Breaking News
  • Shocking : पोट्ट्यांच्या ‘दबंग स्टाईल’ हाणामारीचा Video Viral, अंगावर अचानक कार आली अन्…
  • Navratri 2022 : नवरात्रोत्सवाआधी घरातून काढून टाका ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर…
  • National Cinema Day : ‘या’ तारखेला फक्त 75 रुपयात पाहता येणार सिनेमा
  • Nokiaचा तगडा जबरदस्त बॅटरीचा Tablet, भन्नाट फीचर्स आणि बरचं काही…
  • Maharashtra : PFI विरोधात NIA-ED ची सर्वात मोठी कारवाई, राज्यात या ठिकाणी छापेमारी

Coal India Job 2022: कोल इंडियामध्ये विविध पदांची भरती, १ लाखांपर्यंत मिळेल पगार

Coal India Recruitment 2022: कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited, CIL) मध्ये वैद्यकीय कार्यकारी पदांची (Medical Exicutive Recruitment) भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार २९ सप्टेंबरपासून अधिकृत वेबसाइट coalindia.in वर जाऊन अर्ज करू शकतील. या भरतीतून एकूण १०८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये भरतीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पदभरती निवड प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

Coal India Recruitment 2022: रिक्त जागांचा तपशील
एकूण पदे- १०८
वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ – ३९ पदे
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – ६८ पदे
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत) – १ पदे

MahaGenco Job: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत बंपर भरती, मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
महत्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २९ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०२२

वयोमर्यादा
वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांचे वय ४२ वर्षे आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांचे वय ३५ वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेतून एमबीबीएस किंवा बीडीएस पदवी असणे आवश्यक आहे. तर वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएस आणि बीडीएस पदवी असणे आवश्यक आहे.

पगार
या पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना ६० हजार ते १ लाख ८० हजार रुपये इतक पगार दिला जाणार आहे.

अर्ज कुठे करायचा?
उमेदवारांनी फॉर्म भरून तो डेप्युटी जीएम (कर्मचारी)/एचओडी (ईई), कार्यकारी आस्थापना विभाग, दुसरा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र ४४०००१ वर पाठवावा लागेल. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आता तुम्हालाही लावता येईल पावसाचा अंदाज, हवामान खात्यात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये ग्रंथपाल ते प्राचार्यपर्यंत विविध पदांची भरती

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous SBI PO : भारतीय स्टेट बँकेत 1673 पदांसाठी मेगाभरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी… | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
Next माधुरी दीक्षितचे डीप गळा व ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये किलर फोटो

Check Also

Metro Recruitment: मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, ही घ्या अर्जाची थेट लिंक

Maha Metro Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड …

Clerk Recruitment: लिपिकांची सर्व रिक्त पदे भरणार, राज्य मंत्रीमंडळात महत्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्य सरकारच्या विविध विभागांच्या आस्थापनांतील वर्ग तीनमधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र …