Career Tips: लाखोंचा पगार आणि चांगल्या नोकरीसाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात? जाणून घ्या सर्वकाही

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Dec 2022, 10:00 am

Career Tips: प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास कौशल्ये असतात. या कौशल्याचा वापर करुन ती व्यक्ती कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचते. सध्या मार्केटमध्ये कौशल्यावर आधारित नोकऱ्यांना मागणी आहे. तुम्ही जर कॉलेजमध्ये शिकत असताना या कौशल्यांवर काम करू लागलात तर आपल्याला करिअर वाढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

 

Career Tips
Career Tips:लाखोंचा पगार आणि चांगल्या नोकरीसाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात? जाणून घ्या

हायलाइट्स:

  • कौशल्याधारित नोकऱ्यांना जास्त मागणी
  • मिळेल लाखोंचा पगार आणि चांगली नोकरी
  • जाणून घ्या सविस्तर तपशील
Career Tips: आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असते. पण ते वेळीच ओळखता आले पाहिजे आणि त्यावर मेहनत घेणे गरजेचे आहे. असे केल्यास आपण आपल्या करिअरमध्ये विशिष्ट उंचीवर पोहोचू. सध्या मार्केटमध्ये कौशल्य असलेल्या उमेदवारांची मागणी जास्त आहे. अशा उमेदवारांना मोठमोठ्या कंपन्या भरघोस पगार ऑफर करतात. या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक असते? याबद्दल जाणून घ्या.

चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्यासाठी तुमच्याकडे खूप शिक्षण असणे गरजेचे असते. पण तुमच्याकडे कौशल्य असेल तरीही तुम्ही हे साध्य करु शकता. आम्ही तुम्हाला कौशल्याची यादी देत आहोत. या कौशल्यांवर आतापासून काम करायला सुरुवात केलात तर करिअर ग्राफ उंचावेल. करिअरच्या वाढीसाठी आणि चांगल्या पगारासाठी कोणती नोकरी कौशल्ये आवश्यक आहेत ते जाणून घ्या

हेही वाचा :  क्रिकेटच्या वेडापायी शाळेने काढून टाकले, पॉकेट डायनामाइट ईशान किशनच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या

Career Tips: येत्या ५ वर्षांत तुम्हाला काय करायचे आहे? करिअर प्लानिंगचा होईल खूप फायदा; टिप्स जाणून घ्या
‘आम्ही तुम्हाला नोकरी का द्यायची?’, मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचे ‘असे’ द्या प्रभावी उत्तर

कौशल्य

१) मार्केटिंग (Marketing)
२) इंजिनीअरिंग (Engineering)
३) स्प्रिंग बूट (Spring Boot)
४) बिझनेस डेव्हलपमेंट (Business Development)
५) सेल्स मॅनेजमेंट (Sales Management)
६) सेल्स अॅंण्ड मार्केटिंग (Sales & Marketing)
७) एसक्यूएल (Structured Query Language)
८) सेल्स (Sales)
९) सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
१०) मायक्रोसॉफ्ट एज़ुर (Microsoft Azure)

कॉलेजमधून सुरुवात करा

नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातील कौशल्यांवर भर देण्यात आला आहे. याद्वारे कमी पात्रता असूनही चांगली नोकरी मिळवता येते. एवढेच नाही तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतःचा व्यवसाय (स्टार्टअप इंडिया) देखील सुरू करू शकता.

Career Tips: अनुभव नसला तरी सहज मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, जाणून घ्या ५ टिप्स

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  मिरा-भाईंदर महापालिकेत नोकरीची संधी, भरती प्रक्रियेविषयी जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …