवाय मध आणि आवळ्याच्या गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील मुरूमांचा त्रासही कमी होण्यास मदत मिळते. तसंच आवळ्यामधील गुणधर्म चेहऱ्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ देत नाहीत.

आवळा आणि साखर

आवळा आणि साखरेचे कॉम्बिनेशन हे तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्याचे काम करतात. याचा तुम्ही त्वचेसाठी स्क्रब म्हणून वापर करून घेऊ शकता. केवळ फेसमास्क म्हणून याचा उपयोग होत नाही. तर त्वचेवरील मृतकोशिका अर्थात डेड सेल्स काढण्याचे काम हे कॉम्बिनेशन करते.

 • आवळ्याच्या पावडरमध्ये थोडीशी साखर मिक्स करा
 • साखरेला पाणी सुटेपर्यंत तसंच ठेवा
 • हे तयार झालेले मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा
 • ५-१० मिनिट्स तसंच हलक्या हाताने मसाज करा आणि मग चेहरा धुवा

या मिश्रणाने त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास आणि त्वचेचा मूळ रंग येण्यास मदत मिळते. तसंच चेहरा अधिक तजेलदार दिसतो.

(वाचा – बहुगुणी आवळ्याचे करा सेवन, केसगळतीपासून ते हृदयरोगांपर्यंत असंख्य आजाराचा धोका होईल कमी)

आवळा आणि गुलाबपाणी

आवळ्याचे गुणधर्म आणि गुलाबपाणी एकत्र आल्याने चेहऱ्याला अधिक चमक आणि तजेलदारपणा मिळतो हे खरं तर वेगळं सांगायची गरज नाही. चेहरा निस्तेज दिसत असेल तर तुम्ही गुलाबपाण्याचा वापर करायलाच हवा. तसंच आवळ्यातील विटामिन सी चेहरा अधिक उजळ बनविण्यास मदत करतो.

 • गुलाबपाणी आवळ्याच्या रसात अथवा आवळ्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्या
 • हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा आणि साधारण १५ मिनिट्स तसंच ठेवा
 • त्यानंतर चेहरा धुवा
हेही वाचा :  हार्ट अटॅकनंतर सुष्मिताच्या नसांमध्ये घातले स्टेंट,आजच खायला घ्या जीव वाचवणारा हा पदार्थ

काही दिवसातच याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. त्वचा कोरडी राहणार नाही आणि त्वचेतील मऊपणा टिकविण्यास याची मदत मिळेल.

(वाचा -Amla fat cutter drink : पोट, मांड्या आणि कंबरेवरची चरबी सहज जाळण्यासोबतच कधीच होणार नाही डायबिटीज, रोज प्या ‘या’ फळाचा चहा!)

आवळा आणि कोरफड जेल

थंडीमध्ये बरेचदा चेहरा कोरडा पडतो. यासाठी मॉईस्चराईजरचा जास्त प्रमाणात वापर करण्यात येतो. पण बाजारातील मॉईस्चराईजर वापरण्यापेक्षा आवळा आणि कोरफड जेलचा वापर करावा. चेहऱ्याला मऊपणा देण्यासाठी याचा उपयोग होतो.

 • आवळ्याच्या रसात कोरफड जेल मिक्स करा
 • हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि हा फेसमास्क काही वेळ तसाच ठेवा
 • त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा

(वाचा – केस खूप गळताहेत ? टक्कल पडण्याची भिती वाटते, काळ्याभोर केसांसाठी आवळ्याचा वापर करा, काही दिवसातच फरक जाणवेल)

आवळ्याचे अन्य फेसमास्क

याशिवाय तुम्ही आवळ्याच्या अन्य फेसमास्कचाही वापर करून घेऊ शकता. आवळा हा अत्यंत गुणधर्मी असून त्वचेसाठी याचा चांगला वापर करून घेता येतो.

 • त्वचा चांगली राखण्यासाठी आणि त्वचेचे चांगले क्लिंन्झिंग करण्यासाठी तुम्ही आवळा आणि पपई मिक्स करून फेसपॅक तयार करा आणि रोज चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत मिळते
 • आवळ्याच्या ताज्या रसामध्ये कापूस बुडवा आणि मग हे चेहऱ्याला लावा. टोनरप्रमाणे याचा वापर करावा. आठवड्यातून २-३ वेळा तुम्ही याचा वापर करावा. चेहऱ्यावरील मुरूमांचे डाग आणि काळे डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो
 • आवळ्याची पेस्ट करून चेहऱ्याला लावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. अँटीएजिंग गुणधर्म असल्याने तुमचा चेहरा अधिक तरूण दिसतो
हेही वाचा :  Genital Tuberculosis: शरीराच्या या भागात TB झाला असेल तर आई होण्यास येतो अडथळा

तुम्हीही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये आवळ्याचा समावेश करून घेतलात तर त्याचे अनेक फायदे तुमच्या त्वचेला होऊ शकतात. याचा उपयोग करा आणि आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव सांगा.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …