CA Final Result: देशात सीए परीक्षेत हर्ष चौधरी प्रथम

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत हर्ष चौधरी हा देशात प्रथम आला आहे. तर इंटरमिडीएट परीक्षेत मुंबईची तुलिका जलान देशात दुसरी आली आहे.

देशपातळीवर नोव्हेंबर २०२२मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा एकत्रित अंतिम निकाल ११.०९ टक्के लागला आहे. सीए अंतिम परीक्षेत इंदूर येथील शिखा जैन आणि मंगळूरू येथील राम्याश्री यांनी एकत्रित द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर नवी दिल्ली येथील मानसी अगरवाल हिने तृतीय क्रमांक मिळविला. देशपातळीवरून सीएच्या अंतिम ग्रुप एक परीक्षेला ६५,२९१ विद्यार्थी बसले होते. यातील १३,९६९ म्हणजेच २१.३९ टक्के विद्यार्थी या गटात उत्तीर्ण झाले. तर सीए अंतिम ग्रुप दोन परीक्षेला देशातील ६४,७७५ विद्यार्थी बसले होते. यातील १२,०५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटात १८.६१ टक्के निकाल लागला. तर या दोन्ही गटातील परीक्षेला २९,२४२ विद्यार्थी बसले होते. यातील ३,२४३ विद्यार्थी पास झाले. या दोन्ही गटातील परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा ११.०९ टक्के निकाल लागला.

देशात सीए इंटरमिडिएट परीक्षेत कर्नाळ येथील दिक्षा गोयल ही तरुणी देशात प्रथम आली. तर मुंबईतील तुलिका जलान ही द्वितीय आणि जयपूर येथील सक्षम जैन तृतीय आला. सीए इंटरमिडिएट परीक्षेत देशभरातून ग्रुप एकमध्ये एक लाख २६५ विद्यार्थी बसले होते. यातील २१,२४४ विद्यार्थी उतीर्ण झाले. ग्रुप एकचा २१.१९ टक्के निकाल लागला. ग्रुप दोनमध्ये ७९,२९२ विद्यार्थी बसले होते. त्यात १९,३८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाचा २४.४४ टक्के निकाल लागला. तर दोन्ही गटात ३७,४२८ विद्यार्थी बसले होते. यात ४,७५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटात १२.७२ टक्के निकाल लागला.

हेही वाचा :  ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

IAS Success Story: रुग्णालयातल्या करोना वॉर्डमध्ये करायचा काम, मिथून पाचव्या प्रयत्नात बनला आयएएस अधिकारी

पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्याची संधी, सहभागी होण्याची शेवटची तारीख वाढवली
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. औरंगाबादमध्ये एकूण ६९ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र ठरले. ‘आयसीएआय’तर्फे नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. औरंगाबादमधून अंतिम परीक्षेत एकूण ६१८ विद्यार्थी असून त्यापैकी १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ग्रुप एकसाठी एकूण १८३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ग्रुप दोनसाठी एकूण २४२ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. दोन्ही ग्रुपसाठी एकूण १९३ विद्यार्थी आले, त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुप परीक्षा उत्तीर्ण केल्या. शहरातून हर्षल औटे याने प्रथम क्रमांक मिळवला.

श्रीकर औसेकर याने द्वितीय, शुभम हिरणे तृतीय, सिद्धेश गणोरकर याने चौथा; तर किरण बोरा याने पाचवा क्रमांक मिळविला. नवीन सीएमध्ये हर्षल पाटणी, श्रीनंद मामीडवार, साक्षी गंगवाल, शिवम सोनवणे, तेजल सावंत, अनुजा जोशी, धनश्री भलगट, वरद पाठक, प्रतिक्षा कुलकर्णी, अनिकेत जाधव, धनश्री तांदळे, प्रतिक्षा साहुजी, अंकिता काळे, अनुजा साबू, सौरव अकोलकर, संदेश हिरप, अथर्व कुलकर्णी, विशाल वर्मा, अमोल सहाणे, प्रभाकर होडगीर, सुमीत मुळे, गौरव सहानी, अश्विन पालकर, गौरव फसाटे, पायल मुंद्रा, तानया बोरसे आदींचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे औरंगाबाद शाखेतर्फे अभिनंदन करण्यात आले.

हेही वाचा :  Success Story: पाचवेळा अपयशी पण खचला नाही; सहाव्या प्रयत्नात IES क्रॅक करुन देशात ४४ वा, गौरवची कहाणी जाणून घ्या

विद्यार्थी विकास योजना आता देशभरात

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …