MeitY Job: केंद्रीय मंत्रालयाअंतर्गत बंपर भरती, ३० हजारपर्यंत मिळेल पगार

MeitY Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात आयटी एक्झिक्युटिव्हची (IT Executive) एकूण १०६ पदे भरली जाणार आहेत.
आयटी एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बी.एस्सी.कॉम्प्युटर सायन्स / बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणजेच बीसीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. २०२१ आणि २०२२ या वर्षात उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील याची नोंद घ्या.

आयटी एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३० हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  IGNOU पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

NPCIL Job: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

२३ जानेवारी २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत मिळेल नोकरी; पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या
Fire Brigade Job: बारावी उत्तीर्णांना अग्निशमन विभागात नोकरी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …