बहिणीसाठी काहीही… बिग बॉस विनर अक्षय केळकरनं पूर्ण केला बहिणीचा हट्ट

Akshay Kelkar : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरची (Akshay Kelkar) बहिण नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अक्षयने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकावी. तसेच, ती ट्रॉफी लग्नाच्या रुखवतात ठेवावी, अशी अक्षयच्या बहिणीची इच्छा होती. अखेर अक्षयने लाडक्या बहिणीची इच्छा पूर्ण केली आहे. 

अक्षयने पूर्ण केला बहिणीचा हट्ट!

सख्ख्या बहिणीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर आलेलं असताना त्या लग्नसोहळ्याची तयारी करण्याऐवजी अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व गाजवत होता. त्याची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आणि तो ‘बिग बॉस मराठी 4’चा विजेता ठरला. अक्षयने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकावी आणि ती ट्रॉफी लग्नातल्या रुखवतात ठेवता यावी, असा त्याच्या बहिणीचा हट्ट होता. अखेर अक्षयने मेहनतीच्या जोरावर बहिणीचा हट्ट पूर्ण केला आहे. 

लाडक्या बहिणीसाठी अक्षयची खास पोस्ट…

अक्षयने लिहिलं आहे, “श्रद्धा, माझ्याशी कचाकचा भांडायचीस, तशी भांडू नकोस! तुझा बालिशपणा पण इथेच सोडून जा! त्या सगळ्यावर आमचाच हक्क आहे. तुझे सगळे हट्ट पूर्ण नाही करता आले, पण, तुझ्या रुखवतातला ट्रॉफीचा हट्ट पूर्ण केला आहे. बाकी काय, दिल्या घरी तू सुखी राहा!”. 


अक्षयने पुढे लिहिलं आहे, “आता मला माझ्या आमरसामध्ये पार्टनर नसेल याचा खूप खूप आनंद झालेला आहे. हेमंत, आमच्या घरच्या फुलाला जपशीलच याची खात्री आहेच. पण तरीही, सांभाळून घे. तुम्हा दोघांनाही, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”. 

हेही वाचा :  पठाणचं 'या' बॉलिवूड कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक

अक्षयच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहते कमेंट्स करत त्याच्या बहिणीला शुभेच्छा देत आहेत. समृद्धी केळकर, अमृता धोंगडे अशा अनेक सेलिब्रिटींनी अक्षयच्या बहिणीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली आहे. अक्षयचं आणि त्याची बहिण श्रद्धा यांचं एकमेकांसोबतचं नातं खूपच कमाल आहे. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अक्षयने बहिणीचं थाटामाटात लग्न लावून दिलं आहे. ‘बिग बॉस’नंतर अक्षय आता कोणत्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Akshay Kelkar : ‘Bigg Boss Marathi 4’चा विजेता अक्षय केळकर कोण आहे? विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर म्हणाला…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …