सावधान, डॉक्टर म्हणतात या पद्धतीने बटाटा खाणा-यांच्या नसा होतात नष्ट व शरीरभर पसरतो कॅन्सर

Side Effects of Aloo : उपवासात जर कोणता पदार्थ सर्वात जास्त खाल्ला जात असेल तर तो म्हणजे बटाटा! कारण बटाट्यापासून अनेक उपवासाचे पदार्थ सहज बनवता येतात. शिवाय बटाट्याचे पदार्थ खाल्ल्यावर पोटही बराच काळ भरलेले राहते. उपवासात खास करून तळलेले बटाटे, फ्रेंच फ्राईज किंवा बटाटा चिप्स अधिकाधिक खाल्ले जातात. आयुर्वेदिक डॉक्टर आणि गट हेल्थ कोच डॉ. डिंपल यांच्या मते, तळलेले बटाटे खाल्ल्याने Cancer होऊ शकतो.

कारण, जेव्हा तुम्ही बटाटे सोनेरी रंग येईपर्यंत तळता तेव्हा त्यामध्ये कर्करोग होणारे घटक तयार होतात. त्यामुळे डीप फ्राय, फ्रेंच फ्राईज आणि बटाटा चिप्स या स्वरूपातले बटाट्याचे पदार्थ खाणे सहसा टाळावे. चला आजच्या या लेखात याच फार कमी माहित असलेल्या गोष्टीबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :-iStock)

डीप फ्राईड बटाट्यांचे साईड इफेक्ट्स

तळल्यावर बटाटा बनतो धोकादायक

तळल्यावर बटाटा बनतो धोकादायक

डॉ.डिंपल म्हणाल्या की, बटाटे तळलेले असताना ऍक्रिलामाइड तयार होते. अनेक संशोधनांमध्ये हा घटक कार्सिनोजेनिक आढळला आहे. ज्यामुळे प्राणघातक कॅन्सर होतो आणि बटाट्याचे सर्व पोषणही नष्ट होते.
(वाचा :- शास्त्रज्ञांचा सल्ला – जेवणाआधी खा फक्त इतके बदाम, रक्तातील साखर कधीच वाढणार नाही, कायमचा टळेल डायबिटीजचा धोका)​

हेही वाचा :  सकाळच्या काळ्या चहाने केस धुतले तर मिळेल अशी चमक की व्हाल आश्चर्यचकीत

नसा होतात उध्वस्त

नसा होतात उध्वस्त

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ऍक्रिलामाइडमुळे मानवांमध्ये मज्जातंतूंचे नुकसान होते. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि त्यांचे कार्य देखील संपते.
(वाचा :- पाण्याला विष बनवतात या 11 गोष्टी, शरीराचा एक एक अवयव होतो कायमचा बाद,पिण्याआधी न चुकता करा CDCच्या या 5 गोष्टी)​

कसे तयार होते ऍक्रिलामाईड?

कसे तयार होते ऍक्रिलामाईड?

जेव्हा आपण कोणतेही स्टार्च फूड सोनेरी होईपर्यंत तळतो तेव्हा त्यात रासायनिक क्रिया होते आणि ऍक्रिलामाइड तयार होते. बटाटा हा सुद्धा एक स्टार्च फूड आहे. त्यामुळे जेव्हा बटाटा तळला जातो तेव्हा त्यात ऍक्रिलामाइड तयार होते. हे सामान्यतः तळलेले अन्न, बटाटा चिप्स आणि फ्रेंच फ्राईजमध्ये आढळते. हा घटक कुकीज, टोस्ट आणि कॉफीमध्ये देखील असतो.
(वाचा :- शास्त्रज्ञांचा दावा, नसांत साचलेलं घाण विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतो कांदा, फक्त या पद्धतीने करा वापर)​

बटाट्याचे पदार्थ बनवण्याचा सुरक्षित मार्ग

बटाट्याचे पदार्थ बनवण्याचा सुरक्षित मार्ग

कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक बटाटा मध्ये निर्माण होऊच द्यायचे नसतील तर उकडलेले, भाजलेले किंवा वाफवलेले बटाटे तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर बटाटा तळणे, भाजणे आणि शिजवण्यासाठीही कमी तापमानाचा वापर करावा. तसेच बटाट्याचा रंग हलका तपकिरी ठेवण्याचा प्रयत्न करा.
(वाचा :- Yoga for Sleep: झटक्यात पोट साफ होते, चिंता व स्ट्रेस मुळापासून उपटून अंथरूणात पडताच सुखाची झोप देतात हे 5 उपाय)​

हेही वाचा :  समृद्धी महामार्ग सुसाट! अवघ्या सहा दिवसात तब्बल इतक्या वाहनांनी केला प्रवास

शिजवण्याआधी भिजवा बटाटे

शिजवण्याआधी भिजवा बटाटे

डॉ. डिंपल यांनी सांगितले की, तळण्यापूर्वी किंवा भाजण्यापूर्वी बटाट्याचे तुकडे 15 ते 30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे ऍक्रिलामाइडचे उत्पादन कमी होते.
(वाचा :- Amitabh Bachchan यांना झाला Callus आजार, तळव्याच्या या आजाराने आहेत भयंकर वेदनेत, यामागची 5 कारणं आणि उपाय काय)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …