याचसाठी मुली बाबासाठी असतात खास, लेकीने वडिलांना वाढदिवसाला दिलं सगळ्यात भारी गिफ्ट, तुम्हीलाही येईल गहिवरून

मुलांच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक सतत मेहनत करत असतात. आपल्या मुलाला जगातील सर्व सुख मिळावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता पालक मुलांसाठी करत असतात. मुलांच्या गरजा कोणतीही गोष्ट न सांगता पूर्ण करत असतात. मग मुलांनी मोठं होऊन आपल्या पालकांसाठी काही वेगळं का करू नये? यामधून मुलांच आणि पालकांच खास दिसतं.

एका तरुणीने आजच्या पिढीसमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. अँकर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर रिदा थरानाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती तिच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ड्रीम कार गिफ्ट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (फोटो सौजन्य – Rida Tharana इंस्टाग्राम)

​व्हिडिओत सांगितली गोष्ट

या व्हिडीओमध्ये, रिदा, तिच्या वडिलांना नेहमीच स्वतःची कार हवी होती आणि त्यांच्याकडे नॅनो कार होती. 3 जानेवारीला तिच्या वडिलांच्या वाढदिवस होता. यावेळी सरप्राईज देण्यासाठी ती तिच्या गावी कुर्गला गेली आपल्या वडिलांसाठी कार गिफ्ट करताना तिला बराच रिसर्च करावा लागला.

हेही वाचा :  कोंबड्याचं रक्त लावून केला बलात्काराचा बनाव, व्यावसायिकाला घातला 3 कोटींचा गंडा; मुंबई पोलीसही हैराण

शेअर केला व्हिडीओ

​वडिलांच्या चेहऱ्यावर आला आनंद

व्हिडिओच्या शेवटी, रिदा तिच्या वडिलांना कारची चावी देताना आणि त्यांना ‘हॅपी बर्थडे’च्या शुभेच्छा देताना दिसते. यावर तिचे त्यांच्यावर किती प्रेम आहे हे सांगताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडील आणि मुलगी दोघेही एकमेकांना मिठी मारत आहेत आणि वडिलांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आहे.

(वाचा – वयाच्या ४० शीनंतर IVF शिवाय आई होणं शक्य आहे? जाणून घ्या या वयात नॅचरल कन्सिव होण्याची शक्यती किती)

​व्हिडीओची कॅप्शन अतिशय आकर्षक

व्हिडिओचे कॅप्शन होते ‘हॅपी बर्थडे अब्बू’… आय लव्ह यू. या प्रवासात आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तूच ती पहिली व्यक्ती आहेस ज्याच्या मी प्रेमात पडलो आणि नेहमीच राहीन. आपल्या मुलीवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि समाजाचे नियम मोडल्याबद्दल धन्यवाद.

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर)

​५ लाखाहून अधिक व्ह्यूज

या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत आणि अनेकांनी या मुलीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. यावरून तुम्ही समजू शकता की मुले जेव्हा त्यांच्या पालकांसाठी काही करतात तेव्हा त्यांना खूप आनंद मिळतो. आई-वडील आयुष्यभर फक्त आपल्या पाल्यासाठी करतात आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून काहीही मागितले जात नाहीत, पण जेव्हा मुले त्यांचे प्रेम आणि त्याग समजून त्यांना महत्त्व देतात, तेव्हा ही गोष्ट प्रत्येक पालकांच्या हृदयाला भिडते आणि ते आनंदाने भरून येतात.

हेही वाचा :  आजोबांनी आपला 'तो' फोटो जपून ठेवलाय तरी आजी नाराज! नेटकरी म्हणाले, 'स्त्रियांना पुरुषांचे प्रेम कधीच कळत नाही'

(वाचा – C Section नंतर चुकूनही या ५ गोष्टी करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान))

​मुलांनी पालकांचे कायमच राहावे कृतज्ञ

  • मुलांनी कायमच पालकांचे कृतज्ञ राहायला हवे. प्रत्येक पालक मुलांसाठी कायमच करत असतात. पण जेव्हा मुलं पालकांसाठी खास गोष्ट करतात त्यामधून त्यांच प्रेम आणि आपुलकी दिसत असते.
  • मुलांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून पालकांना आनंद द्यावा.
  • पालकांच्या आवडीच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जसे की, त्यांचा वाढदिवस, निवृत्तीचा दिवस
  • या गोष्टींमुळे पालक आणि मुलांमधील नातं अतिशय घट्ट होतं

(वाचा – मकर संक्रांतीच्या काळात बाळाचा हुंकार ऐकू येणार ऐकू, निवडा ही लेटेस्ट ट्रेंडी नावं))

​या पद्धतीने पालकांना द्या सरप्राईज

  • त्यांच्या आवडीच्या गोष्टी आवर्जून करा
  • पालकांची लहानपणीची इच्छा पूर्ण करा
  • पालकांसाठी खास गिफ्ट घ्या ज्यामध्ये त्यांच्या आठवणी लपल्या आहेत
  • पालकांना अभिमान वाटेल अशी गोष्ट करा

इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …