वडिलांच्या कामाची मुलीला वाटायची लाज, पण मोठी झाल्यावर जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

मोबाइल फोन किंवा गॅजेट्स अतिशय सफाईदारपणे वापरता येणे, हे आताच्या काळात अतिशय हुशार असल्याचं प्रमाण आहे. तुम्हाला जितके जास्त गॅजेट्स वापरता येतीतल तितके तुम्ही अप-टू-डे आहात, असा अंदाज लावला जातो. मात्र आपल्या पालकांसोबत असं होत नाही. अनेकदा आपल्या पालकांना बाहेर नेल्यावर त्यांना काही गोष्टी सहज करता आल्या नाहीत.

मोबाइल नीट उचलता आला नाही तर आपल्याला त्याची लाज वाटते किंवा आपण ती गोष्ट मनाला खूप लावून घेतो. किंवा कळत नकळत त्यांची मस्करी उडवणे. असंच काहीस प्राची ठाकुरसोबत झालं आहे. असं वागण्यामुळे पालक आणि मुलांमधील नातं खराब होतं. बिहारच्या एका तरूण मुलीची सोशल मीडियावर खूप जोरदार चर्चा रंगली आहे. प्राचीने सांगितलं की, आपल्या वडिलांच्या कामामुळे कायमच तिला रिजर्वेशन मिळालं आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​प्राचीचे वडिल काय काम करायचे

या मुलीने सांगितले की, जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला तिच्या वडिलांचे काम स्वीकारण्यास फारच संकोच वाटत होता. तिला वडिलांच्या कामाची खूप लाज वाटत होती. तिचे वडील पानवाला म्हणून काम करायचे आणि आज तिला याच वडिलांचा खूप अभिमान वाटतो.

हेही वाचा :  लग्नानंतरही जात नाहीयेत जुन्या प्रेमाच्या रोमॅंटिक आठवणी? असे व्हा दु:खातून कायमचे मुव्ह ऑन

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

​काय आहे प्राचीची गोष्ट

बिहारची प्राची ठाकूर आता अशा लाखो मुलांसाठी प्रेरणा बनली आहे. पण या प्राचीला एकेकाळी आपल्या वडिलांच्या कामाचा संकोच किंवा लाज वाटत होती. प्राचीने 4 महिन्यांपूर्वी लिंक्डइनवर तिची कथा शेअर केली होती.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

प्राचीची गोष्ट समजून घ्या

​​प्राचीला वाटायची लाज

प्राचीने तिच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, तिला लहानपणी वडिलांच्या कामाची खूप लाज वाटायची. ‘तुझे वडील पानाचे दुकान चालवतात’ असे लोक तिला सांगायचे. प्राचीच्या भावाच्या एका मैत्रिणीने तिला सर्वांसमोर हे सांगितले तेव्हा ती घरी आल्यावर खूप रडली. प्राचीची इच्छा होती की तिच्या वडिलांनी इतरांप्रमाणे मोठे दुकान चालवावे. मोठं काही तरी काम करावं.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​तरी देखील उत्तम संगोपन

प्राचीने सांगितले की, तिच्या शहरात दहावीनंतर मुलींची लग्ने होतात. पण तिच्या वडिलांनी तिला पुढील शिक्षणासाठी प्रेरित केले. जिथे संध्याकाळनंतर मुलींना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती, तिथे तिचे वडील तिला रात्रीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करण्यासाठी मदत करतं. तिच्या वडिलांनी तिला आत्मविश्वास दिला.

हेही वाचा :  लग्नानंतरची पहिली होळी अशी साजरी करणा-या जोडप्यांच्या आयुष्यात येते..!

(वाचा – तुम्हालाही आई म्हणून क्रांती रेडकर सारखा अनुभय आलाय? मुलं, आजी-आजोबा आणि त्यांचा गोंधळ…))

​वडिलांचा वाटतो खूप अभिमान

प्राचीला आज तिच्या वडिलांनी दिलेल्या संगोपनाचा अभिमान आहे. प्राचीच्या वडिलांनी कधीही आपल्या मुलीवर समाजाच्या रूढींना वर्चस्व गाजवू दिले नाही. त्याला अभ्यासापासून दूर नेले नाही तर पुढे जाण्यास मदत केली. प्राचीने तिच्या वडिलांच्या मदतीने पॉंडिचेरी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

(वाचा – आलिया भट्टला मुलीकरता आवडलं ‘हे’ नाव, तुम्हालाही वाचून होईल अतिशय आनंद)

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …