दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड, सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेपुढे दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी 447 धावांचे आव्हान ठेवलं. या या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दिवसअखेर 1 बाद 28 अशी स्थिती होती. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 252 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेचा संघ 109 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला आणखी 419 धावांची गरज आहे. तर, या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला 9 विकेट्सची आवश्यकता आहे. सध्या सामना भारताच्या बाजूनं झुकलेला दिसत आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय आहे. 

भारताचा कसोटी संघ:
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

श्रीलंकेचा कसोटी संघ:
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous SSC Exam 2022: परीक्षेचं टेन्शन आलंय? तर मग ‘हे’ उपाय नक्की करून पाहा
Next HSC Exam | बारावीचा आणखी एक पेपर फुटला; शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपास सुरू

Check Also

मंदिरा बेदीने खेळाडूंबाबत केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली ‘ क्रिकेटपटू तर माझ्याकडे….’

नवी दिल्ली : क्रिकेट स्पर्धांचे अँकरिंग करणाऱ्या मंदिरा बेदीने आता एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. …

पाकिस्तानमध्ये पोहोचताच इंग्लंड संघावर कोसळलं संकट, पाहा नेमकं काय घडलं?

मुंबई, 16 सप्टेंबर: इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. वर्ल्ड कपआधी टी20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी …