कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांवर MPSC अभ्यासक्रमात अन्याय; राज्यभर विद्यार्थ्यांचे आंदोलन

– प्रसाद रानडे, रत्नागिरी
परत द्या, परत द्या,आमचा हक्क परत द्या…कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय…आशा घोषणा देत राज्यातील चारही कृषी अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोकणात दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी हे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. कुलसचिव डॉ.बी.आर.साळवी यानाही या विषयातील विद्यार्थी प्रतिनिधीकडून निवेदन देण्यात आले.

श्रीकांत भागवत, काकासाहेब लोंगटे, ऋषिकेश पाठाराकर,प्राजक्ता केसकर,निकिता कानडे, पुष्पमाला पाटोळे या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. MPSC च्या कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यावर मोठा अन्याय झाला असून यावर्षी बदललेल्या अभ्यासक्रमात केवळ १६ मार्कांचा समावेश असल्याने राज्यातील कृषीअभियांत्रिकी विषयाचे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. हा अन्यायकारक अभ्यासक्रम तात्काळ बदलावा व आम्हाला न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली आहे. १६ जून रोजी आयोगाने घोषणा केली. मात्र ४. ३ वर्षानंतर परीक्षा होत असून या जाहिरातीपूर्वी ८ दिवस आधी मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात अन्यायकारक बदल करण्यात आला.

हेही वाचा :  MPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर, 'येथे' करा डाउनलोड

कृषी अभियंत्यांची समान संधीचा हक्क डावलण्यात आला आहे. जसा Engineering पदवीधारक आहे म्हणून Computer Engineering शिकलेल्या विद्यार्थ्याला Mechanical Engineering चा अभ्यासक्रमावर आधारित पेपर देण्यास सांगितल्यास त्याची जी अडचण होईल तीच अडचण सध्या MPSC ने जाहीर केलेल्या नवीन कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाने निर्माण झाली आहे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रम तयार करावा व ज्यामध्ये कृषि अभियांत्रिकी व कृषि विद्याशाखेच्या अभ्यासक्रमास समान गुण भारांकन असावे. कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना कृषि पदवीधराप्रमाणे मुख्य परीक्षेच्या पेपर-१ व पेपर-२ च्या अभ्यासक्रमात व गुण भाराकानाची समान संधी निर्माण करून द्यावी. MPSC इतर पदाच्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाप्रमाणे कृषि सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पदाशी संबंधीत कर्तव्य जबाबदाऱ्यांशी संबंधित असावा.
नवीन संतुलित अभ्यासक्रम निर्माण होईपर्यंत जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी, परंतु नवीन न्यायीक अभ्यासक्रम लवकरात लवकर तयार करण्यात यावा. नवीन कृषि सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तयार करताना कृषि विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा विचार व्हावा व त्यासंबंधीत अभ्यासक्रम असावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष B.Sc. Agriculture पदवीधर असल्याने त्यांनी कृषि सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम कृषि पदविधरांना अनुकूल बनवलेला आहे असा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. म्हणून अशा पक्षपाती अध्यक्षांचा सत्काळ राजीनामा घ्यावा व आयोगाच्या सचिवांची बदली करवी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा हीच परिस्थिती इतर स्पर्धा परीक्षेत निर्माण होण्यास वेळ लागणार नाही याकडे या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

हेही वाचा :  अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

कृषी विद्यापीठांमध्ये पीजी प्रवेश परीक्षांसाठी सीईटीच्या तारखा जाहीर

JEE Main २०२२ चा अभ्यासक्रम जाहीर, व्हिडिओ लेक्चरच्या सहाय्याने करा तयारी

HSC Exam 2022: बोर्डाचाच चुकला पॅटर्न; इंग्रजीच्या पेपरने निर्माण केला विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …