Covid 19 चा आता या 2 देशात कहर, एकाच दिवसात 3 लाख रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ

Covid 19 Cases in World : जगभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागले आहेत. गेली २ वर्ष कोरोनाच्या महामारीला तोंड देणाऱ्या जगभरातील लोकांच्या चिंता आता पुन्हा वाढू लागल्या आहेत. जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस (World Coronavirus) कहर करत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New verient) मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग करत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जर्मनीत कोरोनाचे तब्बल 2,96,498 नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1,98,93,028 वर पोहोचली आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, यूरोपातील देशांमध्ये आतापर्यंत 1.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गुरुवारी 288 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमवला आहे.

फ्रांसमध्ये गुरुवारी 148,635 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जर्मनीमध्ये 2,96,498 नवे कोरोना रुग्ण वाढल्यानंतर आता चिंता देखील वाढू लागल्या आहेत. कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा सगळ्यांच्या चिंतेत भर पाडली आहे. 

चीनमध्ये गुरुवारी कोरोनाचे 1366 रुग्ण वाढले आहेत. तर बुधवारी 2054 रुग्णांची वाढ झाली होती.  लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होत असला तरी कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीयेत.

हेही वाचा :  राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, कुणाची सरशी? कोण मारणार बाजी?

दक्षिण कोरिया मध्ये देखील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. 

इटलीमध्ये कोरोनाचे 81,811 नवे रुग्ण वाढले असून एका दिवसाआधी 76,260 रुग्णांची वाढ झाली होती. 

ब्रिटेनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. येथे लोकांना आता कोरोना लसीचा चौथा डोस दिला जात आहे. 

अमेरिकेवर देखील कोरोनाचं संकट आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेत देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्याची शक्यता येथील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …