10 मिनिटांचा वेळ काढून दिसू शकता तब्बल 16 वर्षे लहान व तरूण

प्रत्येक व्यक्तीची एक छुपी इच्छा असते की आपण नेहमी तरुण व आहे त्या वयापेक्षा लहान दिसावं. कारण तरूणपण हा एक असा काळ आहे जो पूर्णपणे फिट आणि हेल्दी असण्याचा काळ असतो. यावेळी जणू काही दुनियेला जिंकण्याची हिम्मत आपल्यात असते. पण तुम्ही म्हातारपण जिंकू शकता का? तर डॉक्टर वरालक्ष्मी म्हणतात की हे शक्य आहे काही खास टिप्सचे (Anti Aging Tips) पालन केले तरच..! आपण या टिप्स काय आहेत ते जाणून घेऊच, पण सगळ्यात आधी समजून घेऊ की म्हातारपण येतं कसं?

तर मंडळी, म्हातारपण हा वयाचा एक असा टप्पा आहे, तेव्हा शारीरिक पेशींचे काम आणि उत्पादन संथ होते. यामुळे शरीराची ताकद कमी होऊ लागते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, चेहरा निस्तेज दिसू लागतो. शिवाय केस पांढरे पडू लागतात आणि हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्टेरॉल सारखे गंभीर आजार शरीराला विळखा घालू लागतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, पेशींच्या हा खराब स्थितीला मोलेकुलर आणि सेल्युलर डॅमेज होणं या गोष्टी जबाबदार असतात.

हा आहे 16 वर्षांनी तरूण दिसण्याचा उपाय

-16-

आयुर्वेदिक डॉक्टर वरालक्ष्मी यांची एका अभ्यासपूर्ण संशोधनाचा दाखला देताना सांगितले आहे की, दरोरोज 10 मिनिटे तुम्ही वेगाने चाललात तर तुमचे वय 16 वर्षे कमी होऊ शकते म्हणून तुम्ही तुमच्या वयापेक्षा 16 वर्षांनी तरुण व लहान दिसू शकता. चला जाणून घेऊया की, चालण्याचा व्यायाम वॉकिंग एक्सरसाइज म्हातारपणाला दूर ठेवण्यास कशी मदत करतो आणि त्या शिवाय काय आहेत याचे फायदे? ही संपूर्ण माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी येईल याची आम्हाला खात्री आहे.

हेही वाचा :  रॅम्पवर सिंहाची हजेरी, तर कोणी नखशिखांत सजलं ३० हजार क्रिस्टलमध्ये Paris Fashion Week ने वेधले जगाचे लक्ष

(वाचा :- Yoga for Thyroid : घशाचा आजार थायरॉईडला मुळापासून नष्ट करतात हे 4 उपाय, एक्सपर्ट्सनी सांगितलेली पद्धत करा फॉलो)

संशोधनात काय सांगितले आहे?

कम्युनिकेशन बायोलॉजीवर पब्लिश एक अभ्यासपूर्ण संशोधन 4 लाखांपेक्षा अधिक लोकांवर केले गेले. यात संथ गतीने चालणाऱ्या लोकांपेक्षा वेगाने चालणाऱ्या लोकांचे वय त्यांच्या बायोलॉजीकल वयापेक्षा 16 वर्षांनी कमी दाखवत असल्याचे दिसून आले. डॉ. वरालक्ष्मी यांनी सांगितले की या निरीक्षणावेळी असे आढळून आले की, वेगाने चालणाऱ्या व्यक्तींमध्ये ल्यूकोसाइट्स सेल्सच्या टेलोमेयरची लांबी जास्त असल्याचे दिसून आले. हाच फरक आहे संथ गतींचे चालणाऱ्या लोकांमध्ये आणि जलद गतीने चालणाऱ्या लोकांमध्ये!

(वाचा :- Ex-AIIMSचे डायरेक्टर म्हणतात Omicron BF.7 ला ही एकच गोष्ट देऊ शकते मात, हातचं काम सोडा व 2 मिनिटे करा ही गोष्ट)

बायोलॉजीकल एज म्हणजे काय?

डॉ. वरलक्ष्मी सांगतात की, जे वय आपल्या जन्माच्या आधारानुसार वाढत असते आणि जे आपण ग्राह्य धरतो त्याला क्रॉनोलॉजिकल एज (Chronological Age) असे म्हणतात. पण शरीरातील पेशी आणि टिश्यू यांचे जे वय असते त्याला बायोलॉजीकल एज (Biological Age) असे म्हणतात. हे जे वय आहे ते वातावरण आणि अन्य कारणांमुळे होणाऱ्या परिणामांमुळे वाढत राहते. जेव्हा हे वय क्रॉनोलॉजिकल एजपेक्षा जास्त होते तेव्हा कमी वयातच म्हातारपण आल्यासारखे दिसू लागते. हेच आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून रोखू शकतो असे डॉक्टर सांगतात.

हेही वाचा :  वयाच्या 60 नंतरही येणार नाही म्हातारपण, कायम दिसाल अनिल कपूरसारखे तरूण, खा हे 5 पदार्थ

(वाचा :- Diabetes Symptoms : डायबिटीज झाल्यावर तुमच्याही मानेमध्ये दिसणार हे बदल, या एका भयंकर लक्षणावर ठेवा बारीक नजर)

टेलोमेयर म्हणजे काय?

आयुर्वेदिक डॉक्टर वरालक्ष्मी यांच्या म्हणण्यानुसार, टेलोमेयर हा आपल्या डीएनएचा शेवटचा भाग असतो जो वय आणि वातावरणीय प्रभावामुळे प्रभावित होत असतो. टेलोमेयरच्या लांबी वरूनच नैसर्गिक म्हातारपण आणि अनुवांशिक अस्थिरतेचा शोध लागतो. म्हणूनच टेलोमेयरला या क्षेत्रात विशेष महत्त्व आहे. यावर अनेक डॉक्टर स्वतंत्र संशोधन करून सुद्धा नवनवीन गोष्टी समोर आणत आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा याच टेलोमेयरच्या मदतीने म्हातारपणाशी निगडीत अनेक समस्या सोडवण्यात शास्त्रज्ञांना मदत होणार आहे असे जाणकार सांगत आहेत.

(वाचा :- Protein Deficiency : करोना परत आलाय.! अशा गंभीर दिवसांत ही 7 लक्षणं दिसल्यास करू नका अजिबात दुर्लक्ष नाहीतर..!)

फास्ट चालण्याचे फायदे काय आहेत?

आता तुमच्या सुद्धा मनात प्रश्न आला असेल की चालण्याने नक्की शरीराला फायदे काय होतात? तर मंडळी, तुम्ही जेवढे जास्त चालाल तेवढी तुमची धुम्रपान न करण्याची इच्छा होईल. कोलेस्टेरॉल आणि हाय बीपीच्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल. एखादा दीर्घकालीन आजारापासून तुम्ही दूर राहाल आणि सुरक्षित असाल. तुमची शारीरिक हालचाल अधिक जास्त चांगली होईल आणि तुमच्या अंगातील आळस निघून जाईल. याशिवाय सुद्धा अजून अनेक फायदे चालण्याचे आहेत. चालणे हा एक असा व्यायाम आहे जो ग्तुम्ही कधीही कुठेही करू शकता आणि त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत.

हेही वाचा :  कायम तरूण व लहान दिसण्यासाठी ही 5 कामं करतो हा डॉक्टर, खरं वय ऐकून घसरेल पायाखालची जमीनच

(वाचा :- Urine Disease Remedies सारखं लघवीला होत असेल तर हलक्यात घेऊ नका, असतील हे 4 गंभीर आजार, करा Dr सांगितलेले उपाय)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

डॉक्टरांनी सांगितली तरूण व लहान राहण्यासाठी उपाय..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …