मोदी सरकारची जबरदस्त कारवाई! Pakistani दहशतवाद्यांच्या नाड्या आवळल्या, J-K मध्ये संदेश पाठवणं आता अशक्य

Centre blocks Mobile Apps: केंद्र सरकारने (Centre Government) मोठी कारवाई केली असून दहशतवाद्यांचं (Terrorist) कंबरडं मोडलं आहे. केंद्र सरकारने दहशतवादी गटांकडून वापरल्या जाणाऱ्या तब्बल 14 मोबाइल अ‍ॅप्सवर (Mobile Application) बंदी घातली आहे. जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) दहशतवाद्यांकडून यांचा जास्त वापर केला जात होता अशी माहिती आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून दहशतवादी आपल्या समर्थकांशी तसंच इतरांशी कोडवर्डचा वापर करत संदेशाच्या माध्यमातून संवाद साधत होते. यासह या अ‍ॅप्सच्या माध्यमातून त्यांना पाकिस्तानमधून सूचनाही मिळत होत्या अशी सूत्रांची माहिती आहे. 

कोणत्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे?

ज्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second Line, Zangi आणि  Threema यांचा समावेश आहे. 

सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या सूचनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हे अ‍ॅप्सवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत होते. तसंच भारतीय कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करत होते. यामुळे संबंधित मंत्रालयाकडे या अ‍ॅप्सवर बंदी घातली जावी अशी विनंती करण्यात आली होती. ही विनंती केंद्र सरकारने स्विकारली असून माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत हे अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 

हेही वाचा :  Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठांशी अधिृतपणे संवाद झाला असता गुप्तचर यंत्रणांनी हे अ‍ॅप्स काश्मीर खोऱ्यात दहशतवादी प्रोपगंडा पसरवत होते अशी माहिती देण्यात आली. 

एका अधिकाऱ्याने ANI शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “दहशतवादी आणि ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांची यंत्रणेकडून माहिती ठेवली जात आहे. संवादांचा मागोवा घेतला जात असताना एका ठिकाणी या मोबाइल अॅप्समध्ये भारतातील प्रतिनिधी नाही असं आढळलं. त्यामुळे या अॅप्समध्ये होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती ठेवणं अशक्य आहे”.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- ‘डॉक्टर से कम समझे क्या!’

Viral Video : देशातील कुठल्याही मंदिरात जा तिथे तुम्हाला आजी आजोबासह अनेक चिमुकले पोरं चंदन …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …