FSSAI मध्ये विविध पदांच्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

FSSAI admit cards 2022: FSSAI ने विविध भरती परीक्षांसाठी प्रवेशपत्रे जाहीर केली आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India,FSSAI) ने आयटी सहाय्यक, हिंदी अनुवादक, ज्युनिअर असिस्टंट ग्रेड-1, अन्न विश्लेषक, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी आणि इतर भरती परीक्षांसाठी हॉल तिकीट जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. या परीक्षा २८,२९, ३० आणि ३१ मार्च २०२२ रोजी होणार आहेत.

FSSAI Admit Card 2022: असे करा डाऊनलोड
सर्वप्रथम FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जा.
‘FSSAI 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करा’ या लिंकवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी तुमचे युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा सारखी क्रेडेन्शियल्स एंटर करा.
प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

महापारेषणमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

ICT मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, २५ हजारपर्यंत मिळेल पगार

हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात काही अडचण असल्यास उमेदवारांना हेल्पलाइनवर संपर्क साधता येणार आहे. उमेदवार सर्व कामकाजाच्या दिवसांत ०२२-६१०८७५५८ (सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याशिवाय [email protected] वर ई-मेल पाठवू शकता.

हेही वाचा :  GATE 2022 Result: गेट परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

HPCL Recruitment 2022: सरकारी नोकरीची संधी; हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये भरती
उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राची प्रिंट आउट/हार्ड कॉपी सोबत नेणे आवश्यक आहे. तसेच त्यांना ओळखीचा पुरावा देखील सोबत ठेवावा लागणार आहे. अन्यथा परीक्षेला बसू दिले जाणार नाही. उमेदवारांना ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे दस्तावेज दाखवता येऊ शकतात. यासंदर्भातील अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळू शकणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Government Job साठी ‘या’ वेबसाइट्सवर अर्ज केलात तर बसेल भुर्दंड
मुंबई पालिकेच्या विद्युतपुरवठा आणि परिवहन विभागात भरती, दीड लाखापर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …