सिनेमा बघितला, उत्साह संचारला, 205 धावांचं आव्हान सहज पार केलं, पंजाबच्या मोठ्या विजयाचं गुपित

IPL 2022, RCB vs PBK : पंजाबने आरसीबीचा पराभव करत आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली. रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाब संघाला 20 षटकांत हे आव्हान पार करायचं होतं. पंजाबने अतिशय आरामात 208 धावा फलकावर लावत अशक्यप्राय विजय मिळवला. या विजयामध्ये चित्रपट हा भाग आहे. सामन्यानंतर पंजाबच्या खेळाडूनं विजयाचं गुपित उघड केले.

आरसीबीविरोधातील सामन्यात ओडियन स्मिथने ताबोडतोड फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. स्मिथने 8 चेंडूत  25 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान स्मिथन तीन षटकार आणि एक चौकार लगावला.  स्मिथने या खेळीचं आणि संघाच्या विजयाचं गुपित उलगडलेय. स्मिथने सांगितले की, सामन्याआधी संपूर्ण संघाने ’14 PEAKS’ हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटामुळे संघामध्ये प्रचंड आत्मविश्वास आला. त्यामुळेच आम्ही 206 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करु शकलो. 

दरम्यान, नाणेफेक जिंकून पंजाब संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिलाय.

हेही वाचा :  आयपीएल ऑक्शनच्या तारिखेत बदल होणार का? फ्रँचायझींच्या विनंतीवर बोर्डाचं स्पष्टीकरण

नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाची आक्रमक सुरुवात केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावत यांनी पहिल्या विकेट्ससाठी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल चाहरनं अनूज रावतच्या रुपात आरसीबीला पहिला झटका दिला. त्यानंतर डू प्लेसिसनं विराट कोहलीसोबत मिळून 118 धावांची केली. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं आठराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसची विस्फोट खेळी संपुष्टात आणली.  त्यांतनंतर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनंही आक्रमक खेळी दाखवत संघाचा डाव 200 पार पाठवला. विराट कोहलीनं 29 चेंडूत 41 तर, दिनेश कार्तिकनं 14 चेंडूत 32 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 71 धावांची भागेदारी केली. त्यानंतर वानिंदू हसरंगानं पंजाबच्या संघाला पहिला झटका दिला. मयांक अग्रवालनं 24 बॉलमध्ये 32 धावा केल्या. त्यानंतर भानूका राजापक्क्ष मैदानात आला. शिखर धवनसोबत मिळून त्यानं खेळ पुढे चालवला. दरम्यान, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद झाला. शिखरपाठोपाठ राज बावाही शून्यावर बाद झाला. पंजाबनं हा सामना गमावला असं वाटत असताना शाहरूख खान आणि ओडियन स्मिथनं आक्रमक फलंदाजी करत सामना फिरवला. शाहरूख खाननं 20 बॉलमध्ये 24 तर, ओडियन स्मिथनं 8 बॉलमध्ये 25 धावा केल्या. ज्यामुळं पंजाबच्या संघाला 5 विकेट्स राखून आरसीबीवर विजय मिळवता आलाय. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं दोन विकेट्स मिळवल्या. तर, आकाश दिप, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेलनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.

हेही वाचा :  धोनीने सावरला डाव, झळकावलं 'अंडर प्रेशर अर्धशतक', चेन्नईचं केकेआरसमोर 132 धावांचं आव्हान

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …