बापरे! चक्क जीभेवर उगवले केस, महिलेची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण

Women Tongue Truns Black Hair : सामान्यतः जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी नकारात्मक बोलते किंवा एखाद्याविरुद्ध काहीतरी वाईट घडत असल्याबद्दल बोलते आणि ते खरे असल्याचे सिद्ध होते, तेव्हा साधारण असे म्हटले जाते की त्या व्यक्तीची जीभ काळी आहे. जीभ काळी असणे ही केवळ एक म्हण आहे. अस आतापर्यंत वाटायटं. पण अशीच एक घटना वैद्यकीय विश्वात समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीची जीभ काळी पडली आणि त्याच जीभेवर काळे केस आल्याचे समोर आले आहे. 

एका महिलेची जीभ काळी होऊन अचानक त्याच्यावर केस उगवल्याची विचित्र घटना घडली.  ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या केस रिपोर्टनुसार (British Medical Journal Case Reports), 60 वर्षीय महिलेला रेक्टर कॅन्सर (Rector Cancer) म्हणजेच पोटाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. जपानमध्ये तिच्यावर 14 महिन्यांपूर्वी उपचार सुरू होते. केमोथेरपीचे स्वतःवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ही महिला मिनोसायक्लिन घेत होती. याचा वापर पुरळांपासून ते न्यूमोनियापर्यंत सर्व गोष्टींवर उपचार करण्यासाठी वापरले जातो. 

याबाबत डॉक्टरांनी नोंदवले की, पॅनिटुमुमब-प्रेरित (Panitumumab-induced) त्वचेच्या जखमांना प्रतिबंध करण्यासाठी महिलेला 100 मिग्रॅ/दिवस मिनोसायक्लिन दिले होते. काही वेळाने त्या प्रतिक्रियेमुळे महिलेची जीभ काळी पडली आणि जीभेवर केस उगवल्याचे दिसून आले. अँटिबायोटिक रिअॅक्शनमुळे महिलेला ‘ब्लॅक हेअरी टंग (बीएचटी)’चा बळी पडली. या प्रकरणात महिलेची जीभ काळी तर झालीच पण तिची त्वचाही राखाडी झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की, महिलेचा चेहरा राखाडी झाला. त्यानंतर महिलेने तोंड उघडून जीभ दाखवली, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. कारण, त्या महिलेच्या जिभेचा रंग काळा झाला होता. तसेच जीभेवर केसही उगवले होते. या सर्व प्रकारानंतर महिलेची औषधे बदलली. त्यानंतर तिची प्रकृती सुधारेल अशी अपेक्षा केली जात होती.

हेही वाचा :  VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...

अशी घटना अमेरिकेतही घडली 

अमेरिकेत गेल्या वर्षीच असे प्रकरण समोर आले असते. तिथे एका व्यक्तीला समजले की त्याची जीभ वेगळ्या प्रकारे बदलत आहे. जिभेवर केस वाढले आणि अधिक काळे होते. मध्यभागी पिवळ्या रंगाचा प्रभाव आहे. पण त्याला कोणताही धोका जाणवत नाही. ही धक्कादायक अवस्था पाहून डॉक्टरांसह 50 वर्षीय व्यक्तीच्या नातेवाईकांनाही धक्का बसला. जिभेच्या वरच्या बाजूला काळ्या रंगाचा जाड थर दिसत होत. पिवळ्या रंगाचा परिणाम जिभेच्या मध्यभागी आणि मागील बाजूस होतो.

हा आजार सहन करणे कठीण आहे

हा शोधनिबंध जामा डर्माटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. डॉक्टरांनी या जिभेचा अभ्यास करून जर्नलमध्ये माहिती प्रकाशित केली होती. डॉक्टरांनी सांगितले की, ही व्यक्ती काळ्या केसाळ जीभ सिंड्रोमने ग्रस्त होती. हे नाव सर्जनशील असू शकते. पण हा आजार दिसायला आणि सहन करायला खूप त्रासदायक असतो. हा रोग प्रतिजैविकांच्या दुष्परिणामांमुळे होऊ शकतो. तोंडातील घाण, कोरडे तोंड, धुम्रपान किंवा कोमट अन्न खाणे ही कारणे असू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …