ताज्या

रशियाची आर्थिक नाकेबंदी ; ‘स्विफ्ट’ प्रणालीतून बँका हद्दपार, अमेरिकेसह मित्रराष्ट्रांचा महत्त्वाचा निर्णय

वॉशिंग्टन/मॉस्को : युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघाने निवडक रशियन बँकांना ‘स्विफ्ट’ या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हद्दपार करण्याबरोबरच रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादले. या कठोर निर्बंधांमागे रशियाची अर्थक्षमता नियंत्रित करून युद्धाचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा हेतू आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि कॅनडाने रशियावरील आर्थिक निर्बंधांना मान्यता दिल्यानंतर काही रशियन बँकांना …

Read More »

मुंबईत सव्वातास वीजपुरवठा खंडित ; पारेषण यंत्रणा, टाटा पॉवरचे वीजसंच बंद झाल्याचा परिणाम

मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी मुलुंड-ट्रॉम्बे या २२० केव्ही वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर टाटा पॉवरचे ट्रॉम्बे येथील वीजसंच बंद पडल्याने एकूण ९७६ मेगावॉटचे भारनियमन होऊन दक्षिण मुंबईसह चेंबूर व आसपासच्या परिसरात रविवारी सकाळी पावणेदहा ते अकरा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लोकलसेवा बंद पडण्यासह जनजीवन विस्कळीत झाल़े पारेषण वाहिन्यांतील बिघाड व टाटा पॉवरचे वीजसंच बंद पडण्याआधी मुंबईत २०८३ …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीतील शेकडो उमेदवारांना अनामत रक्कम वर्षभरानंतरही परत मिळेना !

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता नगर : गेल्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत मिळालेली नाही.  जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यासाठी २३ हजार ८१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. काहींच्या अनामत रकमा जप्त झाल्या असल्या तरी विजयी व पराभूत झालेल्या उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळाली नाही. उमेदवार तहसील कार्यालयात चकरा मारतात मात्र त्यांना …

Read More »

युक्रेनमधून ३,६८,००० नागरिकांचे पलायन

जीनिव्हा : युक्रेनमधून पळून शेजारच्या देशांमध्ये आश्रयासाठी आलेल्या नागरिकांची संख्या ३ लाख ६८ हजारवर पोहोचली असून ती सतत वाढत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक यंत्रणेने म्हटले आहे. युक्रेनमधून बाहेर पडून हंगेरी व रुमानियासह इतर देशांमध्ये गेलेल्या स्थलांतरितांची संख्या किमान दीड लाख असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्तांनी शनिवारी सांगितले होते. रविवारी त्यांनी हा अंदाज दुपटीने वाढवला. पोलंड- युक्रेन सीमेवरील मोटारींची रांग १४ …

Read More »

‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेंगा’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा’ असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना …

Read More »

अपघाताचा बनाव रचून हडपलेला ४० लाखांचा विदेशी दारूचा साठा हस्तगत

नाशिक येथून सोलापूरकडे विदेशी दारूचा साठा आणताना वाटेतच वाहन अपघाताचा बनाव रचून ४० लाख ४७ हजार रूपये किंमतीचा दारूचा साठा परस्पर हडप करून दुसऱ्या व्यक्तीला अवैधरीत्या विकण्याचा प्रकार सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने उजेडात आणला आहे. हडप केलेला संपूर्ण दारू साठा हस्तगत करण्यात आला असून दोन्ही मालमोटारचालकांना अटक झाली आहे. इतर दोघांचा शोध घेतला जात आहे. नाशिक येथील मे. युनायटेड …

Read More »

“…तर ती पंतप्रधानही झाली असती”; लतादिदींच्या आठवणीने आशा भोसलेंच्या अश्रूंचा बांध फुटला!

तुमच्यासाठी लता मंगेशकर गेली आहे आमच्यासाठी सगळं संपलं असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशासह परदेशातून अनेकांनी दुःख व्यक्त केलं. त्यांची बहीण आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले या त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच पुण्यात बोलत असताना लतादिदींच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले. लतादिदींच्या आठवणी, त्यांची गुणवैशिष्ट्यं याबद्दल आशा भोसले बोलत …

Read More »

“त्यांना सगळ्यांचा बाबा…”; भावूक होत सरसंघचालक मोहन भागवतांनी जागवल्या लतादिदींच्या आठवणी

लता मंगेशकर गेल्या आणि जगातला तणावमुक्त स्वर गेला. हा स्वर परत होणं शक्य नाही, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी लतादिदींच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केलं आहे. दिदींचं गाणं स्तुतीच्या पलिकडचं होतं, असंही भागवत यावेळी म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. मंगेशकर कुटुंबाचं सांत्वन करणं कठीण आहे. काय बोलावं कळत नाही.अशी माणसं गेली की असंच होतं, मी सगळ्यात कमी संपर्कात राहिलो. एकदा …

Read More »

सकाळी गिर्यारोहणाला गेले, पण परतलेच नाही; ठाण्यात संजय गांधी पार्कमध्ये ६२ वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा भागात गिर्यारोहणासाठी गेलेल्या संजीव देशपांडे (६२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२७ फेब्रुवारी) उघडकीस आली. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा भागात गिर्यारोहणासाठी गेलेल्या संजीव देशपांडे (६२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२७ फेब्रुवारी) उघडकीस आली. या प्रकरणाची नोंद चितळसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. …

Read More »

प्रियांका आणि निकच्या बाळाचे नाव काय ठेवले? आई मधू चोप्रांनी केला खुलासा

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांका ही सध्या मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतंक प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी आजी झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बाळाच्या नावाबद्दलही खुलासा केला आहे. गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा …

Read More »

दारुच्या नशेत गाडी ठोकली; माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक!

