“…तर ती पंतप्रधानही झाली असती”; लतादिदींच्या आठवणीने आशा भोसलेंच्या अश्रूंचा बांध फुटला!


तुमच्यासाठी लता मंगेशकर गेली आहे आमच्यासाठी सगळं संपलं असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशासह परदेशातून अनेकांनी दुःख व्यक्त केलं. त्यांची बहीण आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले या त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच पुण्यात बोलत असताना लतादिदींच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले. लतादिदींच्या आठवणी, त्यांची गुणवैशिष्ट्यं याबद्दल आशा भोसले बोलत होत्या.

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर,पंडित हृदयनाथ मंगेशकर,उषा मंगेशकर, आशा भोसले,एमआयटी विश्वशांती युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – “त्यांना सगळ्यांचा बाबा…”; भावूक होत सरसंघचालक मोहन भागवतांनी जागवल्या लतादिदींच्या आठवणी

आशा भोसले म्हणाल्या की, सव्वा महिना देखील झाला नाही. आम्ही इथे उभे आहोत. इतक्या लवकर वाटलं नव्हतं अशा सभेत मला बोलावं लागेल. दीदीबद्दल काय बोलावं सुचत देखील नाही. लता दीदी इतकी बुद्धिमान होती की, ती जर फार शिकलेली असती तर ती आज कुठल्या कुठं… ती प्राईम मिनिस्टर झाली असती, इतकी ती बुद्धिमान होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :  मोदींचा पुणे दौरा : पंतप्रधानांना देण्यात येणारा शाही फेटा आहे फारच खास; जाणून घ्या वैशिष्ट्यं

त्या पुढे म्हणाल्या की, याच पुण्यात १९४२ मध्ये आमचे वडील पुण्यात गेले. तेव्हा दीदी १२ वर्षाची होती. त्याकाळी वडिलांना रुग्णवाहिका (ambulance) देखील मिळाली नाही. तेव्हा दीदीने ठरवलं की, काही झालं तरी हॉस्पिटल पुण्यात बांधायचं आणि ते बांधले, तसेच लता दीदीला मंगेशकर आडनावाचा खूप अभिमान होता. तुमच्यासाठी लता मंगेशकर गेली आहे आमच्यासाठी सगळं संपलं असल्याची भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …