‘या’ बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियमामुळे तुमचा फायदा कि तोटा? जाणून घ्या

 

 

SBI ATM Withdrawl Rule: देशात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच बँक एटीएममधून देखील फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बँकांकडून ग्राहकांना वारंवार सावध केले जाते. तसेच, ग्राहकांच्या सुविधेसाठी व सुरक्षित आर्थिक व्यवहार पार पडावे यासाठी बँकांकडून वेळोवेळी नियमात देखील बदल केले जातात.

यातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. ग्राहकांना सुरक्षितरित्या एटीएममधून रोख रक्कम काढता यावी, यासाठी बँकेने नियमात (SBI ATM Rules) बदल केला आहे. त्यामुळे येथून पुढे SBI च्या एटीएममधून पैसे काढायला गेल्यास तुम्हाला हा नियम माहित असणे गरजेचे आहे.  

SBI च्या ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक विशेष क्रमांक द्यावा लागेल. जर तुम्ही हा नंबर टाकला नाही तर तुमचे पैसे अडकणार. दरम्यान एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. या नियमाबद्दल जाणून घेऊया.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार या नवीन नियमानुसार SBI ग्राहक ओटीपीशिवाय (OTP) पैसे काढू शकत नाहीत. यामध्ये, पैसे काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल जो एटीएममधून पैसे काढल्यानंतरच टाकणं बंधणकारक असणार आहे. 

हेही वाचा :  बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

बँकेने दिली माहिती

बँकेने या नियमाबाबत आधीच माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, ‘एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असेल. SBI ग्राहकांनी OTP आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करेल याची जाणीव ठेवली पाहिजे.

काय आहे नियम माहित?

ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँकेने 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यावर नवीन नियम लागू केला आहे. या अंतर्गत एसबीआय ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून आणि त्यांच्या डेबिट कार्डच्या पिनमधून त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेल्या ओटीपीसह 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देते. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

वाचा : तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे  

येथे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

– यासाठी तुम्हाला एक ओटीपी लागेल, त्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकणार नाही.
– तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
– हा OTP चार अंकी क्रमांक असेल, जो ग्राहकाला एका व्यवहारासाठी मिळेल.
– तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम टाकल्यानंतर तुम्हाला एटीएम (ATM) स्क्रीनवर ओटीपी टाकण्यास सांगितले जाईल.
– रोख काढण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करावा लागेल.

हेही वाचा :  Optical Illusion : 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

बँकेने हे पाऊल का उचलले?

OTP आधारित रोख पैसे काढण्याची गरज का आहे? या प्रश्नावर बँकेने सांगितले की, ‘ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवता यावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. भारतात 71,705 बीसी आउटलेटसह 22,224 शाखा आणि 63,906 ATM/CDM चे सर्वात मोठे नेटवर्क आहे. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अनुक्रमे 9.1 कोटी आणि 2 कोटी आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …