नाश्त्याच्या पोह्यांचा लगदा होतोय का? कसे बनवाल चविष्ट आणि सुटसुटीत पोहे, सोप्या टिप्स

महाराष्ट्रीयनच नाही तर अन्य ठिकाणीही नाश्त्यामध्ये फोडणीचे पोहे हे चवीने खाल्ले जातात. पण पोहे बनविण्याची एक खास पद्धत आहे ती सर्वांना जमतेच असं नाही. काही ठिकाणी कोरडे पोहे होतात तर काही ठिकाणी पोह्यांचा लगदा होतो. काही जणांचे पोहे कडक होतात, तर काहींचे पाणचट, काही पोह्यांमध्ये तिखटच जास्त होते, तर काही जणांना पोहे बनविण्याचा अंदाजच येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर आणि घशाला घास लागणारे असे पोहे नको असतील आणि सुटसुटीत आणि मऊ पोह्यांसाठी काही सोप्या हॅक्सचा वापर आम्ही लेखातून देत आहोत. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​कसे निवडाल पोहे?​

​कसे निवडाल पोहे?​

पोहे हा घरातील नियमित नाश्ता असला तरीही कांदे पोहे अथवा बटाटे पोहे करताना कोणतेही पोहे निवडू नयेत. बाजारामध्ये जाडे पोहे, पातळ पोहे, मध्यम पोहे असे अनेक प्रकार मिळतात. पण फोडणीचे पोहे करताना जाड पोह्यांचा वापर करावा.

​पोह्यांची ओळख कशी करावी?​

​पोह्यांची ओळख कशी करावी?​

फोडणीच्या पोह्यांसाठी लागणारे जाड पोहे हे ओळखायला सोपे असतात. डोळ्यांनी तुम्हाला कळत नसेल तरीही हाताने नक्कीच याची पडताळणी करता येऊ शकता. जाड पोहे हे लांब आकाराचे असतात आणि पातळ पोहे हे चपटे आणि पारदर्शक स्वरूपाचे असतात. चिवड्यासाठी पातळ पोह्यांचा वापर केला जातो. तर जाड पोह्यांचे फोडणीचे पोहे बनवले जातात.

हेही वाचा :  राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

(वाचा – चपातीची कणीक मळाल अशी, तर पोळ्या कधीच होणार नाहीत कडक आणि चिवट, सोप्या ट्रिक्स)

​पोहे कसे भिजवावे?​

​पोहे कसे भिजवावे?​

पोह्याचा लगदा होऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाची टीप लक्षात घ्यावी लागते ती पोहे भिजवण्याचे टेक्निक. लुसलुशीत पोहे हवे असतील तर तुम्ही पोहे योग्य पद्धतीने धुवायला हवेत.

  • पोहे जास्त वेळ भिजवू नयेत. धुतल्यानंतर किमान ५ मिनिट्सचे अंतर राहील अशा पद्धतीने फोडणीची तयारी करा
  • बरेच जण पोहे आधीच भिजवतात आणि ते तसेच काही वेळ भिजून पडून राहतात. त्यामुळे पोहे पाणचट आणि कडक होतात
  • पोहे कधीही पाण्यात जास्त वेळ भिजवून ठेऊ नयेत हे लक्षात ठेवा. पोहे नेहमी चाळतीच धुवा
  • पोह्यातील पाणी निघून जाईल असे ठेवा म्हणजे फोडणीला दिल्यावर लगदा होत नाही
  • धुतलेल्या पोह्यातच हळद घातली तर ती सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागते

(वाचा – Cooking Hacks: हे ५ हॅक्स वापरून घरीच बनवू शकता सॉफ्ट इडली, बॅटर बिघडत असेल तर द्या वेळीच लक्ष)

​पोह्यांची पूर्वतयारी​

​पोह्यांची पूर्वतयारी​

पोह्यांचा लगदा व्हायला नको असेल तर तुम्ही पोह्यांच्या फोडणीची तयारी आधीच करून ठेवायला हवी. ही तयारी असली तर पोह्यांची रेसिपी कधीच चुकत नाही.

  • बारीक कांदा चिरून घ्यावा
  • मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यावेत
  • कोथिंबीर चिरून घ्यावी, कडिपत्त्याची पाने काढून ठेवावीत
  • एका डिशमध्ये ओले खोबरे खरवडून घ्यावे आणि त्यामध्येच बाजूला शेव काढून ठेवावी (आवड असल्यास)
  • फोडणीच्या डब्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद काढून ठेवावे
  • चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा साखर काढून ठेवावी
हेही वाचा :  महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान नसलेले गाव; ग्रामस्थांकडे कोणताच पुरावा नाही

(वाचा – Cooking Hacks: कुकरमध्ये असा शिजवा भात होणार नाही कोरडा, सुटसुटीत आणि मोकळ्या भाताची योग्य पद्धत)

​अशी द्या पोह्यांना फोडणी​

​अशी द्या पोह्यांना फोडणी​

पोह्यांना मोकळे होण्यासाठी फोडणीही तितकीच महत्त्वाची ठरते. त्यामुळे ज्या कढईत पोहे बनवणार ते अति तापू देऊ नका

  • गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल गरम करा
  • त्यामध्ये कडिपत्ता, मोहरी, जिरे, मिरची, चिरलेला कांदा घाला (मोजूनमापून घाला कोणत्याही पदार्थाचा अतिरेक करू नका)
  • पोह्यांवरच हळद, साखर आणि मीठ घातल्यास फोडणीत घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स होते
  • अति फोडणी न करता अथवा फोडणी करपू न देता त्यात भिजवलेले पोहे घाला आणि पटकन परता
  • फोडणीला घातल्यानंतर वरून पाण्याचा हबका मारा आणि गॅस मंद आचेवर ठेवा आणि पोहे वाफवा
  • पोहे शिजले असे वाटल्यानंतर गॅस बंद करा आणि पोहे त्वरीत गरमागरम वाढा
  • त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर आणि शेव पेरून खायला द्या. हवं असल्यास लिंबाचा तुकडाही ठेवा

  • पोह्यांचा लगदा होत असेल तर या टिप्स नक्की वापरा आणि आम्हाला कळवा कसे झालेत तुमचे पोहे? सुटसुटीत आणि चविष्ट पोह्यांचा नाश्ता तयार.
  • हेही वाचा :  Cooking Tips: कश्याही करा पुऱ्या फुगतच नाहीत ? आता तक्रार नाही 'या' टिप्स वापरून तर पाहा

    अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

    Source link

    About Team Majhinews

    Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

    Check Also

    Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

    Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

    Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

    Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …