अचानक नोकरी गेली तर काय करायचं? ‘या’ टिप्स करिअरमध्ये सर्वांनाच उपयोगी

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Nov 2022, 11:47 am

Recession2k22:जागतिक मंदीचे परिणाम हळुहळू दिसू लागले आहेत. ट्विटर, मेटा सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. पुढील काही महिन्यांत अनेक कंपन्यांमध्ये असे चित्र दिसू शकते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर केल्यानंतर अचानक कामावरुन काढून टाकले जाणे हे पचविणे फार कठीण असते. अशावेळी येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी करिअर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची माहिती घेऊया.

 

Job Tips
अचानक नोकरी गेली तर काय करायचं? ‘या’ टिप्स करिअरमध्ये सर्वांनाच उपयोगी

हायलाइट्स:

  • जगातील नोकरदार वर्गावर मंदीचे सावट
  • अचानक नोकरी गेली तर काय करायचं?
  • ‘या’ टिप्स करिअरमध्ये सर्वांनाच उपयोगी
हेही वाचा :  MAH LLB CET 2022: महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु
Recession2k22: गेल्या दोन आठवड्यांपासून आयटी क्षेत्रातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. सर्वप्रथम, ट्विटरने नवीन बॉस एलोन मस्क येताच हजारो कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप्स दिल्या. यानंतर मेटाने देखील कर्मचारी कपात जाहीर केली. भारतातील सर्वात मोठी एड-टेक कंपनी Byju’s ने नोकऱ्या कपातीची घोषणा केली आहे. अहवालानुसार, पुढील काही महिन्यांत अनेक कंपन्यांमध्ये असे चित्र दिसू शकते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर केल्यानंतर अचानक कामावरुन काढून टाकले जाणे हे पचविणे फार कठीण असते. अशावेळी येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी करिअर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची माहिती घेऊया.

आपत्कालीन निधी

सहा महिने ते एक वर्षाचे उत्पन्न आपत्कालीन निधी म्हणून बाजूला ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला नोकरीत कपातीचा सामना करावा लागला तर, तुम्हाला दुसरी नोकरी मिळेपर्यंत पुढील काही महिने टिकून राहण्यासाठी तुम्ही किमान या पैशावर अवलंबून राहू शकता.
तुमच्या पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी असावी. लिक्विड फंड किंवा बचत खात्यात पैसे असल्यास गरजेवेळी उपयोगी येतील.

आरोग्य विमा

कंपनीच्या आरोग्य विम्यावर पूर्णपणे विसंबून राहू नये आणि याचे एक प्रमुख कारण म्हणजे कामावरून काढून टाकले गेल्यास तुम्ही योजनेचे लाभार्थी नसता. त्यामुळे तुम्ही कामाच्या बाहेर असताना एमर्जन्सी उद्भवल्यास खिशातून बिल भरावे लागेल, ज्यामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. म्हणून, स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वैयक्तिक आरोग्य विमा घेणे नेहमीच उचित आहे.

हेही वाचा :  २०२३ मध्येही टेक कंपन्यांची वाईट अवस्था! पहिल्या पंधरवड्यात २४ हजार कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं! ‘मेटा’मध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!

बजेट बनवा

आर्थिक संसाधने आधीच कमी असतात. त्यामुळे स्वत:च्या खर्चावर बारकाईने लक्ष देणे आणि मासिक बजेटमध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. अन्न, वीज बिले, ईएमआय इ. या गोष्टी टाळता येत नाहीत. त्यामुळे त्यानुसार तुमचे मासिक खर्च ठरवा.

पर्यायी खर्च कमी करा

मर्यादित उत्पन्न असताना तुम्ही नेहमी बचत करणे आवश्यक आहे. बाहेर खाणे, चित्रपट पाहणे, मासिकांचे वर्गणी अशा मनोरंजनात्मक, ऐच्छिक खर्चांमध्ये कपात करता येऊ शकते. इत्यादींसाठी पैसे आधीच बाजूला ठेवावेत. परंतु, सध्या तुम्ही असे खर्च पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अचानक नोकरी गेल्यास बचत आणि गुंतवणूक कमी करता येऊ शकते.

नवीन कर्ज घेणे टाळा

वैयक्तिक कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे ही गोष्ट टाळली पाहीजे. ही कर्जे अल्पावधीत पैशाच्या त्रासातून बाहेर पडण्याचा तुलनेने सोपा मार्ग वाटू शकतात, परंतु त्यांचे व्याजदर खूप जास्त असतात. याचा पुढच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो.

फेसबुकनंतर आता Amazonमध्ये नोकर कपात! ३,५०० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

हेही वाचा :  जागतिक मंदी म्हणजे काय? ती केव्हा येते? आल्यावर काय करायचं? अर्थतज्ञांचा इशारा समजून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …