मुंबईविरुद्ध विजयाने दिल्लीचा शुभारंभ, पण स्टार ऑलराऊंडर दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का

IPL 2022, MI vs DC : आयपीएलच्या (IPL 2022) दुसऱ्याच सामन्यात दिल्लीनं मुंबईला (Delhi Capitals vs Mumbai Indians) 4 विकेट्सनं पराभूत केलं. त्यामुळे स्पर्धेची सुरुवात तर दिल्लीने (DC vs MI) दमदार केली आहे. पण दुसऱ्याच दिवशी संघाला एक धक्का बसला असून संघाचा स्टार ऑलराऊंडर मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून याठिकाणीच मार्शला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने मार्शच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान (Australia vs Pakistan) दौऱ्यावर असून 29 मार्च म्हणजेच उद्यापासून तीन सामन्यांची वनडे मालिका दोन्ही संघ खेळणार आहेत. पण त्यापूर्वीच मार्श सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतर 4 एप्रिलनंतरही तो दिल्ली संघाशी जोडला जाणं कठीण आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 साठी मार्शला तब्बल 6.50 कोटी रुपये देत खरेदी केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ – 
फलंदाज – पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मनदीप सिंह, यश धुल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, अश्विन हॅब्बार

गोलंदाज – चेतन साकरिया, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दूल ठाकुर

हेही वाचा :  क्रिकेट जगतासाठी दु:खाचं ठरलं 2022; आधी वॉर्न-सायमंड्सनं जग सोडलं, आता पंतच्या कारला अपघात

अष्टपैलू – अक्षर यादव, ललित यादव, रिपल पटेल, विक्की ओत्सवाल, मिचेल मार्श

विकेटकीपर- ऋषभ पंत (कर्णधार), केएस भरत, टिम सिफर्ट

फिरकीपटू – कुलदीप यादव, प्रवीण दुबे

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …