खुशीला संपवलं, आता तिच्याकडे जातो… फेसबुक लाईव्ह करत माथेफिरु प्रियकराने घेतला स्वतःचा जीव

Crime News : झारखंडची (Jharkhand News) राजधानी रांचीमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची हत्या (Boyfriend killed girlfriend) करुन स्वतःही जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार झारखंडमध्ये समोर आला आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर आरोपी प्रियकराने फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी (Jharkhand Police) घटनास्थळी पोहोचत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु केला आहे.

शुक्रवारी प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने पळ काढला होता. त्यानंतर त्याने फेसबुक लाईव्हवरुन आपण स्वतःला संपवत असल्याचे म्हटले होते. त्यावेळी हे फेसबुक लाईव्ह आरोपीच्या कुटुंबियांनी पाहिले आणि याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करुन त्याचा शोध घेतला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. प्रियकराने देखील आत्महत्या केल्याची माहिती  पोलिसांनी दिली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी माथेफिरु प्रियकराने प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी आरोपीने आत्महत्या केली. घटनास्थळी केवळ प्रियकराची बॅग सापडली आहे. प्रेयसीवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी प्रियकर पोलिसांपासून वाचवण्यासाठी पळत होता. दरम्यान, आरोपीच्या कुटुंबीयांना शनिवारी त्याने घरात स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून घटनास्थळ गाठले, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आरोपी प्रियकराला पकडण्यासाठी पोलिसांकडून शुक्रवारी रात्रीपासून तपास सुरू होती. पोलिसांनी सर्व बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवर तपास सुरु केला होता.

हेही वाचा :  तुम्हाला माहितीये विमानात 'हे' फळ घेऊन जाण्यास आहे बंदी, कारण...

नेमकं काय घडलं?

मृत प्रियकर आणि प्रेयसी दोघेही बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रहिवासी होते. दोघेही सुरुवातीला चांगले मित्र होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते असे म्हटले जात आहे. मात्र प्रेयसी दोन महिन्यांपासून प्रियकरावर कोणत्या तरी कारणाने रागावली होती. यामुळे ती प्रियकरासोबत बोलत नव्हती. याच रागातून शुक्रवारी प्रियकराने प्रेयसीवर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर तिथून पळ काढला. प्रियकर एका घरात लपून बसला होता. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करत आरोपीने हातात रिव्हॉल्व्हर घेऊन “मी खुशीला मारले आहे, आता मी स्वतःला मारत आहे… माझे लोकेशन पाठवले आहे, माझा 87 वाला नंबर सुरू आहे. तुम्ही लोक यावर फोन करू शकता. दीदीला लोकेशन पाठवले आहे. खुशीला मारलंय, आता मी तिच्याकडे जातोय… बाय-बाय,” असे म्हणत स्वतःचा जीव घेतला.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …