क्रिकेटच्या वेडापायी शाळेने काढून टाकले, पॉकेट डायनामाइट ईशान किशनच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या

Ishan Kishans Education Details: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणाऱ्या ईशान किशनने खेळासाठी शाळा सोडली. इशानची क्रिकेटची आवड पाहून शिक्षकही हैराण झाले होते. वारंवार वर्गात उभे राहिल्यानंतरही इशान मैदानावर जाणे कमी करीत नव्हता. त्यामुळे अभ्यास आणि क्रिकेट एकत्र जाऊ होऊ शकत नाही हे शिक्षकांनी त्याला स्पष्टच सांगितले. आपण खेळासाठी अभ्यास सोडू शकतो असे ईशानने शिक्षकांना सांगितले होते. त्यानंतर त्याने क्रिकेटसाठी शाळा सोडली होती. ईशानला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड आहे. त्याची क्रिकेटची आवड एवढी होती की तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. त्याच्या या आवडीमुळे तो अभ्यासात मागे पडला.

ईशान किशनने पटनाच्या दिल्ली प्रायमरी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पटना येथील कॉलेजमधून त्याने पुढील शिक्षण पूर्ण केले. मी ईशानसारखा क्रिकेटप्रेमी कधीच पाहिला नाही. क्रिकेटसाठी तो सगळे खाणे-पिणे विसरुन जायचा. त्याला क्रिकेटपेक्षा काहीही महत्त्वाचं नाही असं वाटत होतं. तो खेळण्यासाठी पाटण्याहून रांचीला कधी पोहोचायचा आणि वर्गात कधी यायचा हे कळत नसे, असे ईशानची बालपणीची मैत्रीण यशस्वी सिंग सांगते.

ईशानच्या क्रिकेट वेडामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यानंतरही ईशानला त्रास झाला नाही कारण त्याची बॅट एक ना एक दिवस भारतासाठी इतिहास घडवेल हे त्याला माहीत होते असेही ती सांगते.

हेही वाचा :  ESIC Recruitment 2023

यशस्वी म्हणते की आज तो दिवस आठवतोय जेव्हा ईशानने असं म्हटलं होतं. यशस्वी सांगतात की तो डीपीएस पब्लिक स्कूलमध्ये इशानसोबत नववीच्या वर्गात शिकत असे आणि तिथूनच त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. यानंतर इशानने फुलवारी येथील एका खासगी शाळेतून मॅट्रिक केले.

वयाच्या ७ व्या वर्षी बॅट हातात
आशियाना, बेली रोड, पटना येथे वयाच्या सातव्या वर्षी बॅट हातात घेणाऱा ईशान सर्वोत्तम यष्टिरक्षक आणि फलंदाज आहे. तो झारखंडकडून रणजी खेळायचा. प्रशिक्षक आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ईशानची प्रतिभा फुलली आणि त्याला अंडर-१९ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …