Cooking Tips: कश्याही करा पुऱ्या फुगतच नाहीत ? आता तक्रार नाही ‘या’ टिप्स वापरून तर पाहा

Smart Kitchen Tips: आपल्याकडे काही सण असेल किंवा जेवणाचा खास बेत असेल पाहुणे येणार असतील तर स्पेशल जेवण म्हणून पुरी बनवण्याचा घाट घातला जातो. पुरी बनवणं तसं पाहिलं तर सोपं वाटतं. गोल परफेक्ट चपात्या करण्यापेक्षा गोल वाटीने पटपट पुऱ्या काढणं आपल्याला सोपं वाटतं. पण अनेकदा होत असं की पुरी तळायला तेलात टाकली कि ती फुगतच नाही, तेल सोकते किंवा कडक होते. मग काय करायचं असा मोठा प्रश्न गृहिणींना पडतो आणि उत्तर आपल्याकडे नसतं. पण आता यावरही काही खास टिप्स आहेत ज्या , आज आपण जाणून घेणार आहोत. (How to make perfect puri recipe in marathi kitchen tips) कोणतंही जेवण बनवताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असत.

बऱ्याचदा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होऊ शकतं , किंवा काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतात. म्हणून काही कुकिंग टिप्स (cooking tips) आपल्याला  जेवणात मदत करतात.

काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही परफेक्ट टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवू शकता . (how to make perfect puri tips in marathi)

हेही वाचा :  Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !

परफेक्ट पुऱ्या बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगतील आणि खाताना अगदी मऊ आणि क्रिस्पी लागतील.

पुऱ्या करणं आता खूप अवघड काम नाही आहे , प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी काही अश्या टिप्स सांगितल्या आहेत ज्या वापरून तुम्ही उत्तम पुऱ्या बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही हटके किचन टिप्स आणि कूकिंग हॅक्स विषयी.

सर्वात महत्वाची टीप म्हणजे पुऱ्या बनवताना जी कणिक मळता ती चपातीच्या कणकेप्रमाणे सैलसर  किंवा मऊ नसावी थोडी घट्ट कणिक पुऱ्यांसाठी मळायची आहे.  

पुऱ्यांची कणीक घट्टसर भिजवायची आहे म्हणून पाणी घालताना थोडं जपून कमी कमी घाला एकदम खूप पाणी घातलत तर, पीठ खूप मऊ होऊन जाईल. आणि पुऱ्या करणं खूप अवघड होऊन जाईल. 

पुऱ्या चांगल्या फुगण्यासाठी कणिक मळल्यानंतर त्यावर एक ओला कपडा घालून काही वेळ ठेवावा. (dough making for puri)

आता कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि त्यावर तेल ओतून ठेवा अश्याने कणकेचे गोळे कडक होणार नाहीत आणि फुटणार नाहीत. 

हेही वाचा :  महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी, निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

पुऱ्या लाटण्याचे लाटणे एकदम स्वच्छ असेल याची खातरजमा करून घ्या. यासाठी लाटण्यावर सुद्धा तेल लावून घ्या. 

पुरी सर्व बाजूने एकसारखी लाटली जाईल याची खात्री करा  मुख्यतः पुरीचे काठ सर्व एकसारखे लाटा. अश्याने पुरी छान फुगते. 

पुरी तळताना मोठ्या गॅसवरच तळल्या  गेल्या पाहिजेत त्यामुळे पुरीला सर्व बाजूने हीट लागून ती व्यवस्थित फुगते. 

पुरी तळत असताना दाबून गोल गोल फिरवावी त्यामुळे देखील पुरी टम्म फुगू लागते. 

चला तर मग, या टिप्स वापरून गोलमटोल मस्त फुगलेल्या पुऱ्या बनवून घ्या आणि सर्वांची वाहव्वा मिळवा… 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …