छोटीशी साईशा भोईर फॅशन स्टाईलमध्ये देतेय अभिनेत्रींना मात, निरागसतेवर आहेत लाखो फिदा

स्टाईल ही शिकवून येत नाही तर ती मुळातच असावी लागते असं अनेकांना तुम्ही बोलताना ऐकलं असेल पण हे खरंच तुम्हाला पाहायचं असेल तर बालकलाकार साईशा भोईर परफेक्ट उदाहरण आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील चिंगी अर्थात साईशा भोईर ही खऱ्या आयुष्यात अत्यंत स्टायलिश आहे. इतक्या लहान वयात साईशाला मिळालेलं फेम आणि त्यामुळे तिच्यात आलेला आत्मविश्वास हा तिच्या पेहरावातून झळकताना दिसतो. साईशाने याआधीदेखील मालिकेतून काम केले आहे. तिचे सोशल मीडियावरदेखील अनेक फॉलोअर्स आहेत. जाणून घेऊया साईशाची स्टाईल. (फोटो सौजन्य – @saisha_bhoir_officialInstagram)

​मराठमोळा साज​

​मराठमोळा साज​

लवकरच शिवाजी महाराजांची जयंती येत आहे आणि त्यानिमित्ताने साईशाने केलेला मराठमोळा लुक सध्या व्हायरल होत आहे. नाकात मोठी नथ, हिरवीकंच साडी आणि त्यावर काठाच्या लाल रंगाचा ब्लाऊज, कपाळी चंद्रकोर, हातात तोडे आणि हिरव्या बांगड्या, ठुशी आणि कंबरपट्टा असा साज करून हातात घेतलेली तलवार असा लुक एखाद्या टॉपच्या अभिनेत्रीलाही टक्कर देईल असाच आहे.

हेही वाचा :  सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स करा फॉलो

​शिमरी नेट पार्टी गाऊन​

​शिमरी नेट पार्टी गाऊन​

वाढदिवसाला अथवा कोणत्याही पार्टीला अशा पद्धतीचा शिमरी नेट पार्टी गाऊन तुम्हीही कॅरी करू शकता. साईशा वयाने लहान आहे. मात्र फॅशनच्या बाबतीत ती टॉपच्या अभिनेत्रींनाही सध्या मात देत असल्याचे दिसून येत आहे. या गाऊनसह साईशाने कर्ली हेअर लुक केला असून मॅट मेकअपने पार्टी लुक पूर्ण केला आहे.

(वाचा -रेड लेदर जंपसूट, एअरपोर्ट लुकची अशी कमाल की चाहत्यांची मलायकावरून नजर हटेना)

​जणू काही कोरियन हिरॉईन​

​जणू काही कोरियन हिरॉईन​

ब्लॅक फुगीर हातांचा वनपिस, त्यावर ब्लॅक टोपी आणि ब्लॅक शेड्स तर पायात नेट मोजे घालून साईशाने केलेला लुक हा एखाद्या कोरियन हिरॉईनचाच भास देत आहेत. अत्यंत स्टायलिश अशा या लुककडे पाहून साईशा खरंच लहान आहे का असा प्रश्न पडू शकतो. तिच्या चेहऱ्यावरील अदा या एखाद्या अभिनेत्रीलाही मागे पाडणाऱ्या आहेत

(वाचा – गालावर खळी डोळ्यात धुंदी, ‘फुलराणी’ प्रियदर्शिनीचा काळजाचा ठाव घेणारा लुक)

​गुजराती लुक​

​गुजराती लुक​

रंगबेरंगी चोळी आणि स्कर्ट असा हा लुक दसरा अथवा नवरात्रीच्या दिवसासाठी परफेक्ट आहे. साईशाचे नैसर्गिक केस खूपच मोठे असून तिने या पेहरावावर सुंदरशी हेअरस्टाईल केल्यामुळे तिच्या निरागस चेहऱ्यात अधिक भर पडली आहे. यासह तिने हात डोक्यामागे ठेवत दिलेली पोझही अत्यंत मोहक वाटत आहे. लहानशी टिकली आणि लिपस्टिकचा आधार घेत तिने लुक पूर्ण केला आहे.

हेही वाचा :  ब्रेकअपमधून सावरण्यासाठी, नविन वर्षात नव्याने जगण्यासाठी या गोष्टींचा अवलंब कराच आयुष्यात होईल नवी पहाट

(वाचा – डॅझलिंग शिमरी साडी आणि डीप नेक ब्लाऊज, काजोलच्या सौंदर्याने तरूणही घायाळ)

​बाहुलीसारखी साईशा​

​बाहुलीसारखी साईशा​

घरात एखादी बाहुली अर्थात डॉल असते तशीच साईशा या फोटोमध्ये दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस आणि त्यावर ब्लॅक फुलं, तर डोक्यात एखाद्या परिसारखा बेल्ट पाहून साईशावरून नजरच हटत नाही. याशिवाय चेहऱ्यावर असणारं गोड आणि निरागस स्माईल हे तिला अगदी बार्बी डॉलप्रमाणेच दर्शवत आहे.

​क्रॉप टॉप आणि थ्री फोर्थ​

​क्रॉप टॉप आणि थ्री फोर्थ​

घरात असल्यानंतरचा कम्फर्ट या कपड्यांमधून दिसून येत आहे. गुलाबी क्रॉप टॉप आणि थ्री फोर्थ आर्मी पँटमध्ये साईशा खूपच गोड दिसत आहे. तर तिच्यातील बालिशपणा हा तिच्या पोझवरूनही कळून येत आहे. तिच्या या नैसर्गिक गोडव्यामुळेच तिचे अनेक चाहते आहेत.

मोठमोठ्या अभिनेत्रींनाही जमणार नाही अशी स्टाईल बालकलाकार साईशा भोईरची आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. तुम्ही करता का साईशाला फॉलो? कशी वाटते तुम्हाला साईशाची स्टाईल नक्की सांगा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …