थेट पंतप्रधानांचं उदाहरण देत जेपी नड्डांनी सांगितलं शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजेंचं भविष्य

Shivraj Singh Chauhan New Responsibility: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचे (Election Results) निकालही हाती आले. या निवडणुकांचे निकाल लागताच देशाच्या राजकीय पटलावर मोठा उलटफेर झाल्याचंही पाहायला मिळालं. काही बड्या नेत्यांची नावं सध्या मुख्य प्रकाशझोतातून मागे आलेली असली तरीही या नेत्यांना भविष्यात मोठी जबाबदारी सोपवण्याचीच तयारी भाजप करत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), वसंधरा राजे (Vasundhara Raje) आणि रमण सिंह (Raman Singh) यांची पुढील राजकीय कारकिर्द नेमकी कशी असेल याचे संकेत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिले आहेत. ‘नव्या कामाला लागा, असंच मी त्यांना सांगितलं आहे’, असं नड्डा यांनी स्पष्ट सांगितलं. या नेत्यांना नेमकं काय काम मिळणार, त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार असं विचारलं असता, ‘काम तर त्या सर्वांनाच मिळणार आणि राहिला प्रश्न त्यांना थेट दिल्ली दरबारी बोलवण्याचा तर त्यासंदर्भातील निर्णय आम्ही (पक्षातील वरिष्ठ नेते) मिळूनच घेऊ’, असंही त्यांनी सांगितलं. 

सध्या आपण नव्यानं पक्षबांधणीला लागलो असून, चौहान आणि राजे यांच्यासह रमण सिंह यांना नवी जबाबदारी सोपवणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं. या नेत्यांचा राजकारणातील आणि मुख्यमंत्रीपदाचा अनुभव पाहता भाजपमध्ये जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामालाही दुजोरा दिला जातो तिथे ही मंडळी तर मातब्बर राजकारणी आहेत त्यामुळं त्यांच्या योगदानाला साजेशी जबाबदारी देण्याच्या बाबतीत भाजप हात मागं घेणार नाही, किंबहुना प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेनुसारच काम मिळेल, असं विधान नड्डा यांनी करत येत्या काळात पक्षाचा नेमका अॅक्शन प्लॅन कसा असेल याचीच पुसटशी कल्पना दिली. 

हेही वाचा :  “ढूंढते रह जाओगे”, संजय राऊतांचा केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून भाजपावर खोचक टोला!

शिवराज सिंह चौहान यांच्या आजुबाजूला असणाऱ्या अनेकांनाच भाजपनं त्यांच्यासोबत वाईट केलं असं वाटत असेल. पण, या विचारसरणीचा फारसा विचार न करता जिथं तो विचार येतो तिथंच अडचणी उभ्या राहतात, त्यामुळं थेट संवाद साधत समस्येवर तोडगा काढण्यालाच पक्ष प्राधान्य देत असतो असं सांगितलं. 

नड्डा यांनी दिलं थेट पंतप्रधानांचं उदाहरण 

पक्षातील इतिहासात डोकावत नड्डा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचच उदाहरण दिलं. ‘पंतप्रधान मोदी (PM Modi) जेव्हा संघासाठी काम करत होते तेव्हा त्यांना अतिसामान्य कामं देण्यात आली होती. त्यांनी जिथं जी जबाबदारी मिळाली तिथंतिथं ती कामं केली. ही त्यांच्या नैतिकतेचीच ताकद होती. सध्या अनेक अशी मंडळी आहेत जी राजीनामा दिल्यानंतरही पक्षासाठी काम करत आहेत. आमच्या पक्षात प्रथम राष्ट्र, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर आपण स्वत: असंच काम होतं आणि या तत्त्वावर काम जगलं जातं’, असं नड्डा म्हणाले आणि आता त्यांच्या याच वक्तव्यानंतर देशातील राजकारणात या मोठ्या नेत्यांना पक्ष नेमकी कुठं आणि कोणती संधी देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …