Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ED ची धाड

Maharashtra Political News : कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif 🙂 यांच्या कागल आणि पुणे येथील घरांवर ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. कोल्हापुरातील कागल येथील घरी अधिकारी दाखल झाल्यानंतर येथे मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून घराची झडती घेण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मुश्रीफ समर्थक जमा झाले आहे. (ED raids NCP leader Hasan Mushrif house in Kolhapur)

राज्यातील सत्तांतरानंतर मोठी कारवाई

राज्यातील सत्तांतरानंतर एखाद्या बड्या नेत्याच्या घरी आयकर विभाग आणि ईडीने छापेमारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीनंतर मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली असून जोरदार घोषणाबाजी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाचे 20 अधिकारी आज सकाळ 6.30 वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. त्यांनी मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. अजूनही आयकर विभाग आणि ईडीची तपासणी सुरु आहे. घरातील कुणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच बाहेरच्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.

चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात ईडीची कारवाई

पुणे येथे हसन मुश्रीफ यांच्या भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात ईडीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.  ब्रिक्स इंडीया प्रायव्हेट लिमीटेड, ई स्केअरसमोर, पेट्रोल पंपाच्या मागील इमारत, पाचवा मजला येथे ही कारवाई सुरु आहे. अधिकाऱ्यांकडून झाडाछडती सुरु आहे.

हेही वाचा :  Jitendra Awhad : "जितेंद्र आव्हाडांनी थेटरमध्ये तमाशा केला, म्हणून...", फडणवीसांची खोचक टीका!

चंद्रकांत गायकवाड, संचालक ब्रिक्स इंडीया प्रा. लि. लापिझ लाजुली, लेन नं. 5, साऊथ मेन रोड,  कोरेगाव पार्क या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. चंद्रकांत गायकवाड हे हसन मश्रिफांचे व्यसायिक भागीदार आहेत. ते  ब्रिक्स इंडीया कंपनीचे संचालक आहेत.  सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना ब्रिक्स इडीयाने उभारला आणि अप्पासाहेब नलावडे कारखाना देखील हीच कंपनी चालवत होती. तसेच गायकवाड व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी आहेत. कोलकात्ता स्थित कंपन्यांमधून पैसे मश्रिफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाडचा हात असल्याचा आरोप आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …