Coronavirus : बापरे…अमेरिकेत एका आठवड्यात सुमारे 48,000 मुलांना कोरोनाची लागण

Coronavirus in Us : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. कोरोनाचा उद्रेक होत आहे. (Coronavirus in America ) अमेरिकेत जवळजवळ 48 हजार बालकांना कोरोना लागण झाली आहे. 22 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात युनायटेड स्टेट्समध्ये जवळपास 48,000 बालके कोविड-19 ची शिकार बनली आहेत. ही बाल प्रकरणांमध्ये सलग तिसरी साप्ताहिक वाढ आहे.

अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या (AAP)ताज्या अहवालात अमेरिकेतील कोरोनाबाबत चिंताजनक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. AAP नुसार, 22 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, अमेरिकेत सुमारे 48 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली. त्याचवेळी, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (CDC) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 10 कोटींहून अधिक कोविड-19 चे रुग्ण नोंदवले गेले आहेत.

कोरोनाचा धोका वाढत आहे

वृत्तसंस्था शिन्हुआच्या अहवालानुसार, महामारीच्या सुरुवातीपासून देशातील सुमारे 15.2 दशलक्ष मुलांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की गेल्या चार आठवड्यात यापैकी सुमारे 165,000 प्रकरणे नव्याने नोंदवली गेली आहेत.

हेही वाचा :  ब्रेक फेल झालेल्या ST बस सोबत बाईक 200 मीटर फरफटत गेली आणि... हिंगोलीत मोठा अपघात

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोनाचा धोका वाढत आहे. नवीन कोरोना व्हेरिएंट संबंधित रोगाच्या तीव्रतेचे तसेच संभाव्य दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक वय-विशिष्ट डेटा गोळा करणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर साथीच्या रोगाचे तात्काळ परिणाम होतात हे ओळखणे महत्त्वाचे आहे, परंतु तितकेच महत्त्वाचे म्हणजे या पिढीच्या मुलांच्या आणि तरुणांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारे परिणाम ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. 

देशात 10 कोटी कोरोना रुग्ण

बुधवारी सीडीसीच्या नवीन आकडेवारीनुसार, 21 डिसेंबरपर्यंत देशात 100,216,983 कोविड -19 रुग्णांची नोंद झाली आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या अहवालानुसार, जगभरात 100 दशलक्ष कोविड-19 रुग्णांची नोंद करणारा अमेरिका हा पहिला देश आहे. तज्ज्ञांनी सांगितले की वास्तविक ही संख्या खूप जास्त आहे. कारण घरी चाचणी करणारे लोक त्यांचे निकाल सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवत नाहीत आणि बरेच लोक चाचणी करुन घेत नाहीत, असे दिसून आले आहे. दरम्यान, सीडीसी डेटानुसार अमेरिकेमध्ये 1.08 दशलक्षाहून अधिक लोक कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून COVID-19 मुळे मृत्यू पावले आहेत.

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा, हाडे गोठवणारी थंडी

America Snow Storm : यंदाच्या वर्षी ख्रिसमची धूम सुरु असतानाच अमेरिकेमध्ये मात्र वातावरण काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. हिमवादळामुळे कॅनडाच्या सीमेवरील ग्रेटर बफेलो रिजन लेक भागाला या वादळाता मोठा तडाखा बसला आहे. आर्क्टिक डीप फ्रीजमुळे (Arctic Deep Freeze) आलेल्या या वादळाने 60 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.

हेही वाचा :  World First Mobile: जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता, पाहा त्यावेळी किंमत किती होती

अमेरिकेत तापमानात मोठा बदल झाला आहे. उणे 50 अंश सेल्सिअस तापमान गेले आहे. हाडे गोठवणारी थंडी सुरु आहे. हिमवादळ आणि बर्फ पडत असल्याने अमेरिकेत विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली. हिमवादळामुळं प्रभावित झाली नाही, अशी एकही गोष्ट सध्या या भागात पाहायला मिळत नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bhendwal Ghatmandni : भेंडवळची भविष्यवाणी झाली! यंदा भरपूर पाऊस, शेतकऱ्यांसाठीही Good News

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : वऱ्हाडातील सुमारे 350 वर्षांपासूनची परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची …

Weather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

15 मेपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. …