Cancer diet: योग्य पद्धतीने खा ‘हे’ 6 अँटी-कॅन्सर पदार्थ, पहिल्याच स्टेजमध्ये टळेल कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका!

कर्करोग हा एक भयंकर आणि प्राणघातक आजार आहे. अर्थात, कॅन्सरवर अनेक उपचार आहेत परंतु हे जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे योग्य वेळी ओळखून त्यावर यशस्वी उपचार करता येऊ शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. कॅन्सर असो वा इतर कोणताही आजार, प्रत्येकामध्ये सकस आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळेच अनेकांना हे जाणून घ्यायचे असते की कॅन्सर टाळण्यासाठी काय खावे? साहजिकच कोणत्याही आजाराशी लढा देणे, टाळणे किंवा बरे होणे यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. कॅन्सरविरोधी आहार (Anti cancer diet ) घेतल्यास कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकन कॅन्सर सोसायटी शिफारस (ACS) मानतात की निरोगी वजन राखण्यासाठी दररोज जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, संशोधकांना असे आढळून आले आहे की दररोज खाल्लेले काही पदार्थ कर्करोगास प्रतिबंध करतात आणि हे अँटीकॅन्सर फूड लिस्टचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतात. अर्थात, बाजारात उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांमुळे कर्करोग बरा होऊ शकत नाही, परंतु काही गोष्टींमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म असतात. अनेक संशोधने असा दावा करतात की रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्याची क्षमता असते. चला तर जाणून घेऊया कर्करोगापासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे.

हेही वाचा :  पावसाळ्यात विजेचा शॉक बसण्याचा धोका; घरात आणि बाहेर कोणती काळजी घ्याल?

काळी द्राक्षे

तुम्ही भरपूर हिरवी द्राक्षे खात असाल पण जर तुम्हाला कॅन्सरपासून संरक्षण हवे असेल तर तुम्ही लाल द्राक्षे खाण्यास सुरुवात करावी. लाल द्राक्षांमध्ये सुपर अँटीऑक्सिडंट ऍक्टिनने भरलेल्या बिया असतात. रेड वाईन आणि लाल द्राक्षाच्या ज्यूसमध्ये देखील आढळणारे हे कर्करोगाशी लढणारे रसायन विशिष्ट प्रकारचे कर्करोग, हृदयरोग आणि इतर जुनाट आजारांपासून महत्त्वपूर्ण संरक्षण देऊ शकते.

(वाचा :- Covid19 4th wave : बापरे, रिसर्चमध्ये मोठा खळबळजनक दावा – जूनमध्ये येणार करोनाची चौथी लाट, यावेळी ‘ही’ 10 लक्षणं माजवणार कहर!)

ब्रोकोली

वेबएमडीच्या एका अहवालानुसार, अलबामा विद्यापीठातील कर्करोग आणि कॅन्सर अँड प्रिवेंशन कंट्रोलचे डायरेक्टर वेंडी डेमार्क-वाहनफ्राइड यांनी सांगितले की ब्रोकोली, बेरी आणि लसूण यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी काही मजबूत संबंध असल्याचे आढळले आहे. या गोष्टींमध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असतात. फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध या गोष्टी कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. ब्रोकोलीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही ती उकळून खावी.

(वाचा :- Mahashivratri 2022 : ‘या’ आयुर्वेदिक झाडाची पाने चावल्याने डायबिटीजसारखे 5 भयंकर आजार होतात बरे..!)

मासे

सॅल्मन, ट्यूना आणि हेरिंगसारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. हे एक प्रकारचे फॅटी ऍसिड आहे जे प्रोस्टेट कर्करोगाच्या कमी जोखमीशी जोडलेले आहे. जर तुम्ही मासे खात नसाल तर तुम्ही या कॅन्सर विरोधी पदार्थाविषयी एकदा जरूर विचार केला पाहिजे. तथापि, आपण ओमेगा -3 साठी फ्लेक्स सीड्स देखील खाऊ शकता.

हेही वाचा :  Weight Loss : वयाच्या 22 व्या वर्षी या मुलाचे वजन तब्बल 137 किलोवर पोहचले, काहीच दिवसांत ‘ही’ ट्रिक वापरून घटवलं 63 किलो वजन..!

(वाचा :- Weight Loss : वयाच्या 22 व्या वर्षी या मुलाचे वजन तब्बल 137 किलोवर पोहचले, काहीच दिवसांत ‘ही’ ट्रिक वापरून घटवलं 63 किलो वजन..!)

लसूण व कांदा

संशोधनात असे आढळून आले आहे की लसूण आणि कांदे नायट्रोसामाइन्सच्या निर्मितीस प्रतिबंध करू शकतात. हे कार्सिनोजेनिक घटक आहेत, जे शरीराच्या अनेक भागांवर विशेषतः पोट, यकृत आणि स्तनांवर परिणाम करतात. किंबहुना, लसूण किंवा कांदा जितका तिखट असेल तितकी त्यात रासायनिक दृष्ट्या सक्रिय सल्फर संयुगे जास्त प्रमाणात असतात जी कर्करोगास प्रतिबंध करतात.

(वाचा :- महागड्या डाएट प्लान आणि जिमला करा बाय बाय, CDC ने सांगितलेले ‘हे’ 4 उपाय करा, झटक्यात कमी होईल वजन!)

ग्रीन टी

ग्रीन टीच्या पानांमध्ये कॅटेचिन नावाचे अँटिऑक्सिडेंट असतात, जे फ्री रेडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करतात. अभ्यासात असे आढळून आले आहे की ग्रीन टी मधील कॅटेचिन ट्यूमर कमी करू शकतात आणि ट्यूमरच्या पेशींची वाढ कमी करू शकतात. ग्रीन आणि ब्लॅक टीमध्ये कॅटेचिन असतात, पण तुम्हाला ग्रीन टी मधून जास्त अँटिऑक्सिडंट्स मिळू शकतात. यासाठी तुम्ही रोज एक कप ग्रीन टी प्यावा.

(वाचा :- Weight loss hacks : भात शिजवताना टोपात एक चमचा ‘ही’ एक गोष्ट घाला, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी..!)

हेही वाचा :  Harnaaz Sandhu Disease : मिस यूनिव्हर्स हरनाज संधू ‘या’ विचित्र व भयंकर आजारामुळे होत चाललीये लठ्ठ, साधं जेवण खाण्यावरही आहे बंदी..!

टोमॅटो

अभ्यासात असे आढळून आले आहे की टोमॅटोमधील अँटिऑक्सिडंट लाइकोपीन हा एक अतिशय शक्तिशाली पदार्थ आहे आणि तो बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ई पेक्षा अधिक शक्तिशाली असू शकतो. लाइकोपीन हे कर्करोगाशी लढणारे अन्न आहे जे प्रोस्टेट आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या विशिष्ट कर्करोगापासून संरक्षण करू शकते. हे लक्षात ठेवा की यासाठी तुम्ही शिजवलेले टोमॅटो खावे कारण शिजवून खाल्याने लाइकोपीन योग्य प्रकारे बाहेर पडते.

(वाचा :- Bad Habits : विषासमान आहेत तुमच्या सकाळच्या या 5 सवयी, लवकरात लवकर बदला अन्यथा धोक्यात येईल आयुष्य..!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?

Jarange and Bhujbal Dispute: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद …

‘लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील (NCP) …