कॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग ‘या’ टिप्स नक्कीच करा फॉलो

Cocktail Party : आजकाल रोज काही तरी वेगळी फॅशन येते आणि आपल्याला कळत नाही की आपण कोणते कपडे कधी परिधान केले पाहिजे. बऱ्याचवेळा तर असं होतं की आपलं कपाट हे कपड्यांनी भरलेलं असलं तरी देखील आपल्याला कुठे जायचं असेल तर प्रश्न पडतो की काय परिधान करावं. त्यात जर आपल्याला कोणत्या पार्टीत जायचं असेल तर मग झालंच. आपला कोणता ड्रेस हा कोणत्या कार्यक्रमात जाताना परिधान करायला हवा हे जर आपल्याला कळत नसेल तर मग आज आपण त्याविषयी थोडं जाणून घेऊया. जर तुम्हाला कॉकटेल पार्टीत जायचं असेल तर त्यासाठी कोणते कपडे परिधान केले पाहिजे किंवा तुमचा लूक कसा दिसला पाहिजे हे जाऊन घेऊया…

कॉकटेल पार्टीत जाण्यासाठी जर तुम्हाला कोणता ड्रेस परिधान करायचा हा प्रश्न पडला असेल तर असा प्रश्न येणं खूप योग्य आहे. कारण कॉकटेल पार्टीत जाताना आपल्याला कपडे परिधान करताना काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याचवेळा लोक वेगळेच कपडे परिधान करतात आणि त्यामुळे अनेकलोक तिथल्या लोकांनामध्ये वेगळे दिसून येतात. चला तर जाणून घेऊया कोणते ड्रेस परिधान करू शकतो. पार्टीत सगळे तुमच्याकडे पाहून आनंदानं आश्चर्यचकीत होतील किंवा पार्टीत तुम्ही सुंदर दिसाल यासाठी खालील दिलेल्या टिप्स फॉलो करा. 

हेही वाचा :  मराठा आरक्षणासाठी नेत्यांचा राजीनामा की मतनाट्य? गावागावत आंदोलन पेटले

हेही वाचा : सावत्र आईनं दिला Kiss आणि फातिमाचा भन्नाट लूक…. आमिरची लेक Ira Khan नं शेअर केले काही खास फोटो

थीम पार्टी किंवा नॉर्मल पार्टी पेक्षा कॉकटेल पार्टी ही वेगळी असते. कॉकटेल पार्टीत म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फॉर्मल कपडे परिधान करा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वत: ला वेगळं स्टाईल देखील करू शकतात. त्यामुळे तुमचा एक हटके लूक पाहायला मिळेल. नॉर्मल म्हणजेच कॅज्युअल शर्टसोबत तुम्ही डेनिम जीन्स आणि जॅकेटही परिधान करू शकता. 

कोणत्या कपड्याचे कपडे परिधान कराल
कॉकटेल पार्टीत जाताना कोणत्या कपड्याचे कपडे परिधान कराल यावर लक्ष देणं महत्त्वाचे आहे. कारण कपडे परिधान केल्यानंतर त्यात चालणं मस्ती करता येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते कपडे परिधान केल्यानंतर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही ना याची काळजी घ्या. त्यासोबत ते कपडे परिधान केल्यानंतर तुमचा लूक देखील उठून दिसेल याची काळजी घ्या. 

कॉकटेल पार्टीसाठी जे कपडे परिधान करणार आहोत त्याचं फॅब्रिक आहे महत्त्वाचं
कॉकटेल पार्टी ही इतर पार्ट्यांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे या पार्टीत एक स्पेशल फॅब्रिकचे कपडे परिधान करणं महत्त्वाचं आहे. त्यात तुम्ही वेलवेट किवा सिल्क फॅब्रिकला पसंती देऊ शकता. त्यामुळे तुम्ही फक्त ग्लॅमरस नाही तर तुमचा लूक बोल्डही दिसेल. 

हेही वाचा :  Pune Crime: मुलीला लॉजवर नेले, नग्न फोटो काढले आणि तब्बल सहा महिने... UP, बिहार नाही तर पुण्यात घडली भयानक घटना

कोणत्या रंगाचे कपडे निवडाल
कॉकटेल पार्टीत बऱ्याचवेळा लोक आमंत्र देताना थीम सांगतात. पण जर असं कधी झालं नाही तर तुम्ही गडद रंगाचे कपडे परिधान करू शकतात. त्याशिवाय माइल्ड ब्लू किंवा मग पांढऱ्या रंगाचा शर्ट देखील परिधान करू शकता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …