हे दाऊद समर्पित सरकार ! देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र; अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार


मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिम आणि गुन्हेगारी जगताशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकार वाचवीत असून देशात असे कधी घडले नाही. हे ‘दाऊद समर्पित सरकार’ असल्याचे टीकास्त्र बुधवारी सोडत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले.

या अहंकारी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीबरोबरच शेतकरी कर्जमाफी, वीज बिल वसुली, मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आदी मुद्दय़ांवर राज्य सरकारला विधिमंडळात आक्रमकपणे धारेवर धरणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मलिकांविरुद्धचे प्रकरण जुने नसून १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. देशद्रोही कृत्यातील गुन्हेगारांशी मलिक यांनी आर्थिक व्यवहार केले. मुंबईत जमीन घ्यायची होती, तर त्याच जमिनी होत्या का, असा सवाल करून फडणवीस म्हणाले, मुंबईकरांची हत्या करणाऱ्यांबरोबर शिवसेना पक्षप्रमुख सत्तेत सहभागी आहेत. महाराष्ट्राची बदनामी करण्यात येत असल्याचा कांगावा राज्य सरकार करीत आहे; पण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तर राज्यातील बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा अहंकारी सरकारला जनता निश्चितच झुकवेल.

छत्रपतींच्या घराण्यातील वंशजाला उपोषण करायला लागणे, हे भूषणावह नाही. मराठा समाजाला पुन्हा तीच आश्वासने देण्यात आली आहेत. मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकरी आज हवालदिल असून बिल थकबाकीचे कारण देत वीजजोडणी कापली जात आहे. वीजजोडणी तोडली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते; पण त्यांचे कोणी ऐकत नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. उसाचे गाळप होणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना असून महात्मा फुले कर्जमाफी योजनेत अजून अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. सरकारला केवळ दारू उत्पादक आणि विक्रेत्यांची चिंता आहे असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा :  सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

चहापानावर बहिष्काराची परंपरा कायम

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची विरोधकांची परंपरा यंदाही कायम राहिली. मलिक यांना सरकार पाठीशी घालत असल्याने या सरकारच्या चहापानाला जाण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

The post हे दाऊद समर्पित सरकार ! देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र; अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये …