ताज्या

अशनीर ग्रोव्हर यांनी ‘भारतपे’च्या सह-संस्थापकाचा दर्जा गमावला! ; भागमालकीलाही कात्री लागण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारतपेच्या संचालक मंडळाने अशनीर ग्रोव्हर यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल कारवाई म्हणून कंपनीच्या सर्व पदांवरून त्यांची उचलबांगडी करताना, त्यांचा ‘सह-संस्थापक’ हा दर्जा हिरावून घेतला, तसेच त्यांच्याकडील भागभांडवलावरील मालकीला कात्री लावणारे पाऊल टाकले. बुधवारी त्या संबंधाने कायदेशीर कारवाईदेखील कंपनीने सुरू केली आहे. ग्रोव्हर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीला सामोरे जाण्यापूर्वीच मंगळवारी व्यवस्थापकीय संचालकपदाचा तसेच कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. तथापि संचालक मंडळाची …

Read More »

Maharashtra Budget Session : अधिवेशनात संघर्षांचा संकल्प ; ‘भाजपकाळातील घोटाळेबाजांवर कारवाई’

राज्य विधिमंडळाच्या आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने संघर्षांचा संकल्प केला़  हे सरकार दाऊद समर्पित असल्याची टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिल़े  दुसरीकडे, भाजप सरकारच्या काळातील घोटाळेबाजांवर कारवाईचा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारकडून जोरदार प्रत्युत्तराचे सूतोवाच केल़े मुंबई : केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या …

Read More »

हे दाऊद समर्पित सरकार ! देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र; अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार

मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिम आणि गुन्हेगारी जगताशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकार वाचवीत असून देशात असे कधी घडले नाही. हे ‘दाऊद समर्पित सरकार’ असल्याचे टीकास्त्र बुधवारी सोडत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले. या अहंकारी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीबरोबरच शेतकरी कर्जमाफी, वीज बिल …

Read More »

चीनला तोंड देण्यासाठी अमेरिकेवर अवलंबून राहणे चुकीचे! ; आशियाई देशांशी आण्विक सहकार्य आवश्यक- संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांचे मत

मुंबई : चीन कधीच भारताला बरोबरीने- सन्मानाने वागवणार नाही हे लक्षात घेऊन चीनच्या भूराजकीय आव्हानाला तोंड देण्यासाठी धोरण आखण्याची गरज असून त्यासाठी अमेरिकेवर अवलंबून चालणार नाही. तर तैवान, व्हिएतनाम, फिलिपाइन्ससारख्या देशांना अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी मदत करून चीनच्या अवतीभवती एक वेढा तयार केला तरच चीनच्या विस्तारवादाला तोंड देता येईल, असे परखड मत संरक्षण व भूराजकीयतज्ज्ञ भरत कार्नाड यांनी बुधवारी व्यक्त केले. …

Read More »

‘एसटी’चे खासगीकरण ; विलीनीकरणाची शक्यता मंत्रिमंडळाने फेटाळली

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून, त्यातून चुकीचा पायंडा पडेल, असा निष्कर्ष समितीने काढला. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाची नोंद घेण्यात आली. त्यानुसार संप मिटला नाही तर टप्प्याटप्प्याने एसटीचे खासगीकरण करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचारी गेल्या …

Read More »

Russia Ukraine War : रशियाचे हल्ले तीव्र, युक्रेनमध्ये हाहाकार ; २००० नागरिकांचा बळी

किव्ह : रशियाने युक्रेनमध्ये विध्वंसक हल्ले बुधवारी आणखी तीव्र केल़े. आठवडय़ाभरात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, दोन हजार नागरिकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली़. त्यात दोन्ही देशांच्या मृत सैनिकांचा समावेश केल्यास युद्धबळींचा आकडा वाढणार असून, उभय देशांनी दुसऱ्या फेरीतील शांतता चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ठिकाणाबाबत अनिश्चतता आह़े. रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीव्हबरोबरच, खार्कीव्ह आणि …

Read More »

Maharashtra Covid Restrictions : ठाणे, नाशिकमध्ये निर्बंध कायम ; सार्वजनिक वाहतुकीसाठी लससक्तीच

मुंबई : लसीकरणाची पहिली मात्रा ९० टक्क्यांपेक्षा अधिक, दुसरी मात्रा ७० टक्क्यांपेक्षा जास्त, बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी हे निकष पूर्ण करणारे मुंबई, पुणे, नागपूर, रायगडसह १४ जिल्हे गुरुवार मध्यरात्रीपासून निर्बंधमुक्त होत आहेत. या जिल्ह्यांमध्ये उपहारगृहे, चित्रपटगृहांसह साऱ्या सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होतील. ठाणे, नाशिकसह उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये ५० टक्के क्षमतेचे निर्बंध कायम असतील. रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत …

Read More »

Coronavirus In Maharashtra : दोन वर्षांत राज्यात प्रथमच करोना मृत्यू नाही ; ५४४ नवे रुग्ण

मुंबई : करोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच दिवसभरात करोनामुळे राज्यात एकही मृत्यूची नोंद झाली नाही. याच कालावधीत ५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १ एप्रिल २०२० नंतर प्रथमच करोनामुळे राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात दिवसभरात ३८ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची रुग्णसंख्या ४७७१ इतकी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत मुंबई १००, उर्वरित पुणे जिल्हा ३९, पुणे …

Read More »

Russia Ukraine War : भारतीयांच्या स्थलांतरासाठी रशियाकडून मानवतावादी मार्ग ; नवनियुक्त रशियन राजदूतांची माहिती; सुरक्षेसाठी दिला निर्वाळा

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रशियातर्फे हा निर्वाळा देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर रशियाचे …

Read More »

९२ व्या वर्षांतही कष्टकऱ्यांसाठी लढण्याचा उत्साह

हमाल पंचायतच्या अध्यक्षपदी डॉ. बाबा आढाव यांची फेरनिवड पुणे :  देशातील शेतकरी, इतर कष्टकरी समाज आणि महिला वर्गासाठी काम करणाऱ्या हमाल पंचायत पुणे या कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची फेरनिवड करण्यात आली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षीही कष्टकऱ्यांसाठी लढण्याचा डॉ. बाबा आढाव यांचा उत्साह कायम असून कष्टकरी समाज आणि महिला वर्गाला योग्य ते मार्गदर्शन करून …

Read More »

आजचं राशीभविष्य, गुरुवार, ३ मार्च २०२२

मेष:- शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वत:च्या इच्छा स्वत:च पूर्ण कराल. नवीन मित्र जोडाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. वृषभ:- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. कामात वडीलांची मदत होईल. आर्थिक कामात अधिक वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. मिथुन:- वडीलधार्‍यांचा योग्य मान राखाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. हातातील कामात यश येईल. तुमच्यातील सज्जनपणा …

Read More »

नवाब मलिक यांचा राजीनामा नाही ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून व खोटेनाटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही निवडक नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. विधिमंडळ अधिवेशनात अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी कितीही गोंधळ घातला तरी, राजीनामा घ्यायचा नाही, उलट विरोधकांना आक्रमक प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …

Read More »

मुंबईसह १४ महापालिका, २५ जि.प. निवडणुकांची तयारी ; निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांशी चर्चा

मुंबई : मुंबईसह १४ महानगरपलिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत चर्चा केली. साधारणत: एप्रिल व मे महिन्यांत वेगवेगळय़ा टप्प्यांत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आयुक्त मदान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भारतीय जनता पक्ष, …

Read More »

भाजप राहुरी तालुका अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्यमंत्री तनपुरे यांचा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांना धक्का नगर : भाजपने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून लक्ष्य केल्याचा आक्षेप घेतला जात असतानाच दुसरीकडे राज्यमंत्री  तनपुरे यांनी जिल्हा भाजपला धक्का दिला आहे. राहुरी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणत हा धक्का दिला. त्यामुळे भाजप नेते तथा माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनाही हादरा बसला आहे. …

Read More »

औरंगाबादेतील वाळूज, नारेगावात आगीच्या दोन घटना ; लाखो रुपयांचे नुकसान

वाहनांचे इंडिकेटर निर्मिती करणाऱ्या व टायर रिमोल्ड करणाऱ्या कारखान्यांना लागली आग औरंगाबाद शहराजवळील वाळूज व नारेगाव परिसरात बुधवारी अनुक्रमे वाहनांचे इंडिकेटर निर्मिती करणाऱ्या व टायर रिमोल्ड करणाऱ्या कारखान्यांना आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, दोन्ही घटनांबाबत रेल्वे स्टेशन मार्गावरील व चिकलठाणा अग्निशमन विभागाकडून दुजोरा मिळाला. वाळूजमधील वाहनांचे इंडिकेटर तयार करणाऱ्या केटीएल ऑटोमोटीव्ह प्रा.लि. या कंपनीला आग लागून …

Read More »

Covid 19 : महाराष्ट्रासाठी अत्यंत दिलासादायक बातमी ; राज्यात आज करोनामुळे एकही मृत्यू नाही!

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ट्वीटद्वारे माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लागू असलेले करोनासंदर्भातील काही नियम शिथिल करण्याच निर्णय आज राज्य सरकारकडून घेण्यात आलेला असताना, आता राज्यातील नागरिकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज दिवसभरात राज्यात कोरनामुळे …

Read More »

कल्याण-डोंबिवली : “झेपत नसेल तर सोयीच्या ठिकाणी निघून जा” ; मनसे आमदार प्रमोद पाटील यांचा मनपा आयुक्तांना सल्ला

“एखादा कमी शिकलेला आयुक्त कडोंमपात आला तरी चालेल फक्त तो कृतीशील काम करणारा असला पाहिजे”, असंही आमदार पाटील म्हणाले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना अडीच महिने वेळ मिळत नसेल तर, त्यांनी झेपत नसेल तर येथून निघून जावे आणि सोयीची खुर्ची पकडावी.”, असा सल्ला मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी बुधवारी येथे …

Read More »

लोकसत्ता विश्लेषण : सत्या नडेलांच्या मुलाचं निधन ज्या Cerebral Palsy नं झाला तो आजार नेमका काय असतो?

सत्या नडेला यांचा मुलगा जैन याच्या निधनाच्या बातमीनंतर सेरेब्रल पाल्सी म्हणजे नेमकं काय अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. तर जाणून घेऊया सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय आणि याची लक्षणे काय आहेत. जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) या गंभीर आजारामुळे निधन झाले. सत्या नडेला यांचा मुलगा जैन नडेला लहानपणापासूनच या आजाराने ग्रस्त होता. …

Read More »

वीजप्रश्न : स्वाभिमानी शेतकरी संघटना ४ मार्चला राज्यभर करणार चक्काजाम आंदोलन

“सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल” राजू शेट्टींनी दिला इशारा शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता अधिक आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ४ मार्च रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामीण भागात राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (बुधवार) कोल्हापूर येथे केली. “शेतीला दिवसा १० तास वीज द्या या मागणीसाठी …

Read More »

राज्यातील औद्योगिक घटकांचे सवलतीच्या दराचे अनुदान स्थगित; उद्योजकांमध्ये खळबळ

अर्थसंकल्पीय अधिवेशांच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे विरोधकांना आयते कोलीत राज्यातील शेती वगळता सर्व औद्योगिक घटकांचे वीज अनुदान स्थगित ठेवण्याचे निर्देश महावितरण कंपनीने दिले आहेत. याचा फटका राज्यातील मोठ्या औद्योगिक घटकाला बसणार असल्याने उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशांच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असल्याची चर्चा होत आहे. महावितरणकडून सवलतीच्या दरात काही घटकांना वीज पुरवठा …

Read More »