विनोद कांबळी विरोधात एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या वांद्र्यात कांबळी यांनी दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या गाडीला टक्कर मारली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र आता नंतर त्यांना जामीन मिळाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यांच्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली …

Read More »

Pune Crime | सेक्स रॅकेट उघड, दलालांना अटक, अभिनेत्रीची सुटका

पुणे : पुणे शहराची गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झाली आहे. शहरात आणि लगतच्या भागांमध्ये दररोज काही न काही घडतचं असतं. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह एकूण 3 जणांची वेश्या व्यवसातून सुटका केली आहे. या अभिनेत्रीकडून लॉजवर हा वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सना अटक …

Read More »

पैसे संपले, खायला अन्न नाही, विमान पकडण्यासाठी १० किमीची पायपीट, डोंबिवलीतील विद्यार्थी अडकला युक्रेनमध्ये

डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू झाले. भगवान मंडलिक, लोकसत्ता डोंबिवलीतील संकेत पाटील हा विद्यार्थी मुंबईतून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेला. मात्र, तेथे पोहोचताच रशियाने युक्रेन शहरावर बॉम्ब हल्ले सुरू केले आणि विद्यापीठात पाऊल न ठेवताच संकेतवर भारतात परतण्याची वेळ आली आहे. युक्रेनमधील भुको विनियान …

Read More »

IND vs SL : धक्कादायक बातमी..! श्रीलंका संघाची ने-आण करणाऱ्या बसमध्ये आढळले…

याप्रकरणी संबंधित बसचालकाची चौकशी करण्यात येत आहे. श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० मालिका खेळवली जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना पंजाबमधील मोहाली येथे होणार आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेचा कसोटी संघ मोहालीत आहे. श्रीलंकेचा संघ मोहाली स्टेडियमवर दररोज सराव करत आहे. दरम्यान, एक …

Read More »

विश्लेषण : स्विफ्ट नेटवर्क म्हणजे काय? रशियन बँकांच्या त्यातून हकालपट्टीचा अर्थ काय?

आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतूनच रशियाची हकालपट्टी करू पाहणारे हे पाऊल अण्वस्त्राप्रमाणे त्या देशासाठी संहारक ठरेल, असे बोलले जात आहे. कसे ते पाहू या. सचिन रोहेकर अमेरिका, ब्रिटनसह, युरोपीय महासंघ आणि सहयोगी देशांनी जागतिक स्तरावर हजारो वित्तीय संस्थांद्वारे वापरल्या जाणार्‍या ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीमधून रशियातील बँकांना वगळण्याला मान्यता दिली आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियावर लादल्या गेलेल्या आर्थिक निर्बंधांना कठोरतम टोक देणारे …

Read More »

वजन कमी करण्यासाठी रोज ग्रीन टी पिताय तर घ्या योग्य काळजी; होऊ शकतात ‘हे’ आजार

तुम्ही देखील सतत ग्रीन-टीचे सेवन करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने अनेक आजार तुम्हाला घेरतात. साधारणपणे, बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ग्रीन-टीचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते, जर तुम्ही देखील सतत ग्रीन-टीचे सेवन करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने अनेक आजार तुम्हाला घेरतात. यामध्ये डोकेदुखी, आळस, …

Read More »

IND vs SL : मैदानात उतरताच हिटमॅन बनला टी-२० क्रिकेटचा नवा बादशाह! पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितनं मोठा विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माने आज रविवारी (२७ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इतिहास रचला आहे. धर्मशाला येथील रोहितचा हा १२५वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. तो जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकचा विक्रम मोडला. मलिकच्या …

Read More »

उपोषण मागे नाहीच, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे निर्णयावर ठाम

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झालं ते त्यांनी सांगितलं. माझे उपोषण हे स्वतःसाठी नाही तर गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आमरण उपोषणास बसलेले संभाजीराजे यांनी घेतलीय.  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आझाद …

Read More »

‘आमच्या घरी १२ महिने…’, लेकीचा हटके व्हिडीओ पोस्ट करत सोनाली कुलकर्णीने दिल्या ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा

सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज २७ फेब्रवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाचा, आत्मियतेचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि साहित्याच्या गुणगौरवाचा दिवस म्हणूनही याकडे …

Read More »

“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत

युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क यांनी पुढील १० तासात युक्रेनमध्ये २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारी स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा सुरू केली. रशियाने शक्तिशाली सैन्याच्या जोरावर युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनची यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. युक्रेनला जगापासून तोडण्यासाठी रशियाने युक्रेनच्या ब्रॉडबँड सेवेची यंत्रणाही बेचिराख करण्यास सुरुवात …

Read More »