क्रिकेट

मोहम्मद हाफिजची चमकदार कामगिरी, लाहोर कलंदर्स प्रथमच चॅम्पियन

PSL 2022 Final: पाकिस्तान सुपर लीगमधील अंतिम सामन्यात मुल्तान सुल्तांसला (Multan Sultans) 42 धावांनी पराभूत करून लाहोर कलंदर्सनं (Lahore Qalandars) पीसीएलच्या  ट्राफीवर नाव कोरलं आहे. शाहीन आफ्रिदीच्या (Shaheen Shah Afridi) नेतृत्वाखाली लाहोर कलंदर्सनं पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकलीय. या सामन्यात पाकिस्तान माजी खेळाडू मोहम्मद हाफिजनं (Mohammad Hafeez) केलेल्या चमकदार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.  मोहम्मद हाफिजची चमकदार कामगिरीलाहोरच्या विजयात मोहम्मद हाफिजंन मोलाचा …

Read More »

Vinod Kambli : विनोद कांबळीला आधी अटक, मग जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि काही काळानंतर त्याला जामीन मिळाला होता. विनोद कांबळीवर मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या सोसायटीच्या गेटवर कार ठोकल्याचा आरोप आहे, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळीवर भारतीय दंड संहिता कलम 279 (बेपर्वाईने वाहन चालवणे), 336 (इतर व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण करणे) आणि …

Read More »

Shreyas Iyer : तीन सामने, तीन अर्धशतकं, श्रेयस अय्यरनं विराटला टाकलं मागे

Shreyas Iyer : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात भारताने सामना 6 विकेट्सनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे. या सामन्याचा हिरो ठरला आहे श्रेयस अय्यर. श्रेयसने दमदार अर्धशतकाच्या जोरावर सामना जिंकवला. पण सोबतच त्याने विराट कोहलीचा एक विक्रमही मोडला आहे.  श्रेयसने श्रीलंकेविरुद्ध सलग तिसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतक झळकावल्याने त्याने कोहलीच्या सलग तीन टी20 सामन्यात अर्धशतकं …

Read More »

श्रेयस अय्यरचं धडाकेबाज अर्धशतक, भारताचा 6 विकेट्सनी विजय, श्रीलंकेला दिला व्हाईट वॉश

IND vs SL, 3rd T20: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात भारताने तिसरा सामना 6 विकेट्सनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने धडाकेबाज असं सलग तिसरं अर्धशतक झळकावत सामना भारताला सहज जिंकवून दिला आहे. भारताने श्रीलंकेचं 147 धावाचं आव्हान 16.5 ओव्हरमध्ये संपवत सामना जिंकला आहे. वेस्ट इंडीजनंतर आता भारताने श्रीलंकेलाही व्हाईट …

Read More »

AUS vs PAK : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये दाखल

Australia Tour of Pakistan : तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. रविवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ इस्लामाबाद विमानतळावर पोहचला. ऑस्ट्रेलिया संघ आणि सपोर्टिंग स्टाफसह 35 सदस्यांचा संघ पाकिस्तानमध्ये पोहचला आहे. पाकिस्तानमध्ये पोहचल्यानंतर कसोटी कर्णधान पॅट कमिन्सने (Pat Cummins) तेथील सुरक्षा व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले. तसेच आम्ही येथे सुरक्षित असल्याचे सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत ऑस्ट्रेलिया संघाचे स्वागत …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात रोहितचा आणखी एक पराक्रम

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्माशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) आणखी एका विक्रमाची नोंद केलीय. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहचलाय. हा विक्रम पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिक याच्या नावावर होता. धर्मशाला येथील रोहितचा 125वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. तो जगातील …

Read More »

IND vs WI, 3rd T20 : श्रीलंकेचा कर्णधार दासुनची एकहाती झुंज, भारताला विजयासाठी 147 धावांची गरज

<p><strong>IND vs WI, 3rd T20 : </strong><a href="https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-sl-2022-ishan-kishan-ruled-out-of-3rd-t20i-1036649">भारत विरुद्ध श्रीलंका</a> (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात <a href="https://marathi.abplive.com/news/sports">श्रीलंका संघाने</a> कर्णधार दासुन शनाकाच्या खेळीच्या जोरावर 146 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी आता 147 धावा करायच्या आहेत. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने आधीच मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आता हा …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यातून ईशान किशन बाहेर

IND vs SL 3rd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर, भारतीय संघाचा सलामीवीर ईशान किशनला (Ishan Kishan) अखेरच्या सामन्यात विश्रांती देण्यात आलीय. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट स्डेडिअमवर …

Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या टी20 सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने आधीच मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आज भारताला श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याची उत्तम संधी आहे. तर दुसरीकडे श्रीलंका शेवटचा सामना किमान जिंकून शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल.  …

Read More »

भारत-श्रीलंका मालिकेतील अखेरच्या टी20 सामन्याला सुरुवात, नाणेफेक जिंकत श्रीलंकेची प्रथम फलंदाजी

IND vs SL 3rd T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि शेवटचा सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथील मैदानात खेळवला जात आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजी करुन एक मोठं आव्हान भारताला देण्याच्या तयारीत आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने आधीच मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. …

Read More »

राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी! चौथ्यांदा मेक्सिको ओपनचं विजेतेपद पटकावलं

Mexican Open Final: स्पेनचा सुपरस्टार टेनिसपटू राफेल नदालनं (Rafael Nadal) चौथ्यांदा मेक्सिको ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावून विक्रम रचलाय. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या नदालनं मेक्सिको ओपनच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीचा (Cameron Norrie) 6-4, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावलंय. नदालनं आणि नॉरी यांच्यात पहिल्या सेटमध्ये चांगली झुंज पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये नदालनं नॉरीची …

Read More »

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 2 धावांनी विजय, हरमनप्रीतचं दमदार शतक

ICC Women’s World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022च्या सराव सामन्यात भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला 2 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताची फलंदाज हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) शतक ठोकलं. तर, सलामीवीर यस्तिका भाटियानंही अर्धशतकीय कामगिरी केलीय. त्यानंतर गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) ताकद दाखवली. या सामन्यात तिनं दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं.  नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम गोलंदाजीचा …

Read More »

आयपीएल 2022 चा शुभारंभ चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्याने, पण समोर मुंबई नाही तर ‘हा’ संघ

IPL 2022 Update: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता जवळपास महिनाच शिल्लक आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार असून हा सामना नेमका कोणामध्ये खेळवला जाणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. शक्यतो मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात दरवर्षी हा सामना खेळवला जातो. पण यंदा मात्र चेन्नईच्या समोर मुंबई नाही तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ असणार आहे.  …

Read More »

भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या टी20 सामन्याला सुरुवात, अशी आहे भारताची अंतिम 11

IND vs SL, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने आधीच मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आज भारताला श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याची उत्तम संधी आहे. तर दुसरीकडे श्रीलंका शेवटचा सामना किमान जिंकून शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल. …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माची विक्रमाला गवसणी

Rohit Sharma: भारतानं दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेवर विकेट्स राखून विजय मिळवला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेनं दिलेलं 184 धावांचे लक्ष्य भारतानं 17.1 षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झालीय. रोहित शर्माची विक्रमाला गवसणी– रोहित शर्माने सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या शोएब मलिकच्या विक्रमाची बरोबरी …

Read More »

ईशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज, तिसऱ्या टी-20 सामन्यातून मुकणार?

Ishan Kishan Discharged: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला फलंदाजी करताना दुखापत झाली. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारानं 144 किमी वेगानं टाकलेला बाऊन्सर ईशान किशनच्या डोक्याला जाऊन आदळला. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी …

Read More »

देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन, देशविदेशातील धावपटूंचा सहभाग

Pune Marathon : देशामध्ये पहिल्या रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला काल रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. देशात प्रथमच अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. दरवर्षी होणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा या वेळी रात्री घेण्याचे कारण म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. मात्र ही स्पर्धा रात्री घेण्यात आली असली तरी धावपटूंचा आणि पुणेकरांचा उत्साह …

Read More »

IND vs SL : श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी, भारताने श्रीलंकेला सात गड्यांनी हरवले

IND vs SL, 2nd T20I : श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरा टी-20 सामना सात गड्यांनी जिंकला आहे. श्रीलंका संघाने दिलेले 184 धावांचे आव्हान भारतीय संघाने 18 व्या षटकातच तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याची मालिकेक 2-0 च्या फरकाने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघाने श्रीलंका संघाचाही मालिकेत पराभव केला आहे. भारतीय संघाचा …

Read More »

IND vs SL : भारतीय संघाला विजयासाठी 184 धावांचे आव्हान

IND vs SL, 2nd T20I : पथुम निसांका याच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकांत पाच बाद 183 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाला दुसरा सामना जिंकण्यासाठी 184 धावांचे आव्हान मिळाले आहे. दनुष्का गुणथिलका आणि पथुम निसांका यांनी श्रीलंका संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. पहिल्या काही षटकांमध्ये लंकेच्या सलामीवीरांना साधव फलंदाजी केली. त्यानंतर दोघांनाही तुफान फटकेबाजी केली. …

Read More »

महेंद्रसिंह धोनीला भेटल्यानंतर पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया

Shahnawaz Dahani: पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीनं नुकतीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत (Mahendra Singh Dhoni) झालेल्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup 2021) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर शाहनवाजनं धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी शाहनवाजनं धोनीसोबत एक फोटोही काढला होता, जो त्यावेळी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला …

Read More »