Cancer व Cholesterol हे भयंकर आजार मुळापासून संपवतात या 5 भाज्या

थंडीचा महिना सुरु झाला आहे आणि हा तोच हंगाम आहे जेव्हा भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. आता भाज्या आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आणि चांगल्या आहेत हे काही तुहाला नव्याने सांगण्याची गरज नाही. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स (Vitamins), मिनरल्स (Minerals), कॅल्शियम (Calcium), फायबर (Fiber) आणि प्रोटीन (Protein) असे सगळे पोषक तत्व असतात जे एखाद्या व्यक्तीच्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचे असतात.

म्हणूनच डॉक्टर आणि तज्ज्ञ सुद्धा आवर्जून भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. भाज्या विविध प्रकारच्या असतात आणि प्रत्येक भाजीतून वेगवेगळे फायदे शरीराला मिळतात. हिवाळ्याचा काळ हा कंदमुळे प्रकारातील भाज्यांचा काळ मानला जातो. अमेरिकन डॉक्टर joshaxe यांच्या मते कंदमुळे फायबर आणि अँटीऑक्सिडंटने संपन्न असतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यांच्यात कॅलरी, फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. कंदमुळे ही कॅरीटीनॉईडचा चांगला स्त्रोत मानली जातात.

कंदमुळे का असतात उपयुक्त?

कंदमुळे फायबर आणि एंटीऑक्सिडेंटने संपन्न असतात. म्हणून अत्यंत प्राचीन काळापासून अशा प्रकारच्या भाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांच्या सेवनाने आपले शरीर अत्यंत सुस्थितीत राहते यामध्ये पोटेशियम, फोलेट, काम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट्स,फायबर, व्हिटामिन ए, बी आणि सी, मँगनीज, आयर्न आणि कॉपर सारखे शरीराला पोषक असणारे तत्व आढळतात. कंदमुळे खाल्ल्याने तुम्ही हेल्दी राहता, निरोगी आयुष्य जगता. शरीराची सर्व गरज यातून भागली जाते आणि आजारपणापासून शरीर मुक्त राहते.

(वाचा :- Weight Loss: कानाकोप-यात जाऊन जाळेल पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, झपाट्याने होते वेटलॉस, खा हा एक पदार्थ)

हेही वाचा :  Nitin Gadkari : पटलं तर मत द्या, नाहीतर... नितीन गडकरी यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?

कंदमुळे खाण्याचे फायदे

डॉक्टर सांगतात की जर तुम्ही नियमितपणे कंदमुळे प्रकारातील भाज्यांचे सेवन कारलं तर यामुळे शरीराला खूप जास्त फायदे मिळतात. जर तुमच्या शरीरात फायबरची कमतरता निर्माण झाली असेल तर कंदमुळे भाज्या खाल्ल्याने ही कमतरता सहज दूर होऊ शकते. या शिवाय ह्या भाज्या व्हिटामिन ए, सीयांची कमतरता देखील भरून काढतात. अजून काही फायदे विचाराल तर कंदमुळे प्रकारातील भाज्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते, त्वचा हेल्दी राहते, क्लीन दिसते, कॅन्सर आणि हृदयाशी निगडीत रोगांचा धोका कमी होतो. या शिवाय कोलेस्टेरॉल कमी होते आणि डायबेटीस व ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राखण्यास सहाय्य मिळते.

(वाचा :- Manuka Water : पोट साफ न होणं, मुळव्याध, गॅस-अपचन, आतडे-पोटाच्या सर्व समस्यांतून व्हाल मुक्त, प्या हे खास पाणी)

बीट

बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. बीट मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन आणि खनिज पदार्थ असतात, ज्यात व्हिटामिन अ, ब, क आणि ई तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांचा समावेश असतो. यामुळे अपचन, अतिसार यांसारखे आजार होत नाहीत. बीट मध्ये लोह सुद्धा अतिशय जास्त प्रमाणात असते यामुळे ऐनिमियाचा धोका कमी होतो. लोह हे लाल रक्ताच्या पेशींचे निर्माण वाढवते यामुळे शरीराच्या अवयवांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो. बीट मध्ये असलेले फायबर पचनतंत्र योग्य राखते आणि अपचन होऊ देत नाही.

(वाचा :- How To Purify Blood Naturally : रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय)

गाजर

गाजरात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन आणि मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात. हे असे कंदमुळ आहे त्याचा मागचा आणि पुढचा दोन्ही भाग खाता येतो. गाजर हे व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. त्यामुळे गाजर खाणे डोळ्यांसाठी चांगले असल्याचे म्हटले जाते. गाजर खाल्ल्याने दृष्टी चांगली होते. गाजरात मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राखण्यासाठी मदत करते. यातील कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन शारीरिक विकासात हातभार लावतात. गाजराचे सेवन एनिमियाचा धोका सुद्धा कमी करते. कारण यात लोह आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.

हेही वाचा :  '3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर...'; राज ठाकरे संतापले

(वाचा :- Liver Detox Naturally: लिव्हर फेल व सडण्याचा धोका होईल कायमचा दूर, हे पदार्थ करतात लिव्हरचा प्रत्येक कोना साफ)

मुळा

मुळ्यामध्ये ग्लुकोराफेनिन असते ज्यामध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात. मुळा रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधाची समस्या असेल तर ही भाजी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

(वाचा :- “सॉरी… मी रिप्लाय करू शकलो नाही…” हे वाक्य हलक्यात घेऊ नका, हा आहे एक भयंकर आजार, वाचा एक्सपर्ट्स काय म्हणतात)

रताळ

रताळे सुद्धा शरीरासाठी खूप फायद्याचे समजले जातात. शरीरातील मेटाबोलिज्म नीट ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे खनिज पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये रताळी खुप फायदेशीर ठरतात, कारण यामध्ये खूप खनिजे सापडतात. यात कॅल्शियम, लोह, मेग्नेशियम, फॉस्फरस, पोटेशियम, सोडियम आणि झिंक सुद्धा असते. हे सर्व तत्व शरीरासाठी उपयोगी असतात. रताळ्यात केवळ व्हिटामिन ए सापडत नाही तर इतर प्रकारचे व्हिटामिन जसे कि व्हिटामिन सी, ई, के आणि बी 1 ते बी 6 तसेच बी 9 सुद्धा आढळतेशारीरिक विकासासाठी हे सर्व व्हिटामिन अत्यंत गरजेचे असतात. रताळी खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिनची गरज पूर्ण होते.

हेही वाचा :  आम्हीच मदत केली म्हणणाऱ्या शाहांना कलावती बांदूरकरांचं उत्तर; म्हणाल्या, 'मदत राहुल गांधींनीच केली'

(वाचा :- रक्तातील साखर वाढल्यास होऊ शकतात Kidney Fail, किडन्या मजबूत व स्वच्छ ठेवण्यासाठी ताबडतोब करा हे साधेसोपे 5 उपाय)

शलजम

शलजममध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असते आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते. यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, जे पचनास मदत करते. ही भाजी व्हिटॅमिन ए, बी व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅंगनीज आणि तांबे यांचा चांगला स्रोत आहे.

(वाचा :- Causes of Piles : तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? मग करा हे उपाय, पोट साफ न झाल्यास होऊ शकतो हा गंभीर आजार)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

कंदभाज्या खाण्याचे फायदे



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …